सरकारने 750 मराठा मुलांची मागणी मान्य करावी..ग्रामीण भागातून मुले मुली पुण्यात येऊन अभ्यास करतात त्यांचा राहण्याचा,खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, इतर समाजाला जो लाभ भेटतो तोच आम्ही मागतोय त्याला पण सरकार टाळाटाळ करतेय..@mieknathshinde साहेबांनी लक्ष द्यावे..@AjitPawarSpeaks
#मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या #सारथी संस्थेला मागील वर्षी मंजूर झालेल्या 300 कोटी निधीपैकी केवळ 44 कोटी खर्च करण्यात आले हे अत्यंत दुर्दैवी आहे. वसतीगृह उभारणी, 10 हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, अल्प भुधारकांसाठी शेतीपुरक व्यवसायांसाठी प्रशिक्षण, किसानमित्र इत्यादी अनेक योजना आहेत. मात्र त्या केवळ कागदावर राहिल्या आहेत. एकीकडे न केल्या कामांच्या जाहिरातीसाठी शंभर-शंभर कोटी खर्च करायचे तर दुसरीकडे #सारथीसारख्या महत्त्वाच्या संस्थेकडे दुर्लक्ष करायचे याची शासनाला लाज वाटली पाहिजे. शासनाने तात्काळ सारथी संस्थेचे रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लावून गरजू लाभार्थ्यांना लाभ द्यावा.
काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले", सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत." मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार ?
माझे सरकारला चार प्रश्न आहेत. त्याची उत्तर सरकारने द्यावी
प्रश्न १) 'सारथी'द्वारे पदवीसाठी ३० लाख, तर पीएचडी साठी ४० लाखांच्या मर्यादित शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ओबीसी व समाजकल्याण विभागाद्वारे परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शुल्क (रकमेची मर्यादा नाही), याशिवाय विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा, स्टेशनरी शुल्क, अर्जाचे शुल्क देण्यात येते. याला कोणतीही मर्यादा लावली जात नाही. मात्र, सारथीला मर्यादा का ? असा प्रश्न सरकारला आहे.
प्रश्न २) ७५ जागांसाठी फक्त ८२ अर्ज संस्थेला प्राप्त झाले आहेत. आपल्या जाचक अटींमुळे विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, तरी सारथीने मुदतवाढ का दिली नाही ?
प्रश्न ३) ओबीसी आणि समाजकल्याणसाठी पदवीला ५५ ते ६० टक्क्यांची अट, मग सारथीला ७५ टक्क्यांची अट का?
प्रश्न ४) जाहीरतीवर कोट्यावधी खर्च मग सारथीच्या योजनावरती का नाही?
@mieknathshinde@YuvrajSambhaji@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra
#MPSC च्या व समस्त स्पर्धा परीक्षा च्या विध्यार्थी वर्गाच्या मनातील भावना आपण कविता मधून tweet केल्या त्याबद्दल सगळ्या स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांनकडून @RRPSpeaks रोहित दादा पवार तुमचे मनापासून धन्यवाद..
👉 सरकारकडून विध्यार्थी वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत मुलांना सर्व परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत आणी पेपरफुटी वर कायदा करायला पाहिजेत ही खूप मोठी अपेक्षा सरकारकडून आहे. ती सरकारने पूर्ण करावी ही विनंती.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
अस कस चालेल फडणवीस साहेब ! आपण सत्तेत असताना परीक्षार्थी गरीब होते व आपण सत्तेत येताच ते श्रीमंत झाले का?
कृपया दुहेरी भूमिका न मांडता मानसिक तणाव झेलत,एक वेळ उपाशी राहून अभ्यासिकेत बसून बेरोजगार दिवस काढतात,आपण त्यांना दिलासा द्यावा🙏
#Exam_Fee@Dev_Fadnavis@SMungantiwar