सबका साथ सबका विकास अशा लोभस घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या राज्यातील महायुती सरकारकड���न अल्पसंख्यांकांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे ही वस्तुस्थिती आहे. संख्येने अल्प असलेल्या समाजाला विकासाच्या महामार्गावर आणण्यासाठी मागील सरकारने स्वतंत्र अल्पसंख्यांक विभाग स्थापन केलेला असला तरी विद्यमान सरकारकडून त्यासाठी अत्यल्प निधीची तरतूद होत असल्याने मुख्य हेतू साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे या विभागासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना केली.
1️⃣अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनाने जरूर प्रधानमंत्री १५ कलमी योजनेची आखणी केली आहे मात्र महाराष्ट्रात जिल्हास्तरावर योजनेच्या नियमित बैठकाच होत नाहीत, त्या बैठका नियमित घेऊन अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला गती द्यावी, यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.
2️⃣ अल्पसंख्यांक समाजाला शासकीय नोकरीत योग्य प्रतिनिधित्व मिळाले आहे का याचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळवून द्यावे.
3️⃣ अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अपेक्षित असलेली, उर्दूगृह, मुले आणि मुलींची स्वतंत्र वस्तीगृहे, आणि प्रत्येक जिल्ह्यात मुले आणि मुलांची किमान एक निवासी शाळा, ही संकुले उभारली जावीत.
आदी मागण्या याप्रसंगी करून सरकार यासंदर्भाने सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
अल्पसंख्यांक समाजाला ते अल्प आहेत म्हणून त्यांच्यासाठी शासन अल्प तरतूद करणार नाही, या समाजाला ठराविक रेषेच्या वर आणण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री मा. श्री. नरहरी झिरवळ यांनी सदरील चर्चेला उत्तर देताना यावेळी दिली.
वाढती महागाई लक्षात घेऊन अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक भत्त्यात वेळोवेळी वाढ केली जाईल, मागास, आदिवासी, ओबीसी, विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने ठिकठिकाणी वस्तीगृहे उभारली जात आहेत त्याच धरतीवर अल्पसंख्याकांसाठीही वस्तीगृहे उभारली जातील. काही जिल्ह्यात अल्पसंख्यांक विद्यार्थिनी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू केल्या आहेत, उर्वरित जिल्ह्यातही अशा निवासी शाळा सुरू करीन त्यासाठी पुरेशा अनुदानाची व्य��स्था केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
#मुंबई #विधान_भवन
#महाराष्ट्र_विधिमंडळ
#पावसाळी_अधिवेशन2026
#Maharashtra #MonsoonSession2026
#MaharashtraGovernment
.
.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde @SunetraA_Pawar
@Narhari_Zirwal
ग्रामपंचायत संगणक परिचालकांना किमान वेतन नियम लागू करून त्यांच्या मानधनात वाढ करणार का?
मा. श्री. अमित देशमुख
आमदार, लातूर शहर विधानसभा
@AmitV_Deshmukh
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सकाळी विधान भवन परिसरात राज्याचे पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई यांची भेट झाली. समवेत आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर व इतर मान्यवर.
#मुंबई#विधान_भवन#महाराष्ट्र_विधिमंडळ
#पावसाळी_अधिवेशन2026
#Maharashtra #MonsoonSession2026.
.
@shambhurajdesai@UttamraoJankar
नांदेड, लोहा, अहमदपूर, लातूर फाटा या रेल्वे मार्गाची मागणी गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित आहे. त्वरित निधी उपलब्ध करून देत कामाचा सुरूवात करण्यात यावी.
मा. श्री. अमित देशमुख
आमदार, लातूर शहर विधानसभा
@AmitV_Deshmukh
महाराष्ट्र विधानसभा_निवडणूक_2019 ��ाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नियोजित प्रक्रियेनुसार
लातूर काँग्रेसभवन येथे पक्ष निरीक्षकासमक्ष उपस्थित राहून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी नोंदवली@INCIndia @INCMaharashtra
@kharge@bb_thorat @IYCMaha