भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पडत्या काळात लाठ्या-काठ्या खाल्ल्या..
झेंडे उचलले आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम केले..
त्यांची आज भाजप पक्षामध्ये काय परिस्थिती आहे पहा..👇👇
भाजपचा 'निष्ठावंत' खऱ्या अर्थाने भरडला जात आहे..
फक्त फडणवीसांच्या घाण राजकारणामुळे 💯✅
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांनी काल नागपुरात आंदोलन केल्यावर त्यांना बदडून काढण्यात आले, निवडणुकीत सरकारसाठी हे तरुण राबले त्याचे बक्षीस त्यांना देण्यात आले.
या तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का?*
काँग्रेस विधिमंडळ नेते यांचा सरकारला सवाल!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र��यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा सवाल उपस्थित केला.
निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली. यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती ���रकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं.
यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले.
सत्तेत येण्यासाठी महायुतीने राज्यातील युवांना नोकरीचे आश्वासन दिले. राज्यातील युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सारखी कंत्राटी योजना आणली गेली. पण या योजनेतील युवांचा गेल्या ��� महिन्यांपासूनचा पगार देखील सरकारने केला नाही. सोबतच कार्यकाळ संपल्यावर युवांना काय करायचं याबाबतही सरकारने कसलीही स्पष्टता दिली नाही.
परिणामी राज्यभरातील ��ुवांकडून आज नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. सदरील आंदोलक युवांच्या संतप्त भावना सरकारने समजून घेणे गरजेचे असताना सरकार मात्र 'गरज सरो वैद्य मरो' या प्रकारे निष्ठुरपणे वागत आहे. सरकारने तात्काळ आंदोलक युवांशी संवाद साधून काहीही विपरित घडणार नाही याची काळजी घेण्यासोबतच युवांचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती...!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिह���त आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे ��्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुख��ूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री स���ागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळ��� लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।
तिवसा बसस्थानकासमोर झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. नागपूरकडे मोर्चासाठी निघालेल्या तरुण प्रशिक्षणार्थीला असा जीवघेणा प्रसंग ओढवणं ही मोठी शोकांतिका आहे.
शोकाकुल कुटुंबीयांना मनःपूर्वक संवेदना. या कठीण प्रसंगी त्यांना धैर्य मिळो हीच प्रार्थना. 🙏
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते तात्काळ बदल करावेत, जेणेकरून संघर्ष न्यायाचा असला तरी किंमत कोणाच्याही जीवांची ठरू नये.
#महायुवाप्रशिक्षणार्थी. एकीकडे नगरपरिषद नगरपालिका या निवडणुकीमध्ये सातत्याने लाडकी बहीण लाडक्या भावाचा उल्लेख होत असते. रिचार्ज लाडक्या भावांना आज आंदोलन मोर्चे काढून दारोदारी फिरण्याची स्थिती निर���माण झाली. आणि फडणवीस साहेब आणि राज्य ��ासनाने याची दखल घ्यावी.