भारतीय जनता पक्षाशी संबंधि��� असणारे आणि गोसेवा महामंडळाचे अध्यक्षपदी असणारे शेखर मुंदडा ह्यांना पुण्यातील एका नागरिकाने खाजगी गाडीवर "महाराष्ट्र शासन" असे लिहिले म्हणून जाब विचारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तवात कोणत्याही खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन , पोलिस अथवा सरकारी आस्थापनाचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही. तसे लिहिल्यास तो मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम १७७ (Section 177 of the Motor Vehicles Act, 1988) अं��र्गत वाहतूक नियमांच्या उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा ठरतो. तरी सर्व सामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी, मात्र तुम्ही सत्ताधारी पक्षात असाल तर बहुतेक तुमच्या साठी हा गुन्हा नसेल. तिथे चालून जात असावे!
#pune #viralvideo #गोसेवा
विषय निघालाच आहे तर..
घराच्या बाजूला पुरेशी जागा असल्यास..
१)👇Rain Tree म्हणजेच शिरीष वृक्ष नक्की लावावा..ह्या वेगानं वाढणाऱ्या झाडाची जबरदस्त मोठी दाट आणि थंड सावली पडते..!
२)👇अजून एक असंच भारी झाड म्हणजे महोगनी..आधी वेगानं उंच जातं आणि मग पसरतं..म्हणून जागा कमी असली तरी टेन्शन नॉट..!
बाकी दोन्ही देशी झाडं किमान दोन चार पिढ्यांना तरी सावली देतील अशी आहेत.. पण महोगनी investment म्हणून पण चांगलं आहे..😅(याबद्दल जरा शोधा..😉)
वेडेपणा आणि स्वार्थाला खरंच काही सीमा नाही. ज्या माणसाने हा प्रस्ताव मांडला आहे, जर तो सुज्ञ मनाचा असेल, तर त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. अन्यथा त्याला उपचारांची गरज आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ आणि ५ लाख लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाऊ शकतात, असा प्रस्ताव मांडण्याचा विचारही कसा काय होऊ शकतो?
पर्यावरणाची अशी हानी करण्याचा इतका हव्यास का? आपल्या पर्यावरणाबाबत हा कसला द्वेष?
आम्हा मुंबईकरांना हे अजिबात नको! आमच्या जंगलांना हात लावू नका आणि आमचे शहर उद्ध्वस्त करू नका.