समजूतदारपणा हा आपला गुण असतो; पण समोरच्याची तीच चूक पुन्हा पुन्हा करण्याची सवय त्याची वृत्ती असते. आणि जेव्हा वृत्ती बदलत नाही, तेव्हा आपल्या समजूतदारपणाचीच खरी परीक्षा सुरू होते.
#म@Vapurzaa
आठवणीत अडकून राहण्यापेक्षा आठवणीनां अनुभव बनवायला शिका, मग त्या चांगल्या असोत वा वाईट. कारण आठवणीत रमलो की आपण भूतकाळाच्या कैदेत जगतो; आणि वर्तमान हरवलं की भविष्य घडवण्याची संधीही निसटून जाते...
#म@Vapurzaa
ऐकवणारे अनेक भेटतात, पण मनापासून ऐकून घेणारा नशिबानेच मिळतो. अशी व्यक्ती जीवापाड जपा. कारण कधी कधी एकटेपणा आपल्या चुकीच्या स्वभावामुळे नशिबी येतो...
@Vapurzaa#म
अपयश नेहमीच टिकेस पात्र ठरते कारण लोकांना तुमचे प्रयत्न दिसत नसतात अथवा त्यांना ते पाहायचे ही नसतात. जगासाठी यश हेच प्रयत्नाचे अंतिम निर्णायक परिणाम असतात, तर तुमच्यासाठी अपयश हे अनुभव आणि शिकवन ठरतात...
#म@Vapurzaa
मी कोणाचेच वाईट केले नाही हा आपला भ्रम असतो. कुठेतरी कधीतरी कळत नकळत आपल्या हातून कोणाचे तरी वाईट घडलेले असते. ते नकळत असेल तर पुण्य कामी येईल आणि कळत घडलेले असेल तर मात्र नक्कीच हिशोब होईल...
#म@Vapurzaa
तुमची "पैशा बाबतची मानसिकता" तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुम्हाला किती गरज आहे ह्यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या पैशाबाबतच्या श्रीमंती गरिबीच्या पूर्व अनुभवातून निर्माण होत...
#म@Vapurzaa
अपमान सहन करण्याची सहनशक्ती अपमानित होण्याच्या अनुभवाने वाढत जाते. समोरच्याला जरी ही सहनशक्ती निर्लज्जपणा वाटत असली तरी ती योग्य वेळी "प्रत्युत्तर" देण्याची क्षमता वाढवणारी ठरते...
#म@Vapurzaa