मा. देवेंद्र जी,
गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे.
आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
१. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे
२. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे.
३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा
कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders@MSEB_Engineers@Mpsc_Andolan
संदर्भ : आप महाराष्ट्र/१३०६२०२४/००२.
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय :- १. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील AE संवर्गाची १०% GATE गुणांची सक्ती रद्द करणे
२. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात क्र.८/२०२३ JE पदभरती मध्ये जागा वाढ करणे
३. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ साठी महाराष्ट्र अधिवास दाखला सक्तीचा करणे बाबत.
महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणांस कळवण्यात येत आहे कि, राज्यातील हजारो उमेदवारांनी ऊर्जा विभागास वरील विषय अवगत करून देण्यासाठी वारंवार लेखी पत्र व्यवहार केला आहे. ११ मार्च, २०२४ रोजी आझाद मैदान येथे राज्यभरातील शेकडो उमेदवारांनी आंदोलन देखील केले होते. GATE ही परीक्षा पदव्योत्तर शिक्षण ME/MTech प्रवेशासाठी असते. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची इच्छा नसणारे तरुण तरुणी या परीक्षेस बसत नाहीत. भरती प्रक्रियेत GATE परीक्षेबाबत महावितरणने उमेदवारांना पूर्वसूचना न देता अचानक GATE परीक्षेचे गुण अनिवार्य केले आहेत. बहुसंख्य उमेदवारांनी GATE परीक्षा न दिल्यामुळे १०% गुण अनुसार GATE परीक्षा न दिलेले उमेदवार, भरती परिक्षेअगोदरच १५ गुणांनी मागे पडले आहेत. हि गोष्ट विद्यार्थ्यांसोबतच्या मंत्रालयातील बैठकीदरम्यान मा. अप्पर मुख्य सचिव, ऊर्जा यांनी मान्य करून महावितरणचे मा. मानव संसाधन संचालक यांना त्यांनी प्रत्यक्ष फोन करून योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. ऊर्जा विभागात अंतर्गत असलेल्या महाट्रांस्को आणि महानिर्मिती विभागसुध्दा १००% हि परीक्षा घेणाऱ्या IBPS संस्थेच्या गुणांवर AE या पदाची निवड करते. महावितरण मधील AE पदासाठी GATE ची १०% स्कोअर ची अट रद्द करून संपूर्ण भरती IBPS घेत असलेल्या परीक्षेतील उमेदवारांना समान संधी निर्माण करून १००% IBPS गुणांनुसार घ्यावी अशी राज्यातील लाखो तरुण तरुणींची मागणी आहे. तसेच महावितरण मध्ये AE आणि JE चे सुमारे १०००+ पद रिक्त असल्यामुळे AE २८१ आणि JE ५१ पदभरती मध्ये जागा वाढ करावी आणि AE पदासाठी सर्वच वर्गांसाठी अधिवास अनिवार्य करावा जेणेकरून महाराष्ट्रातील तरुणांना न्याय मिळेल अशी महाराष्ट्रातील लाखो विद्युत अभियंत्यांची मागणी आहे.
राज्यातील अभियंताच्या वरील मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.