आमच्या नागपूरचे सावजी मटण/चिकन ह्याव त्याव म्हणणारे कुठे गेले रे.😡
रस्स्यात तेल आहे की तेलात रस्सा हेच समजत नाही.
(टीप- खाऊन बघितलं आहे, तेव्हापासून कानाला खडा लावून आहे मी तर सावजीबद्दल)
हनुमंताच्या जीवनातून मिळणारे धडे (Life Lessons from Hanuman)
१. Hope (अतिशय कठीण परिस्थितीतही आशा जिवंत ठेवणे)
लंका नगरीत पोहोचल्यावर हनुमंतांनी रावणाच्या महालासह सर्व प्रमुख ठिकाणे धुंडाळली, पण त्यांना सीतामाता कुठेही आढळली नाही. रात्रभर शोध घेऊन थकलेले, निराश झालेले हनुमंत एका ठिकाणी बसले आणि त्यांच्या मनात निराशेचे सावट आले.
हनुमंतांनी या निराशेवर मात करण्यासाठी एक वेगळा विचार केला. त्यांनी विचार केला की, 'जर मी इथून अपयशी होऊन परत गेलो, तर वानरसेना, सुग्रीव आणि स्वतः प्रभू श्रीराम या दुःखाने आपले प्राण सोडतील. पर्यायाने अयोध्येचे साम्राज्य नष्ट होईल.' हा भयानक परिणाम डोळ्यासमोर आल्यावर त्यांनी ठरवले की, अपयशी होऊन परत जाण्यापेक्षा शोध घेता घेता प्राण गेलेले बरे. त्यांनी पुन्हा नव्या आशेने शोध सुरू केला.
अनेकदा आयुष्यात जेव्हा सकारात्मक विचार आपल्याला पुढे जाण्याची ऊर्जा देत नाहीत, तेव्हा 'जर मी आता हार मानली तर त्याचे किती भयंकर परिणाम होतील', हा विचार आपल्याला पुन्हा उभे राहण्याची आणि प्रयत्न करण्याची जिद्द देतो.
- चैतन्य चरण (@ChaitanyaTSS)