बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार - थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, तसेच आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीमध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील एजंटांचा शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे केली आहे.
@Dev_Fadnavis
#Myanmar
#HumanTrafficking
#SwapnilKalunke
📍 पुणे
केंद्रीय राज्यमंत्री तथा माझे मित्र मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांचे वडील स्व. किसनराव मोहोळ यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. आज पुण्यातील मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्व. किसनराव मोहोळ यांना आदरांजली अर्पण करून मुरलीधर अण्णा व मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.
@mohol_murlidhar
#Pune
#MuralidharMohol
परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राज्य रस्ता क्र. २११ मधील पोहनेर नदीवरील पूल ते सिरसाळा - मोहा मार्गे गर्देवाडी या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिट बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून ३४२ कोटी रुपये निधी मंजूर केला असून, ३४ किमी अंतराच्या या रस्त्याच्या माध्यमातून परळी तालुक्यातील ग्रामीण दळणवळण अधिक सुलभ होणार आहे...
या रस्त्याचे आधुनिक काँक्रिट पद्धतीने बांधकाम करण्याचा शब्द निवडणुकीत दिला होता. त्याची शब्दपूर्ती करण्यास सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे मन:पूर्वक आभार...!
#ParliVaidyanath
#Development
#MonsoonSession
#AssemblySession
स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्ण पान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रीमंत योगी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा...
#छत्रपती_शिवाजी_महाराज#शिवराज्याभिषेक_दिन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियान 2025’ अंतर्गत ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आज देवगिरी या निवासस्थानी आयोजित कोअर कमिटी बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या स्वप्नवत प्रकल्पाने केवळ बारामतीची ओळख अधिक उंचावली नाही, तर विकास, स्वच्छता आणि आधुनिकतेचा नवा आदर्शही राज्यासमोर निर्माण केला आहे.
📍 नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांची सदिच्छा भेट
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी पवार यांच्यासमवेत देशाचे केंद्रीय कृषीमंत्री मा. श्री. शिवराज सिंह चौहान यांची सदिच्छा भेट घेतली.
या प्रसंगी शेतकरी हिताच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे हित जोपासण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळवण्याबाबत संवाद साधला.
यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री श्री. गिरीष महाजन उपस्थित होते.
@ChouhanShivraj
#MaharashtraFarmers
#AgricultureDevelopment
#FarmerWelfare
#NewDelhiMeetings