मा.@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीच�� खेळखंडोबा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संव��्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,तहसीलदार,मुख्याधिकारी
होण्याचा अधिकार नाही काय?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केले.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D
व इतर category साठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट- ब व गट -क जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे चक्क 9 महिने ��ाहिरात
उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले.परिणामी त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
@Dev_Fadnavis महोदय ,
ह्या age bar candidates च काय करणार आहात ? त्यांच्या ��ुकसानीस
फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून
काय साध्य केले ?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 209 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क
शून्य जागा ????
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात
हरवल्या की काय ????
👉 1000 रुपये फीस च्या नावाखाली लुटले,form भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
माहित होते ना आचारसंहिता लागणार आहे.
मग ह्यांचा विचार का केला नाही ?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर नाहीत.
👉ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांना नियुक्त्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही ?
👉 आम्ही यापूर्वी वेळो���ेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय
काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता,आहे व असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकार�� गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024
कृषी विभागातील 258 राजपत्रित पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून अजूनही वित्त विभागाच्या उच्च स्तरीय मान्यता समितीने मान्यता दिलेली नाही.
258 जागांची भरती प्रक्रिया 2024 मध्येच राबवावी ही कृषी विभागाला कळकळ���ची विनंती.
#कृषी_जागा_वाढ_2024
@AbhiPawarBJP @dhananjay_munde @Dev_Fadnavis
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
आयोग पूर्व परीक्षा झाल्यावर SEBC उमेदवारांना EWS ➡️ SEBC विकल्प देणार असेल तर उद्या इतर प्रवर्गातील उमेदवार पूर्व परीक्षा अर्ज भरताना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे त्याने खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला असेल तर तोही खुल्या प्रवर्गातून त्याच्या प्रवर्गात विकल्प निवडण्याची संधी मागेल.
एकंदरीतच ��कदा पूर्व परीक्षा झाली की हा वादाचा मुद्दा होणार हे नक्की!
#SEBC_लिंक_ओपन_करा
@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
.@mpsc_office काय सुरू तुमचं हजारो रुपये खर्च करून उमेदवार पावसात आलेत आणि तुम्ही तांत्रिक अडचण सांगुन मोकळे वाह रे ��ाह....... उमेदवारांना न्याय द्या....#SKILLTEST
सर्व शासकीय नोकरभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबविण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ, ब आणि क दर्जाच्या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ओळखला जातो, विद्यार्थीवर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच ८००० लिपिक पदांची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठ्या भरती प्रक्रिया राबविण्याची क्षमता सिद्ध केली आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना केली.
याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मा उपमुख्यमंत्री महोदयांनी दिला आ���े. सर्व शासकीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय झाल्यास शासकीय नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसुत्रता येईल असा विश्वास आहे. #MPSC
"आयोगाचा रामभ��ोसे कारभार"
मा. @mpsc_office
@Drsuvarnas Ma'am
👉 नोव्हेंबर 2023 मध्ये मा.आयोगाने
' महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब व गट-क संयुक्त' पूर्व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 ला
पूर्व परीक्षा 16 जुन 2024 ला होणार
असे जाहीर केले होते.काय झाले त्याचे?????
आज 4 महिन्यानंतर जाहिरात तर दूरच पण अजून उमेदवारांना परीक्षेची नवीन ��ारीख सुद्धा माहित नाही.
आपण साधे दोन ओळीचे एक notification सुद्धा काढण्याचे कष्ट अजूनही घेतले नाहीत.
👉 आपले अधिकारी प्रसारमाध्यमाना सांगत आहेत (अर्थातच स्वतःचे नाव न सांगता)'
सरकारकडून मागणीपत्रक आले नाही'
स्वतःची जबाबदारी कायम सरकारवर ढकलून रिकामे व्हायचे हे एका संविधानिक संस्थेला खरंच शोभते काय???????
वेळेत मागणीपत्रक मागवून घेण्याची जबाबदारी मा.आयोगाची नाही काय??????
सरकारने आपणास सांगित��े काय की परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करू नका???????
👉सरकारने आपणास सांगितले काय दोन
ओळींचे एक notification काढून उमेदवारांना माहिती देऊ नका??????
👉 सरकारने आपणास सांगितले काय PSI मुख्य 2023 चा निकाल जाहीर करू
नका??????
👉 सरकारने आपणास सांगितले काय
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023व त्या सोबत झालेल्या इतर सर्व वर्णनात्मक मुख्य परीक्षेचे निकाल लावू नका?????
👉 सरकारनेच आपणास सांगितले होते काय समाजकल्याण जाहिरा�� प्रसिद्ध झाल्यानंतर एक वर्ष मुद्दाम परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करू नका?????
👉 सरकारनेच आपणास सांगितले होते काय :- संयुक्त अराजपत्रित गट -ब व गट -क ची Scheme of Exam अशी तयार करा ज्यात ��मेदवारांचे नुकसान होईल?????
👉 सरकारच आपणास सांगते काय कधीच स्वतःचे exam calender follow करू नका??????
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde @NANA_PATOLE
@Dev_Fadnavis
@RahulGandhi @kharge @INCIndia
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले साहेबांनी आज महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांना call करून खालील मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले
1. कालपासून सुरु झालेल्या पोलीस भरती उमेदवारांचे पावसामुळे प्रचंड हाल होत आहेत.त्या��ची राहण्याची व इतर व्यवस्था करावी
2.राज्यसेवा 2024 साठी डेप्युटी कलेक्टर,डीवायएसपी
सहित सर्व संवर्गाच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेत गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.
3.कर सहायक waiting list मधील मुलांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी
4. combined exam गृप b व गृप C
ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी व जास्तीत जास्त पदे याद्वारे भरण्यात यावेत.
@NANA_PATOLE @mieknathshinde @MahaDGIPR
@RahulGandhi @Dev_Fadnavis
अजितदादांसोबत जाऊन भाजपने #ब्रँड_व्हॅल्यू गमावल्याची टीका #ऑर्गनायझर मधून केल्याचं वाचनात आलं...
केवळ राज्यातच भाजपला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती पण भाजपची #ब्रँड_व्हॅल्यू ही लोकांनीच आणि संपूर्ण देशातच कमी केली. भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली हे मात्र वास्तव आहे आणि ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले त्या दिवसापासून आम्ही हेच सांगत होतो हे आज खरं होताना दिसत आहे...
#वापरायचं_आणि_फेकून_द्यायचं ही भाजपची जुनी सवय आहे आणि लोकांनाही हे आता माहीत झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलं...
@AjitPawarSpeaks
निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने विरोधकांना हरविण्याचे केलेले हरेक प्रयत्न अवघ्या देशाने पाहीले आहेत.उमेदवारांना देण्यात आलेल्या चिन्हांचा बाजार हा देखील त्यातीलच एक प���रकार.
आमच्या पक्षाने १० जागी उमेदवार उभे केले होते.तुतारी वाजवणारा माणूस हे आमचे चिन्ह होते.
त्यातील ९ जागी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना ट्रंपेट हे चिन्ह दिलं.या ट्रंपेट च मराठी भाषांतर तुतारी अस करण्यात आले.याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आल्या होत्या.
परंतु याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिलं नाही.परिणामी याचा मोठा फटका आमच्या उमेदवारांना बसला.
आमचे साताऱ्याचे उमेदवार श्री.शशिकांत शिंदे तर पराभूत झाले.साताऱ्यात तुतारी सदृश चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला मते मिळाली,३७,०६२.तर शिंदे यांचा पराभव झाला - ३२,७७१ मतांनी.
इतर ८ ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या मतधिक्यावर या गोष्टीचा मोठा परिणाम झाला.
माढा - ५८,४२१
बीड - ५५,८५०
शिरूर - २८,३३०
बारामती - १४,९१८
रावेर - ४३,९८२
नगर - ४४,९५७
भिवंडी - २४,६२५
दिंडोरी - १,०३,६३२.
अशी एकूण ४ लाख १४ हजार मते तुतारी सदृश चीन्हाला मिळाली.
येणाऱ्या विधानसभेत असा घोळ होऊ नये यासाठी पक्षीय पातळीवर योग्य ती पावले उचलण्यात येतीलच.
परंतु निवडणूक आयोग किती पक्षपाती काम कर�� होत,हे या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या लक्षात तर आले.
मा.@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची
#MPSC राज्यसेवा 2024 परीक्षा
संदर्भात
👉 मा. @mieknathshinde साहेब ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेतली होती.
विद्यार्थ्यांनी आंदोलने करून दोन extra
attempt मिळवले ,व नाईलाजाने सरकारला ते त्यांना द्यावे लागले.
याचा राग व आक��� मनात ठेवून सरकारने अत्यल्प पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करून हे दोन attempt वाया घातले आहेत,असे रोखठोक वास्तव आपल्यापुढे मांडले होते.
व आपण जागावाढ करून या उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या जागा द्याव्यात यासाठी विनंती केली होती.
व वेळ दिला होता.
👉 त्यानंतर फेब्रुवारीत या मागणीसाठी
पुण्यात संविधानिक मार्गाने एक आंदोलन पुकारण्यात आले होते.
पण @Dev_Fadnavis साहेब
पोलीस प्रशासनाने मुद्दाम या आंदोलनासाठी परवानगी तर दिली नाहीच वरून या राज्यसेवा उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
👉 हे उमेदवार वारंवार आपल्याकडे
जागावाढ साठी मागणी करत होते
आपण जाणूनबुजून दुर्लक्ष केले.
कशासाठी चालला होता हा अट्टाहास ??
👉 या उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष ,होत असलेला अन्याय, दोन attempt मिळूनही त्याचा फायदा न झाल्याची भावना ,सरकारकडून मागणीची दखल न घेण्याची वृत्ती
या सगळ्याचा राग या उमे���वारांमधे प्रचंड प्रमाणात आहे.
👉 @RVikhePatil
2014 मध्ये काँग्रेसकडून
राज्यसेवा जाहिरात 436 पदांची
प्रसिद्ध झाली होती.
ज्यात उपजिल्हाधिकारी :- 44
तहसीलदार :- 35
ना.तहसीलदार :- 227
मग तब्बल 10 वर्षानंतर हे आकडे कितीतरी पटीने वाढायला हवेत ना.
पण आपण तर फक्त या पदांचे
"शून्य" आकडा उमेदवारांना अर्पण करत आहात.
7 महिने उमेदवारानी सतत
मागणी केल्यानंतर आपण फक्त
7 उपजिल्हाधिकारी पदे वाढवली
त्यातही OBC व इतर category ���ा
भोपळा.
👉 मा.मंत्री महोदय @mieknathshinde मुख्याधिकारी
गट - अ,गट -ब हे दोन्ही संवर्ग चक्क
शून्य (ZERO )आहेत.
का हा अन्याय??????
यासोबतच पोलीस उपाधीक्षक
शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी,
महिला बालविकास विभाग गट:- अ सह
इतर महत्वाचे 17 संवर्ग जाहिरातीतून चक्क गायब आहेत.
👉 @DrVijayKGavit
आदिवासी विभागात अधिकाऱ्यांची गरजच उरली नाही काय?
उपसंचालक हे पद 2018 पासून राज्यसेवेत समाविष्ट केले गेले.
गेल्या 6 वर्षात एकदाही ह��� पद भरले गेले नाही.
Last attempt ला तरी हा संवर्ग
जाहिरातीत दिसणार आहे का?
👉गोरगरीब ,शेतकरी कुटुंबातील हे उमेदवार रात्रंदिवस अभ्यास करून
या परीक्षेची तयारी करत आहेत.
त्यांचा Last attempt असणार आहे.
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
ही माफक मागणी करत आहेत.
त्यांना त्यांच्या हक्काची पदे द्यावीत.
त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार झालाच पाहिजे.
त्यांना त्यांच्या हक्काची नौकरीची संधी देणे हे कल्याणका��ी राज्याचे तत्व आहेच.
महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याच्या संकल्पाला जनतेची साथ
📍 टिळक भवन, मुंबई
आज महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय, टिळक भवन येथे फटाके फोडून गुला�� उधळला व मिठाई वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना म्हणालो, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० वर्षांच्या अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला ही मोठी चपराक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असलेल्या महाराष्ट्राने खोक्याच��� व्यवस्था चालत नाही हे दाखवून दिले आहे. यावेळी समवेत राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री. नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. श्री. वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस श्री. प्रमोद मोरे, श्री. राजन भोसले, श्री. जोजो थॉमस, प्रदेश प्रवक्ते श्री. भरतसिंह, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. दयानंद चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आव्हान सोपं नव्हतं...
दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं.
मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला.
हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो !
🚩✌️
#बच्चा बडा हो गया!
काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सु���ारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!
बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌️हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #मविआ चे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.
या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!
@supriya_sule
@PawarSpeaks
#बारामतीची_जनता_विचारांसोबत_आणि_साहेबांसोबत
#मविआ
#तुतारी
#LoksabhaElection2024 #ElectionsResults #MahavikasAghadi #India_जीत_रहा_है
बारामतीच्या निवडणुकीसाठी #मविआ तील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आप आणि सपा या घटक पक्षांसह पाठींबा दिलेल्या वंचितचे मनापासून आभार!
आपल्या एकजुटीमुळं 🤝४ जून रोजीचा गुलाल ✌️आपलाच असेल!
सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही एवढं लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी.
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी,
पण आता जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी!
#नगरदक्षिण