MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Group ‘B’) 2025 साठी 674 पदांची भरती प्रक्रिया विलंबाने जाहीर झाली असून परीक्षा 4 जानेवारी 2025 रोजी घेतली जात आहे. नेहमीच्या नियोजनापेक्षा वेगळ्या वेळापत्रकामुळे अनेक उमेदवार अडचणीत सापडले आहेत.
वयोमर्यादेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख ग्राह्य धरल्याने दीर्घकाळ सातत्याने तयारी करणारे हजारो विद्यार्थी केवळ तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरत आहेत. या अन्यायाविरोधात विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडे दाद मागत आहेत मात्र, अद्यापही ठोस निर्णय समोर आलेला नाही.
स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांनी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे दिली आहेत. प्रशासकीय गोंधळाचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे योग्य नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी देत शासनाने तातडीने न्याय्य आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करत आहोत.
@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSC #PSI_वयवाढ
#PSI
📍विले पार्ले, मुंबई
मुंबईकरांनो वंचित बहुजन आघाडीचा लढा लक्षात ठेवा!
तथागत गौतम बुद्धांचा अवमान आम्ही सहन करणार नाही.
तथागत गौतम बुद्धांचा अवमान करणाऱ्या सावरकर लिखित "संन्यस्त खड्ग" नाटकाच्या विरोधात मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. हे नाटक जिथे जिथे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तेथे वंचित बहुजन आघाडी हे बौद्ध विरोधी नाटक बंद पाडले!
#एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForMumbai
ईव्हीएममध्ये फेरफार होतो, गफला होतो. या गफल्यावर सुद्धा मात करता येते. झुंडशाही आपल्याला माहीत आहे. एकदा का ती बाहेर पडली तर भल्या भल्यांना ती उद्ध्वस्त करू शकते.
मतांची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि भाजपला उद्ध्वस्त केले पाहिजे.
ज्या दिवशी लोकशाही संपली, त्यादिवशी राजेशाही सुरुवात होईल. राजेशाही सुरू झाली तर आपले स्वातंत्र्य, अस्तित्व संपेल. भाजपला इथली लोकशाही संपवायची आहे.
#VBAForMaharashtra
आचार्य अत्रेंची बाबासाहेबांना श्रद्धांजली |
महामानवाच्या अंत्ययात्रेची हृदयस्पर्शी कहाणी..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेदरम्यान आचार्य अत्रे यांनी व्यक्त केलेल्या भावस्पर्शी श्रद्धांजलीच्या शब्दांतून उलगडतो त्या युगपुरुषाचा अजरामर तेजस्वी प्रवास.
I, along with my brother Bhimrao Ambedkar and my wife Anjali Ambedkar, hoisted the Panchsheel flag at half-mast in honor of Babasaheb on his Mahaparinirvan Diwas, earlier today.
Vanchit Bahujan Aaghadi, Buddhist Society of India and Samata Sainik Dal paid our heartfelt tributes to Babasaheb through the singing of the national anthem and collective Buddhist chanting.
Jai Bhim!
आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांसोबत असेल. आज नांदेड येथे जाऊन अंजली आंबेडकर यांनी ताटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आचल नावाच्या तरुणीसोबत सक्षमचे आंतरजातीय प्रेमसंबंध होते. या नात्याला तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे सक्षमची निर्घृण हत्या झाली. आचलने दोन व्हिडिओंद्वारे घटनांची माहिती देत आपल्या कुटुंबाकडून झालेल्या दबावाचे आणि पोलिसांकडून घडवून आणलेल्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.
नांदेड पोलिसांनी नि:पक्षपाती तपास करून सक्षम ताटे यांना न्याय मिळवून द्यावा, सक्षमचे कुटुंब आणि आचल दहशतीत असल्याने त्यांना त्वरित सुरक्षा पुरवावी, अशीही आमची मागणी आहे.
आजच्या भेटीत आंचलने उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आंचलच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत आहे.
भाजपला देशात एकपक्षीय राजकीय व्यवस्था निर्माण करायची आहे. एकच राजकीय पक्ष असेल, तोच जिंकेल अशी व्यवस्था भाजपला निर्माण करायची आहे.
एकच पक्ष राहिला पाहिजे, जर एकच पक्ष जिंकत राहिला तर निवडणुका निष्पक्ष राहणार नाहीत. याला लोकशाही सुद्धा म्हणता येणार नाही.
आगामी निवडणुकात भाजपची मग्रुरी उतरवायची आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपाचे उमेदवार पराभूत करून आपल्यासाठी लढणाऱ्या उमेदवारांना जिंकून द्यायचे आहे.
भाजपचा पराभव फक्त वंचित बहुजन आघाडीच करू शकते. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना विजयी करा.
#एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
वंचित बहुजन आघाडीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या विजयाकडे आम्ही वाटचाल करत आहोत. हा विजयाचा निर्धार वसमतकरांच्या प्रतिसादातून दिसून आलाय.
शेतकरी, कष्टकरी, युवक आणि आरक्षणवादी जनतेच्या मुद्द्यांसाठी लढण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांनी सत्तेत जाण्याच्या निवडणुका आहेत.
आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा आले किंवा सोबत नाही आले, तरीही आम्ही लढत राहू.
नांदेडप्रमाणेच इतर ठिकाणी युती झाली तर ती सन्मानपूर्वक, स्वाभिमानाने, ५०-५० चा फॉर्म्युला स्वीकारून युती होईल.
जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल.
आम्ही हाती घेतलेले मुद्दे न्याय मिळेपर्यंत लढत राहतो. देशातील आरएसएस विरुद्धचा पहिला मोर्चा, कोथरूड दलित मुलींना मारहाण प्रकरण, किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टात जाऊन आरोपी पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याचा विषय असो, आम्ही शेवटपर्यंत लढत राहिलो.
आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, हे आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या सभांना उसळणाऱ्या स्वाभिमानी जनतेच्या प्रतिसादातून दिसत आहे.
#एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
आपल्यासमोर RSS आणि भाजपा हा शत्रू म्हणून उभा आहे. आपल्याला त्यांचा पराभव करायचा आहे.
भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी, रोहित वेमुलाचा बदला घेण्यासाठी, महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी, खैरलांजी वरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी RSS आणि भाजपचा पराभव आपल्याला करायचा आहे.
: सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia #VBAForMaharashtra
फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या घरी कवडगाव ता. वडवणी, जि. बीड येथे सांत्वनपर भेट दिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुंडे कुटुंबीयांशी फोनवर बोलणे झाले होते. पीडित कुटुंबाने या प्रकरणात SIT चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात वर्तमानपत्रातून ज्या बातम्या आल्या आहेत, त्यावरून असं कळतंय की, डॉक्टर संपदा यांना पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी दबाव केला जात होता.
आमची मागणी आहे की, डॉ. मुंडे यांच्या देखरेखीखाली झालेल्या पोस्टमोर्टमची चौकशी SITने करावी. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, डॉ. मुंडेंवर प्रेशर होता की नाही? कोण कोण दबाव टाकत होते, हे समोर येईल. त्यातील केसेसची व्याप्ती लक्षात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचे निवेदन आहे की, या संवेदनशील प्रकरणात त्यांनी इन्स्टंट इडली सारखे वक्तव्य करू नये. शहिद सोमनाथ सूर्यवंशी, डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती ही नंतर वेगळी निघते. मुख्यमंत्री पोलिसांनी दिलेल्या माहितीवर स्टेटमेंट देतात. जे अतिशय चुकीचे आहे.
आज माझ्यासोबत सांत्वनपर भेटीत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सविता मुंडे, किसन चव्हाण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
.@DrMohanBhagwat, इधर-उधर की बकवास मत करिए! हिम्मत दिखाइए और मेरे तीन सवालों का जवाब दीजिए।
1️⃣ क्या RSS एक रजिस्टर्ड संगठन है? अगर RSS रजिस्टर्ड नहीं है, तो उसे करोड़ों रुपये की फंडिंग कैसे मिल रही है?
2️⃣ क्या यह सच नहीं है कि RSS ने भारतीय ध्वज को स्वीकार नहीं किया था? क्या यह सच नहीं है कि RSS ने नागपुर स्थित अपने मुख्यालय में दशकों तक तिरंगा नहीं फहराया?
3️⃣ क्या यह सच नहीं है कि गोलवलकर और सावरकर ने बाबासाहेब अंबेडकर द्वारा दिए गए समानतावादी, लोकतांत्रिक और धर्मनिरपेक्ष संविधान को अस्वीकार कर दिया था, और उसकी जगह मनुस्मृति को संविधान बनाने की मांग की थी?
वंचित बहुजन आघाड़ी और उसके सभी कार्यकर्ता अब RSS और मनुवादी ताकतों के खिलाफ हाथ धोकर मैदान में उतर चुके हैं! जवाब दीजिए!
एक बात आप और आपकी हाफ-चड्डी गैंग समझ लीजिए कि हमारा देश बाबासाहेब के दिए हुए संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं!
मनुस्मृति मुर्दाबाद! संविधान जिंदाबाद!
जय भीम। जय संविधान। जय भारत।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
देशाच्या आर्मी चीफने पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की, तीन महिन्यात पाकिस्तानशी युद्ध होण्याची शक्यता आहे, हे खरं ठरू नये. जर युद्ध झालं, तर जे देश एककाळी भारताला मदत करत होते, ते इंग्लड, अमेरिका, आखाती देश हे सर्व देश पाकिस्तानला मदत करत आहेत.
रशियाने पाकिस्तानला इंधन देण्याचे आश्वासन दिले आहे. आपला ज्या रशियावर भरोसा होता तो आता राहिलेला नाही, याचे एकमेव कारण पंतप्रधान मोदीचा इगो आहे.
स्वतःला विश्वगुरु समजणे आणि दुसऱ्या देशांचा अपमान करणे, हे मोदीचे धोरण चालू आहे. यामुळे हे सर्व देश भारताविरुद्ध नाही तर मोदी विरुद्ध गेले आहेत. जर ते मोदी विरोधात गेले, आपण युद्ध हरलो तर पाकिस्तानच राज्य आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावे.
#India
महाराष्ट्र में आज अंबेडकरवादियों ने आरएसएस पर बैन की मांग करते हुए संविधान बचाने की आवाज़ उठाई। यह संघर्ष नफरत के खिलाफ और बराबरी के हक़ में है। डॉ. बाबासाहब अंबेडकर के अनुयायी आज भी न्याय और इंसाफ़ की राह पर हैं।
कल देश के इतिहास में पहली बार RSS के खिलाफ उसके दरवाजे के सामने मोर्चा निकाला गया। और यह मोर्चा फुले-शाहू-अंबेडकर की विचारधारा पर चलने वाली वंचित बहुजन आघाड़ी ने निकाला!
पूरे देश में RSS के खिलाफ हमारे जन आक्रोश मोर्चा की चर्चा हैं। हमने कल पूरे देश को बताया की हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं!
प्रशासन और पुलिस द्वारा हमें RSS के खिलाफ मोर्चा निकालने से रोकने के कई प्रयास किए गए लेकिन हम रुके नहीं। RSS के खिलाफ उसके दरवाजे के सामने मोर्चा निकलने की राजनीतिक हिम्मत बस और बस वंचित बहुजन आघाड़ी में हैं!
लेकिन मैं हर दूसरी पार्टी से पूछना चाहता हूँ — वंचित बहुजन आघाड़ी ने कल जो किया, वह आप इतने सालों में क्यों नहीं कर सके? यही सवाल वंचित बहुजन आघाडी का कार्यकर्ता अब हर दूसरी पार्टी से पूछेगा!
कल RSS ने हमारे हाथों से भारत का संविधान और तिरंगा लेने से इनकार कर दिया! मैं एक फिर दोहराता हूँ, हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं!
RSS मुर्दाबाद! मनुवाद मुर्दाबाद!
जय फुले। जय शाहू। जय भीम। जय संविधान। जय भारत।
आपला माजी विद्यार्थी बाहेरच्या देशात तेही हिथ्रो सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित सुरक्षा सेवांसाठी असणे, ही खरंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे.
त्यासाठी कॉलेजकडून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची तत्परता सुद्धा! प्रेम बिऱ्हाडेसाठी ही पूर्तता करण्यात मॉडर्न कॉलेजने केलेली दिरंगाई अक्षम्य आहेच पण, ह्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिका आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विट खालील प्रतिक्रिया अधिक विखारी आणि तितक्याच अगम्य आहेत.
तिथे आरक्षण नसते, केवळ मेरिटवर जॉब मिळतो ह्या त्यातील सौम्य निर्बुद्ध प्रतिक्रिया !
प्रेमला जॉब मिळालेलाच होता पण, आपल्याच वंचित समूहातून आलेल्या विद्यार्थ्यांचे यश दुर्दैवाने कॉलेज प्रशासनाला पचवता आले नाही!
हेच वास्तव आहे!
: अंजलीताई आंबेडकर
राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणातून मराठा समाजासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय असंवैधानिक असून, त्याविरोधात ओबीसी, भटके विमुक्त महासंघाने आरक्षण वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे निमंत्रण मला ही मिळाले आहे.
मी उद्या औरंगाबाद येथे होणाऱ्या या ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण वाचवण्यासाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहणार आहे.
सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक असून, सर्व ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाने आरक्षण वाचवण्याच्या लढ्यात एकत्र येणे आवश्यक आहे.