काँग्रेसची सुसंस्कृत राजकीय विचाराची परंपरा राहिलेली आहे.आताची काँग्रेस विचार आणि जनतेपासून दूर गेलेली आहे.महिलेचा सन्मान नुसता भाषणातून नाही तर विचारातून दाखवावा लागतो.खालील पोस्ट वरून काँग्रेसची मानसिक स्थिती दिसून येते राज्यातील काँग्रेस टुकार नेतृत्वाच्या हातात गेली आहे.
भिवंडी येथील नारपोली भागात इमारत कोसळून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच प्रार्थना.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, मा.उद्धवजी ठाकरे (@uddhavthackeray) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@OfficeofUT
आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा!
विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, संतविचारांच्या प्रकाशात आणि भक्तिभावाच्या पावन वातावरणात साजरी होणारी ही एकादशी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येवो, हीच श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी प्रार्थना.
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥
॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥
#देवशयनीएकादशी #आषाढीवारी #विठ्ठलरखुमाई #ncp #surajchavan
॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥
गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं आंदोलन चालू होते सरकारचा साधा एक प्रतिनिधी त्यांना भेटायला जाऊ नये हे दुःखद आहे आणि आज ज्या पद्धतीने आंदोलन मोडीत काढले जात आहे ते सुधृढ लोकशाहीचे लक्षण नाही.
NEET पेपर फुटीमुळे विद्यार्थी,पालक यांना काय मनस्ताप झाला याचा थोडा विचार करा.पेपरफुटी मुळे अनेकांनी आत्महत्या केली याला जबाबदार कोण ?
"हम करो सो कायदा" असं वागणं बरं नव्हे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, मा. खासदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणांस निरोगी, दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य आणि जनसेवेचे बळ अखंड लाभत राहो, हीच सदिच्छा!
#HappyBirthdaySunilTatkareSaheb#ncp #ncpmaharashtra
DaDa Miss You …
आज तुम्ही असता तर सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात जाऊन पावसामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांचं नियोजन केलं असतं.प्रशासनावर वचक आणि काम करून घेण्याची धमक असणारा
कामाचा माणूस आज आमच्या सोबत नाही ती उणीव सदैव जाणवते.
#AJITdada
विधानसभा सभागृहात आमदार @VikramPachpute_ यांनी महाराष्ट्रातील समाजहिताचे अनेक संवेदनशील विषय मांडले आहेत.त्याबद्दल त्याचं कौतुक आहे.सभागृहात युवा आमदारांची संख्या जास्त आहे.युवा आमदारांनी विधानसभा सभागृहात रेड कार्पेट वर फोटो काढण्यापुरतं सभागृहात न येता अभ्यास पूर्वक महाराष्ट्र हिताचे प्रश्न मांडले तर कडक कायदे बनून चुकीच्या गोष्टीला आळा बसेल.
आज महाराष्ट्रात युवा वर्ग नशेच्या आहारी जातोय प्रशासनाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात असं एकही गाव नसेल जिथे दारू,गुटखा,मटका,जुगार,वाळू अवैधरित्या चालत नसेल.यावर सुद्धा आवाज उठवाल ही युवा आमदाराकडून अपेक्षा.
"जगाला प्रकाश देण्यासाठी प्रथम स्वतः प्रज्वलित व्हा."
युवकांना आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम, चारित्र्य, कर्तव्यनिष्ठा आणि मानवसेवेचा प्रेरणादायी संदेश देणारे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही प्रत्येक पिढीला नवी दिशा देतात.
ज्ञान, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SwamiVivekananda #Vivekananda #NationalInspiration #ncp
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.नवाब मलिक साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !!
@nawabmalikncp
आजच्या युवा पिढीला तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि मानसिक संतुलनाची प्रेरणा देणारा मल्लखांब हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे.
परंपरा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या युवकांसाठी मल्लखांब ही केवळ क्रीडा नसून व्यक्तिमत्त्व विकासाची एक प्रभावी शाळा आहे.
आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन
#InternationalMallakhambDay #YouthPower #FitYouth #NCP
महाराष्ट्रात खूप कमी नेते आहेत ज्यांचं भाषण ऐकावं वाटत त्यापैकीच एक स्पष्ट वक्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
@RajThackeray