📢 #MahaTransco LDC / Manager परीक्षेला ६० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही निकाल प्रकाशित झालेले नाहीत.
हजारो विद्यार्थी पारदर्शक निकालाची वाट पाहत आहेत.
आम्ही @mahatransco आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर LDC निकाल प्रकाशित करावा. #JusticeForAspirant
महाट्रान्सकोच्या परीक्षेसाठी उमेदवारांना मिळालेले परीक्षा केंद्रे कसे आहेत ते एकदा बघून घ्या. उमेदवारांना दूरवरचे परीक्षा केंद्र दिले गेले आहेत आणि जे परीक्षा के���द्र मिळाले आहेत त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. राज्यातील तरुणांचे भविष्य अंधारात लोटू नका. सरळसेवा परीक्षांसाठी फक्त TCS ION परीक्षा केंद्र म्हणून देण्याचा निर्णय राज्य सरकारने तत्काळ जाहीर करावा ही विनंती.
@Dev_Fadnavis @AUThackeray @MSEDCL
@karanchavha@RRPSpeaks ज्याचा मराठी इतकं जास्त सुंदर आहे..
ज्याला शिक्षकांना आणि शिक्षकाला याचा फरक ���मजत नाही त्याच्याकडून दुसरे काही अपेक्षाही नाही करू शकत ना आपण..
All the best for your Brightest Future ✨️
पारदर्शक परिक्षा घेण्याबाबत सरकारी यंत्रणा गंभीर तर नाहीतच उलट पोरखेळ करत आहेत. महाट्रान्सकोच्या परिक्षेसाठी मुलांना एकतर २००-३०० कि. मी. लांबची सेंटर दिली गेली. त्यातही TCS केंद्रांची मागणी करूनही खाजगी केंद्र देण्याचा आडमुठेपणा करण्यात आला. आतातर हद्द म्हणजे परिक्षा केंद्रांवर ना भौतिक सुविधा आहेत ना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्यात. एकंदरीतच महाट्रान्स्कोला विद्यार्थीहित महत्त्वाचं आहे की हेकेखोरपणा हा प���रश्न पडला आहे.
सरकारने तात्काळ महाट्रान्स्कोला राज्यभरातील परिक्षा केंद्रांची पुनर्पडताळणी करून सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
**१ ऑगस्ट २०२५** रोजी होणाऱ्या **MAHATRANSCO च्या LDC पदांसाठीच्या परीक्षेचं आयोजन** अत्यंत गोंधळात आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार न करता करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी **TCS सारख्या अनुभवी आणि विश्वासार्ह संस्थेच्या परीक्षा केंद्रांची अपेक्षा** होती. मात्र, विद्यार्थ्यांना **२०० ते ३०० किमी दूर अंतरावर असलेल्या खाजगी आणि अविश्वासार्ह केंद्रांवर** पाठवण्यात आलं आहे.
राज्यात याआधी अनेक **पेपरफुटीच्या घटना** घडल्या असून त्याचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे. अशा पार्श्वभूमीवर, **MAHATRANSCO परीक्षेत घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही.**
शिवाय, **सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे दूरच्या प्��वासामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.**
* **TCS सारख्या विश्वासार्ह एजन्सीकडे परीक्षा केंद्रांची जबाबदारी देणे**
* **विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ परीक्षा केंद्र देणे**
या दोन्ही गोष्टींबाबत **MAHATRANSCO ला स्पष्ट निर्देश द्यावेत**, ही विद्यार्थ्यांची आणि पालकांची ठाम मागणी आहे.
#maharastra
📍MAHATRANSCO च्या LDC पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी #TCS ची केंद्रें देणे अपेक्षित होते, परंतु २००–३०० कि.मी. अंतरावरील खासगी अविश्वासाई केंद्र देण्यात आल्याने पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
📍राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
📍परिणामी सरकारने MAHATRANSCO ला परीक्षेसाठी TCS ची केंद्रें तसेच पावसाचे वातावरण पाहता जवळ परीक्षा केंद्रें देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
#mahatrancoexam
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
विषय : MAHATRANSCO परीक्षेतील परीक्षा केंद्र संबंधित अडचणी व आवश्यक सुधारणा संदर्भात निवेदन
MAHATRANSCO अंतर्गत जाहिरात क्र. 24/2024 अन्वये Lower Division Clerk (Finance & Accounts) या पदासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा यापूर्वी ६ ज���लै २०२५ रोजी नियोजित होती, मात्र त्या वेळी परीक्षार्थींना खाजगी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच परीक्षार्थींनी संबंधित यंत्रणेला याची माहिती देऊन तक्रार नोंदवली, व त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
तथापि, पुन्हा एकदा दिनांक १ ऑगस्टच्या परीक्षेसाठी त्याच स्वरूपाची खाजगी केंद्रेच देण्यात आली आहेत. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली असून, तांत्रिक अकार्यक्षमता व व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव ही गंभीर चिंता बनली आहे.
परीक्षार्थ्यांच्या मुख्य म���गण्या पुढीलप्रमाणे आहेत :
👉 सदर परीक्षा फक्त TCS iON अधिकृत डिजिटल झोन केंद्रांवरच घेतली जावी.
👉 परीक्षा वेळेत, पारदर्शक, गोंधळमुक्त पद्धतीने पार पडावी.
या परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य जोडलेले आहे. त्यामुळे वरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, ही नम्र विनंती.
महाट्रान्सको'च्या विविध पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी #TCS ची केंद्र देणे अपेक्षित होते, परंतु २००–३०० कि.मी. अंतरावरील खासगी केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार आहे..
रा���्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. परिणामी सरकारने महाट्रान्सकोला परीक्षेसाठी TCS ची केंद्र तसेच पावसाचे वातावरण पाहता जवळ परीक्षा केंद्र देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
'महाट्रान्सको'च्या विविध पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 'टीसीएस'ची केंद्रे देणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांना खासगी केंद्रे द���ण्यात आली असून ती २००-३०० किमी दूर अंतरावर आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MahaTransco LDC परीक्षा पोस्टपोन्ड नाही ट्रान्सपरन्सी हवी आहे..!! I आता फक्त लढ म्हणा..!!
राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घ��टाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1) TCS ion Centre भेटलेच पाहिजे
2) 100 किलोमीटरच्या आत एक्झाम सेंटर भेटलेच पाहिजे
आमच्या मागण्या :
1) परीक्षेची त���रीख लवकर लवकर जाहीर करावी
2) परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रांवरच घेण्यात यावी
3) परीक्षा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असावी
4) अर्ज भरताना उमेदवारांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रांच्या पसंतीक्रमानुसारच त्यांना परीक्षा केंद्र दिले जावे
प्रति,
माननीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री (ऊर्जामंत्री) , महाराष्ट्र राज्य
विषय:- MAHATRANSCO मधील LDC (Finance & Accounts) आणि Assistant Engineer (Civil) या परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी सदर परीक्���ा ह्या TCS ION च्या अधिकृत केंद्रांवर लवकरात लवकर व्हावी.
मा. महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या MAHATRANSCO मध्ये विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेकरिता जाहिरात डिसेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेली होती. त्यापैकी Lower Division Clerk (Finance & Accounts) आणि Assistant Engineer (Civil) या पदांसाठीच्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या
महाट्रान्सकोच्या सहायक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जून रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. मागील काही परीक्षांतील गोंधळाचा अनुभव लक्षात घेता परिक्षार्थींना 'टिसीएस आयऑन' ची केंद्रे मिळणे अपेक्षित आहे.परंतु या परिक्षेसाठी अनेकांना खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.शिवाय ती खुप लांबची देखील आहेत. तसेच याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा शारिरीक व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता ही परिक्षा पुढे ढकलावी आणि त्यासाठी ट���सीएस आयऑन ची परीक्षाकेंद्रेच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिक्षार्थी करीत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्या कृपया आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Literally I don't remember when ChatGPT gave me perfect output last time..
To get one thing we have to give instructions to it 10 times
Really ChatGPT Plus drunk now a days
#ChatGPT#ElonMusk