Thank you @BJP4Maharashtra
Giving me this big opportunity to represent our thoughts and work on social media. Thank you @PrakashGade13 ji, Our Pradesh Chief @cbawankule .
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर केली. @PrakashGade13 यांची संयोजक म्हणून तर @sagarphundkar , @luckyschawla, @MatruBhakt , @TheRSS_Piyussh व @The_NikhilB यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती केली. सर्व पदाधिकारी भाजपा पक्ष संघटनेचे आणि भाजपा सरकारचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #BJP4Maharashtra
"रोज सकाळी ९ वाजता उठायचं आणि लोकांना शिव्या देत सुटायचं!" - राजकारणातील या नकारात्मकतेपेक्षा जनतेच्या सेवेसाठी दिलेले योगदान जास्त महत्त्वाचे आहे. राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा, जनतेच्या समस्या सोडवणे आणि राज्याचा विकास करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
@Dev_Fadnavis | @mieknathshinde | @BJP4Mumbai | @LokshahiMarathi
#newsupdate #political #mahayutisarkar #mumbainews #jansevak
एका अमेरिकन महिलेने मुंबई मेट्रोचा प्रवास केल्यानंतर अमेरिकेने भारताकडून शिकण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले!
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेली आधुनिक वाहतूक व्यवस्था जगाचे लक्ष वेधून घेत आहे.
#MetroManDevaBhau
छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन 2026'च्या प्रारंभापूर्वी विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आशीर्वाद घेतले.
@Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonSession2026
१७ पैकी १६ ! महाराष्ट्राने दिला विकासाला कौल !!
‘महायुती’ने रचला विजयाचा सुवर्ण इतिहास !!
विधान परिषदेच्या १७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत महायुतीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. या निवडणुकीत विकास, स्थिरता आणि सुशासनाच्या बाजूने जनतेने स्पष्ट कौल दिला आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांवर जनतेने विश्वासाची मोहोर उमटवली असून महायुतीच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा भक्कम विश्वास व्यक्त केला आहे. जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि निवडणुका केवळ बॅलेटवर घ्याव्यात अशी मागणी करणाऱ्या विरोधकांनाही जनतेने आपल्या मतदानातून सडेतोड उत्तर दिले आहे.
विरोधकांच्या टीका, टोमणे, खोटे आरोप, दिशाभूल करणारे प्रचार आणि फेक नॅरेटिव्ह यांना जनतेने मतपेटीतून स्पष्ट नकार दिला आहे. विकास, जनकल्याण आणि प्रगतीच्या राजकारणाला मिळालेला हा अभूतपूर्व पाठिंबा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, जनतेसाठी २४×७ झटून काम करण्याच्या वृत्तीचा तसेच शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा हा दिमाखदार विजय आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना, नेतृत्वाच्या दूरदृष्टीला आणि जनतेच्या विश्वासाला लाभलेले हे यश संपूर्ण महायुतीसाठी अभिमानाचा क्षण आहे.
या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवार, महायुतीचे नेतृत्व, कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जागरूक जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन!
@narendramodi@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@mieknathshinde
#महायुती #विकासाचा_विजय #जनतेचा_कौल #Mahayuti #MaharashtraWins #VikasPolitics
खासदार फुटले उबाठाचे…
जाणार आहेत शिवसेनेत…
शिव्याशाप मात्र भाजपाला!
उबाठा वर्धापन दिन मेळाव्यात झाले काय? तर नुसती रडारड व भाजपाच्या नावाने कंठशोष…
उबाठाचे हे रडणे म्हणायचे का नक्राश्रू?
फक्त शब्दकोशात भर, दुसरे काय?
मेळाव्याची फलश्रुती काय तर राहिलेल्या सैनिकांच्या शब्दकोषात २/३ नवे शब्द आले…
खोके, रेडे, कोथळा, खंजीर, गद्दार, छाताड, कलंक, लांडगे, हिम्मत असेल तर समोर या, जनतेच्या न्यायालयात, श्रीराम म्हणणारे हरामखोर, आडवे पाडू, तुडवू, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, शपथा, सूड, बघून घेऊ.. या शब्दांच्या मालिकेत आता भर पडली आहे..
वड, वडापाव, वटसावित्री, पारंब्या !
एक गोष्ट मात्र निश्चित — हे रडगाणे आहे निराशेचे, हतबलतेचे, हातून सर्वस्व निसटल्याचे आणि काहीही करू न शकण्याच्या असहायतेचे!
ज्यांच्या नेतृत्वाकडे स्पष्ट धोरण नाही, ठाम भूमिका नाही, विकासाची दूरदृष्टी नाही आणि भविष्यासाठी कोणतेही ठोस व्हिजन नाही, त्या पक्षाची अवस्था अशीच होत जाते. कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळतो, जनाधार कमी होतो आणि अखेर पक्षांतर्गत अस्वस्थता फुटीच्या रूपाने समोर येते.
जनतेचा कौल, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि राजकीय विश्वासार्हता टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण भूमिका आणि सक्षम नेतृत्व आवश्यक असते. त्याचा अभाव असेल, तर अशा घडामोडी अटळ ठरतात.
#राजकारण #महाराष्ट्रराजकारण #उबाठा #उध्दव_ठाकरे #ShivSena #BJP4Maharashtra #PoliticalAnalysis #MaharashtraPolitics
नाही हो, घोडेबाजार नाही…
दमदाटी नाही, पळवापळवी नाही…
हा तर म्हणे लोकशाहीचा विजय!
रात्रंदिवस घोडेबाजार, पैशांचा वापर, यंत्रणांचा गैरवापर आणि लोकशाही धोक्यात असल्याच्या आरोळ्या ठोकत भाजपावर आगपाखड करणाऱ्या विरोधकांची, ठराविक विचारवंत, पत्रकारांची भूमिका किती सोयीस्कर असते, याचे ताजे उदाहरण कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळाले.
काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार क्रॅासव्होटींगमुळे विजयी झाला, आता हा लोकशाहीचा विजय! विकासकामांवर जनप्रतिनिधींनी दाखवलेला विश्वास! लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा! असल्याची हाकाटी केली जाईल.
पण हाच निकाल भाजपाच्या बाजूने लागला असता तर?
मग मात्र घोडेबाजार, दबावाचे राजकारण, आमदारांची फोडाफोड, यंत्रणांचा गैरवापर आणि लोकशाहीचा खून अशा आरोपांची सरबत्ती सुरू झाली असती.
म्हणजे निकाल आपल्या बाजूने लागला तर तो लोकशाहीचा उत्सव आणि विरोधकांच्या बाजूने लागला तर लोकशाहीवरील हल्ला?
हीच दुटप्पी राजकीय नैतिकता आज जनतेसमोर उघडी पडत आहे.
लोकशाहीचा खरा सन्मान निकाल स्वीकारण्यात असतो, तो आपल्या सोयीप्रमाणे त्याचे अर्थ लावण्यात नाही.
#KarnatakaPolitics #Congress #DoubleStandards #Democracy #PoliticalHypocrisy #BJP #राजकारण #लोकशाही
जर खासदारांना On Air अश्या शिव्या देत असतील तर प्रत्यक्षात किती देत असतील खासदार @rautsanjay61? कोण टिकेल अश्या पक्षात?
इतरांना भाषेचं ज्ञान पाजळणाऱ्यांनी जरा सांगावे..
माध्यमांशी संवाद! 🎙️
🎙️ जैन संप्रदाय हा शांतीप्रिय असून अहिंसेवर विश्वास ठेवणारा समाज आहे. मुंबई आणि देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक संस्था सरकारलाही उभारणे शक्य नव्हते, त्या जैन समाजबांधवांनी उभारल्या आहेत. या संस्थांचा लाभ केवळ जैन समाजच नाही, तर सर्व समाजातील लोक घेतात. जैन बांधव शांततेने आपली उपासना करत असतात.
रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाबत बोलायचे झाल्यास, देशातील अनेक धार्मिक स्थळांवर अशा प्रकारचे पांढरे पट्टे दिसून येतात. गोव्यातील श्री मंगेशी मंदिर, तिरुपती श्री बालाजी मंदिर, सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर येथे देखील असे पट्टे आहेत. यामागे वैज्ञानिक कारण आहे. आपल्या देशात उष्णता जास्त असते. त्यामुळे अनवाणी चालणाऱ्या भाविकांना या पांढऱ्या पट्ट्यांमुळे त्रास होत नाही आणि त्यांना चालणे सोपे जाते. हे पांढरे पट्टे केवळ जैन समाजातच नव्हे तर अनेक हिंदू देवस्थानांमध्येही दिसून येतात.
याला विरोध करणारे कदाचित या मंदिरांमध्ये गेले असतील किंवा नसतील, पण काही लोक केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. हे चुकीचे आहे. अशा प्रकारे लोकांची मने जिंकता येत नाहीत. उलट समाजात कटुता निर्माण होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना समाजात वैमनस्य निर्माण होईल असे कृत्य कुणीही करू नये.
मी जैन समाजबांधवांना देखील आवाहन करतो की, आपणही स्थानिक रहिवाशांशी आणि सोसायटीतील लोकांशी संवाद साधावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. तसेच विरोधकांनाही सांगू इच्छितो की, या पांढऱ्या पट्ट्यांमुळे कोणालाही त्रास होत नाही. जर विरोधच करायचा असेल तर जे भर रस्त्यावर नमाज अदा करून वाहतुकीत अडथळे निर्माण करतात, त्याचा विरोध करा. आपल्या बांधवांना लक्ष्य करू नका. हे योग्य नाही.
🎙️ जैन समाज मोठ्या प्रमाणावर भाजपच्या विचारांशी जोडलेला आहे. निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष त्यांची मते मिळवण्यासाठी जैन मंदिरांमध्ये जातात, त्यांच्या साधू-संतांचे दर्शन घेतात; मात्र निवडणुका संपल्यानंतर त्यांच्याविरोधात भूमिका घेतात, हे दुर्दैवी आहे.
जैन समाज अहिंसेचे पालन करतो. या पांढऱ्या पट्ट्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यावर चालताना लहान जीव आणि कीटक सहज दिसतात आणि त्यांना वाचविणे सोपे जाते. जो समाज अशा प्रकारे अहिंसा पाळतो, तो समाजासाठी धोका कसा असू शकतो? त्यांना ‘जिहादी’ म्हणणे तर पूर्णपणे चुकीचे आहे. जैन समाजाने अतिक्रमण केल्याचे एकही उदाहरण नाही.
जे खऱ्या अर्थाने जिहादी किंवा आतंकवादी मानसिकतेचे आहेत, त्यांच्याविरोधात हे लोक बोलताना दिसत नाहीत. मात्र जे शांततेत आपली उपासना करतात, त्यांनाच लक्ष्य केले जाते. केवळ त्यांना घाबरवण्यासाठी असे प्रकार होत असतील, तर ते चुकीचे आहे.
जैन समाज म्हणजे फक्त गुजराती समाज असा एक गैरसमज आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मराठी जैन बांधव आहेत. कर्नाटकात कन्नड भाषिक जैन समाज आहे. हा समाज देशाच्या विविध भागांत आपली संस्कृती आणि परंपरा जपत राहिला आहे.
माझे दोन्ही बाजूंना आवाहन आहे, कोणाचाही अतिरेक होऊ नये. सामंजस्याने राहणे गरजेचे आहे. सोसायट्यांमध्ये आणि समाजात यामुळे वाद निर्माण होऊ नयेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा प्रकारे आंदोलन करून मते मिळत नाहीत. लोकांची मने जिंकायची असतील तर त्यांच्याजवळ जावे लागते. धमकी देऊन किंवा संघर्ष निर्माण करून ते साध्य होत नाही. आज अमेरिका देखील धमकावून इराणला पूर्णपणे काबूत आणू शकलेली नाही. हे तर आपल्या देशातील जैन बांधव आहेत.
🎙️ मुंब्र्यातील "कैसे हरया..." सारख्या घोषणांवर अनेक जण गप्प असतात. दर शुक्रवारी रस्ते अडवून नमाज अदा केली जाते, त्याविरोधात आवाज का उठत नाही? भोंग्यांबाबत का बोलले जात नाही? सरकारी जागांवरील अतिक्रमणांविषयी का मौन बाळगले जाते?
जे लोक शांततेत राहतात, आपल्या परंपरा आणि आचारांचे पालन करतात, त्यांनाच लक्ष्य केले जाते. पण जे सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करतात किंवा कायद्याचे उल्लंघन करतात, त्यांच्याविरोधात का बोलले जात नाही?
विरोध करायचाच असेल तर जिहादी प्रवृत्तीचा, आपली मुलींचे धर्मांतरण करणाऱ्यांचा आणि समाजात असुरक्षितता निर्माण करणाऱ्या घटकांचा करा. अशा विषयांवर तुम्ही आवाज उठवलात तर आम्ही निश्चितच तुमच्या पाठीशी उभे राहू. मात्र आपल्या बांधवांविरोधात वातावरण निर्माण करून समाजात कटुता निर्माण करू नका.
लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचप्रमाणे मी जैन समाजबांधवांनाही सांगू इच्छितो की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये.
निवडणुकांपूर्वीही मुंबईत हिंसा घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र मुंबईकरांनी ते हाणून पाडले. कारण मुंबईकरांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे.
-
संजय उपाध्याय
आमदार बोरिवली विधानसभा
@narendramodi@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
रोहित पवार ठणठणीत दिसत आहेत, अन्न त्याग केलेलं वाटत नाहीत..
एका मावशीने आंदोलन स्थळी जाऊन रोहीत पवारला सुनावलं आहे.
खरं आहे, रोहित पवार ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, तिथे भंडारा ठेवला आहे. रोहित पवार आणि कार्यकर्ते तिथे जाऊन आधी जेवण करत आहेत नंतर आंदोलनांना बसले आहेत.
रोहित पवार यांचं आंदोलन त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, कोणत्याही नेत्याने त्यांचा पक्षातील या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. रोहित पवार स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करण्याचा तयारीत आहे..
पावसाळा लांबला, शेतकरी थांबला!
जून महिना अर्ध्यावर आला तरी आभाळाने अद्याप मनसोक्त बरसण्याची चिन्हे दाखवलेली नाहीत. पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीत संयम, नियोजन आणि सावधगिरी यांनाच सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार, शेतकरी बांधवांनी शासनाच्या सूचनांनुसारच पेरणी करावी. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळेची प्रतीक्षा करणे हेच शहाणपणाचे ठरेल. शासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून योग्य वेळी आवश्यक मार्गदर्शन निश्चितपणे करेल.
राज्यात बी-बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे. पाऊस उशिरा येत असला तरी शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
याचबरोबर पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करणे आवश्यक आहे. घर, शेत, उद्योग आणि दैनंदिन वापरामध्ये पाण्याची नासाडी टाळूया. जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण आणि पाण्याचा काटकसरीने वापर यांना प्राधान्य देऊया.
आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या संकटाशी लढण्याचे बळ देणार आहे. चला, जबाबदार नागरिक म्हणून पाणी संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करूया.
“पाणी वाचवा, भविष्य घडवा; संयम ठेवा, समृद्धीचा मार्ग निवडा!”
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#पाणी_वाचवा #जलसंधारण #शेतकरीहित #WaterConservation #SaveWater #Maharashtra #Shetkari #JalSaksharta #पाऊस #कृषी_समृद्धी
A Leader, A Visionary, A True Hero ✨️
Honourable MP & Union Minister of Commerce and Industry..
The Pride of North Mumbai Shri @PiyushGoyal ji
BJP North Mumbai wishes you a very Happy Birthday sir ❤️
May you be blessed with good health and strength and may your persistent efforts and dedicated service to the nation continue to lead Uttar Mumbai to Uttam Mumbai and Bharat to Viksit Bharat 2047 ✨️
#HappyBirthdayPiyushJi 🎂✨️❤️
#PiyushGoyal #PiyushGoyalSupremacy #Piyushgoyal4uttarmumbai #UttarMumbaitoUttamMumbai
FIR registered against former West Bengal CM and TMC chairperson Mamata Banerjee in connection with alleged inflammatory and communal statements made during a political rally in connection with the 2026 West Bengal Assembly Election. The FIR has been registered at Hare Street PS in Kolkata Central Division under various sectionS of BNS.
(File photo)