नेहरू जी की लकीर छोटी करने की बातें करने वालों, कभी नहीं कर पाओगे…….सात जन्मों में नहीं कर पाओगे।
थोड़ा पंडित नेहरू के बारे में पढ़ो तब समझ में आयेगा नेहरू किस शख़्सियत का नाम है।
सकाळ समूहाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या युथ समिट २०२६ मध्ये एका विद्यार्थीनीने लोकनेते विलासराव देशमुख साहेबांवर सादर केलेली कविता ऐकताना मन अक्षरशः भारावून गेले. त्या कवितेतून साहेबांचे दूरदर्शी नेतृत्व, विकासाची दृष्टी, जनसामान्यांप्रती असलेली आपुलकी आणि त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अत्यंत सुंदर शब्दांत उलगडले गेले.
खरे नेतृत्व हे केवळ एका काळापुरते मर्यादित नसते; ते पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देत राहते. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनावर उमटवलेला ठसा इतका गडद आहे की, आजही नव्या पिढीच्या स्वप्नांमध्ये, विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये त्यांचे नाव जिवंत आहे.
.
.
#Loknete #VilasraoDeshmukh #ChhatrapatiSambhajiNagar #Sakal #Maharahstra
.
.
@SakalMediaNews
मध्यप्रदेश मधील काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन ह्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यांनी त्यांच्यावर असलेला गुन्हा लपवला असा आरोप भाजपने केला होता त्यावर निवडणूक आधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस ने ह्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे आणि काँग्रेस ने म्हंटले आहे की हा गुन्हा नव्हता फक्त नोटीस होते . ह्यावेळी काँग्रेस नेते सचिन पायलट, भूपेश बघेल आणि केसी वेणुगोपाल निवडणूक कार्यालयात गेले असता त्यांना प्रवेश दिला नाही त्यामुळे त्यांनी तिथेच धरणे आंदोलन सुरू केले आहे.
निवडून येण्यासाठी ५८ आमदारांची आवश्यकता होती आणि काँग्रेस कडे ६१ आमदार होते. घोडेबाजाराची शक्यता होती त्यामुळे काँग्रेस ने आपले आमदार बेंगलोर ला हलवले होते. परंतु आमदार फोडण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यानंतरही आमदार फुटत नसल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मदतीने मीनाक्षी नटराजन ह्यांचा अर्ज बाद केला असा आरोप काँग्रेस करत आहेत .
एका सर्व सामान्य महिलेला भाजप आणि नरेंद्र मोदी घाबरले आणि कारस्थान करून त्यांचा अर्ज बाद करून लोकशाहीची हत्या केली असेही काँग्रेसने म्हटले आहे.
दुसरीकडे झारखंड मधील भाजप पुरुस्कृत उमेदवार परिमल नाथवाणी ह्यांना आर्ज मधील दुरुस्ती करण्यासाठी उद्या ११ वाजे पर्यंतची मुदत दिली आहे .
निवडणूक आयोगाच्या ह्या दुहेरी भूमिके बद्दल आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहेत त्या मध्ये २०१८ पासून प्रत्येक निवडणूक ही संशयाच्या भोवऱ्यात आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
12 वर्षों की गरीब-विरोधी आर्थिक नीतियों और compromised विदेश नीति ने आज देश को ऐसे हालात में ला खड़ा कर दिया है जहाँ लाखों गरीब परिवारों और महिलाओं को लकड़ी के ज़हरीले धुएं की तरफ धकेल दिया गया है।
उज्ज्वला योजना में सब्सिडी वाले सिलेंडरों की संख्या 9 से घटाकर 4 कर दिया गया। उसपर पिछले 3 महीनों में घरेलू LPG सिलेंडर के दाम ₹89 बढ़ा दिया गया - मतलब, पहले दाम बढ़ाओ, फिर सब्सिडी घटाओ, गरीबों का चूल्हा बुझाओ।
प्रवासी मजदूरों की जीवनरेखा, 5 किलो का सिलेंडर भी ₹323 महंगा कर दिया - वो कमाएगा क्या, खाएगा क्या, और बचाएगा क्या?
अरबपति मित्रों को लाखों करोड़ों की कर्ज़माफ़ी दिलाना और गरीबों को अपनी नाकामियों का बिल थमाना - ये लूट का मोदी मॉडल है।
मोदी जी, क्या आपकी नाकामियों का बोझ सिर्फ गरीब उठाएंगे? क्या आपकी बनाई इस चरमराती अर्थव्यवस्था की कीमत मजदूर, किसान, महिलाएं और मध्यम वर्ग ही चुकाएंगे?
मृग नक्षत्राच्या प्रारंभिच काल रात्री आणि आज पहाटे लातूर जिल्हा आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या, या पावसामुळे आज सर्वत्र मातीचा सुगंध दरवळून मन प्रसन्न करणारे वातावरण तयार झाले आहे.
पावसाने सुरुवात चांगली केली आहे याच पद्धतीने वर्षभर भरपूर पाऊस पडावा, भरभरून शेती उत्पन्न निघावे. यातून शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समाधान निर्माण व्हावे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏
☔ पहिल्या पावसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ☔
#FirstRain #पावसाळा #पहिलापाऊस #शुभेच्छा 🌧️🌱
शिवसेनेचे आमदार, श्री बच्चु कडू यांनी “शेतकरी कर्जमाफी” बद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सदरील कर्जमाफी तुटपुंजी आहे
शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली होती त्याप्रमाणे कर्जमाफी केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले.
अवश्य बघा.
#BacchuKadu #कर्जमाफी #शेतकरी
राष्ट्रीय सचिव श्री सुरज हेगड़े जी के दुखद निधन की खबर सुनकर गहरा दुख हुआ। उन्होंने संगठन की निस्वार्थ सेवा अंतीम सासों तक की।
युवा कांग्रेस के प्रभारी रहते उन्होने मुझ जैसे कई युवाओं को संघटन मे काम करने का मौका दिया।
उनकी आत्मा को शांति मिले तथा उनके परिवार और प्रियजनों को इस कठिन समय में दुख सहने की शक्ति प्राप्त हो।
#SurajHegde
आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर तसेच जिल्हाभरातून आलेले नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, निमंत्रणे आणि निवेदने स्वीकारली, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात संबंधितांना सुचित केले आहे.
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
सार्थक 18 साल का है - पर सोच, साहस और सिद्धांत में किसी से कम नहीं।
उसने और उसके साथी निसर्ग ने वो कर दिखाया जो देश के बड़े मीडिया हाउस, खोजी पत्रकार नहीं कर पाए - CBSE और COEMPT की मिलीभगत को देश के सामने रख दिया।
मोदी जी चाहते हैं हमारे युवा reels बनाते रहें, पकौड़े तलते रहें, सवाल न पूछें, आँखें न खोलें। पर इन बच्चों ने सवाल भी पूछे। और जवाब भी ढूँढ निकाले।
देश का 18 साल का बच्चा CBI से तेज़ निकला - नौजवानों की ये जीत सही मायने में सरकार की हार है।
यही है भारत की असली युवा शक्ति - जिज्ञासु, जागरूक, जानकार। और याद रखिए, देश का भविष्य किसी बहकावे में नहीं आएगा।
विधान परिषदेच्या लातूर- धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. महेश देशमुख यांच्या प्रचारासाठी काल सायंकाळी लातूर जिल्ह्यातील मतदारांची #लातूर येथे व्यापक बैठक काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदरील बैठकीस उपस्थित होतो.
#AmitDeshmukh #Latur #Congress
कोणतेही प्रलोभन किंवा दबावतंत्राला बळी न पडता निर्भयपणे विधान परिषदेच्या लातूर धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, काँग्रेस महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असलेले श्री. महेश देशमुख यांना सुजान मतदारांनी विजयी करून लोकशाही व्यवस्था मजबूत करावी असे आवाहन काल लातूर येथे आयोजित प्रचार बैठकीच्या प्रारंभी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
विधान परिषदेच्या लातूर- धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. महेश देशमुख यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी लातूर जिल्ह्यातील मतदारांची लातूर येथे व्यापक बैठक घेण्यात आली. उमेदवार श्री. महेश देशमुख व लातूरचे लोकप्रिय खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि मान्यवरांसह या बैठकीस उपस्थित राहून, लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधी समवेत संवाद साधला. प्रारंभी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी श्री. महेश देशमुख यांना विजयी करण्यासाठी सहकार्य करावे. त्यांची ओळख व भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती केली.
महाराष्ट्रात निवडणूकच होऊ नयेत अशी राज्यातील सत्ताधाऱ्यांची सध्या भूमिका दिसून येत आहे. निवडणुका झाल्याच तर त्या बिनविरोध व्हाव्यात म्हणून, विरोधी उमेदवारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रलोभन झुगारून देणाऱ्या उमेदवारांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने विधान परिषदेचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.
लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी श्री. महेश देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांचे प्रलोभन आणि दबाव तंत्रही झुगारून दिले आहे, त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे सर्वजण सुजाण आहेत. ते लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव जुगारून, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील असा आपणाला विश्वास असल्याचेही याप्रसंगी सांगितले.
श्री. महेश देशमुख हे स्वतः विक्रमी मताधिक्याने जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. मतदार संघातील समस्यांची त्यांना चांगली जाण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या अडीअडचणी ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. त्यामुळे आपल्या तरुण सहकार्यांना मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंतीही यावेळी केली. लातूर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस पक्षाने आघाडी केलेली आहे त्यामुळे, लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीतही काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोबत राहील असा विश्वास याप्रसंगी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
#महाराष्ट्र #विधान_परिषद
#लातूर #धाराशिव #बीड
#स्थानिक_स्वराज्य_संस्था_मतदारसंघ
#INCMaharashtra
#Congress #MVA
#maharashtra
#IndianNationalCongress
.
.
@INCIndia@INCMaharashtra@INCHarshsapkal@INCMumbai@IYC@IYCMaha
अमरावती येथे NSUI च्या वतीने NEET, CBSE आणि इतर परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला.
पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील चूक नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर, मेहनतीवर आणि भविष्यावर झालेला अन्याय आहे. शिक्षण व्यवस्थेतील या गंभीर अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज विद्यार्थी, पालक आणि युवा वर्गाच्या मनातील संताप रस्त्यावर उतरला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या NSUI, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे आणि लढाऊ भूमिकेचे मनःपूर्वक कौतुक. अन्यायाविरोधात उभा राहिलेला हा जनआवाज अधिक बुलंद होणे हीच काळाची गरज आहे.
यावेळी NSUI राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, काँग्रेस कार्यसमिती सदस्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, विलास इंगोले, बबलू शेखावत, NSUI राज्य अध्यक्ष सागर साळुंखे, उपाध्यक्ष संकेत कुळत, प्रदेश सचिव अक्षत नंदर्धने, अमरावती जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष गौरव राठोड तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI चे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर तालुक्यातील खंडापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. कृष्णा कैले यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी तेथे ग्रामस्थांशी संवाद साधला, गावात रस्ते, नाल्या, वीज, दिवाबत्ती पाणीपुरवठा या व इतर मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने चालू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली.
ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आगामी काळात राबवायच्या विविध योजनांच्या नियोजनासंदर्भात विस्तृत माहिती घेतली. ज्या समस्या तातडीने सोडवणे शक्य आहे त्याची वेगळी नोंद घेतली. दीर्घकालीन उपयोगाच्या योजना संदर्भात प्रस्ताव दाखल करावेत असेही सांगितले. लातूर शहरानजीकच्या गावात शहरांप्रमाणे सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येतील, गाव ते लातूर शहर आणि मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात येतील, लातूर शहरातील सिटी बसचा विस्तार करून नजीकच्या गावातही व्यवस्था लवकरच पुरवण्यात येईल अशी ग्वाहीही या प्रसंगी दिली
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra