मराठी अस्मिताचा या कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाचा वाचा आहे. यातून उभी राहणारी काही रक्कम ही मराठीच्या मोठ्या प्रकल्पासाठी जाणार आहे. https://t.co/OTbonHzYfX
चार-पाच दिवसांपूर्वी मिलिंद जोशीने (@musicmilind) मला एका व्हिडिओची लिंक पाठवली. आमिर ख़ानच्या पानी फाउंडेशनच्या (@paanifoundation) एका कार्यक्रमाचा तो व्हिडिओ होता. जळगांवच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकाल्पातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी समीर सामंतने लिहिलेली आणि मी संगीतबद्ध केलेली पुष्कर श्रोत्रीच्या ‘उबुंटू’ या चित्रपटातली प्रार्थना सादर केली. आमिर ख़ान स्वतः अतिशय मन लावून या मुलांचं सुरेल वादन आणि गायन तर ऐकत होतेच पण जी गोष्ट मला भावली ती म्हणजे श्रोत्यांमधे बसलेल्या दिग्दर्शिका किरण राव यांच्या सह अनेक श्रोते ही प्रार्थना गुणगुणत होते. या प्रार्थनेचा दुवा मी खाली कमेन्ट्समध्ये देतोच आहे.
योगायोग असा की मिलिंदने जेव्हा मला ही लिंक पाठवली तेव्हा मी जळगांवला दीपस्तंभ फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये याच मुलांच्या सान्निध्यात होतो.
निमित्त होतं दीपस्तंभ फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचं परंतु खरा हेतू होता ते यजुर्वेंद्र महाजन याने जिद्दीने उभा केलेला ‘मनोबल’ हा प्रकल्प पाहणं आणि त्याची माहिती करून घेणं. माझ्याबरोबर कवी वैभव जोशीही अगदी याच हेतूने तिथे आला होता.
या प्रकल्पाची माझी पहिली ओळख करून दिली ते नविन काळे या माझ्या मित्राने. ३-४ वर्षांपूर्वी नविनने मनोबलची मुलं चित्त एकाग्र करून ‘हीच अमुची प्रार्थना’ गात आहेत याची एक व्हिडिओ क्लिप करून मला पाठवली होती. ती सर्व मुलं दिव्यांग होती पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं आणि आनंद होता, ते पाहून माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
मनोबल हा प्रकल्प दिव्यांग, अनाथ, ट्रान्स्जेन्डर, आणि समाजातल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असा पहिला निवासी शिक्षण प्रकल्प आहे. हे सगळे विद्यार्थी तिथे एकत्र राहून या शिक्षणाच्या यज्ञकर्मात भाग घेतात. दीपस्तंभ मनोबलचं जळगावातलं कॅम्पस हे दिव्यांगांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असं कॅम्पस आहे. प्रत्यक्ष वास्तुमध्ये तर सगळ्या प्रकारची दिव्यांगांना गरजेची असलेली accessibility आहेच पण त्यांच्यासाठी लागणारी शिक्षणसाधनंही state of the art म्हणता येतील अशी आहेत.
संध्याकाळी मी आणि वैभवने तिथे एक अगदी अनौपचारिक असा कार्यक्रम सादर केला. पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात ज्या नाज़नीन शेख या मुलीने ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गीत गायलं होतं त्याच मुलीने आमच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुरेल अशा गणेशस्तवनाने करून दिली. कार्यक्रम तर तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी उचलून धरलाच पण वैभवच्या प्रेमकवितांना जी उत्स्फूर्त दाद येत होती ते बघून माझं मनही भरून येत होतं.
दुसऱ्या दिवशी यजुर्वेन्द्रने मला माऊली अडकुर या दिव्यांग मुलीचा व्हिडिओ पाठवला ज्यात तिने माझ्या आणि वैभवच्या कार्यक्रमाला एक दिलखुलास दाद दिली आहे. ती दाद ऐकल्यावर मला आरती प्रभूंचे शब्द थोडे बदलून म्हणावंसं वाटलं - "दाद घ्या आणि शुद्ध व्हा!"
दीपस्तंभमधल्या वातावरणाने मी शुद्ध झालो. या एका दिवसामधे अनेकदा डोळे पाणवले, मन भरून आलं, गळा दाटून आला, चेहऱ्यावर निर्मळ हसू अनुभवलं. या एका दिवसामध्ये एका भावनांच्या रोलरकोस्टरमधून मी गेलो होतो - आनंद, हर्ष, कृतज्ञता, सहवेदना, अभिमान, दिलासा, आणि ज्या शब्दात मांडतात येणार नाहीत अशा हजारो संवेदना! केवळ एकाच भावनेला मनोबलच्या या विश्वात कुठेच थारा नव्हता. ती भावना म्हणजे - दया.
मीच त्या मुलांकडून प्रेरणा घेऊन परतलो.
ता.क. यजुर्वेंद्र सध्या अमेरिकेत एका व्याख्यान मालिकेच्या दौऱ्यावर आहे. बृहनमहाराष्ट्र मंडळाने ही मालिका आयोजित केली आहे. त्यानंतर परतीच्या वाटेवर तो नेदरलॅन्ड्समध्येही तीन व्याख्यानं देणार आहे. तिथल्या लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही कविता म्हणजे साक्षात शब्दवज्रच आहे. हे गीत मी अनेक वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित केलंं होतं ते नाटककार विद्याधर गोखले यांच्या सांगण्यावरून. अजित परब आणि ओंकार दादरकर हे गीत ‘अमृताचा वसा’ या आमच्या कार्यक्रमात गायचे. कमलेश भडकमकरने याचं संगीत संयोजन केलं आहे. १९९६ साली आम्ही हे महालक्ष्मीच्या ‘ला मुझीक’ नावाच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रित केलं. त्या वेळी फार अनुभवही नव्हता आणि खरं सांगायचं तर खिशात फार पैसेही नसायचे. तरी अनुपम घटक, सरोश आयझेड्यार, पं. उल्हास बापट, रमाकांत पाटील यांच्यासारख्या सहृदयी वादक कलाकारांमुळे आम्ही हे करू शकलो. आज ऐकताना काही प्रमाणात कच्चेपणा जाणवतो पण सावरकरांच्या शब्दाचं ओज इतकं आहे की त्यात माझ्या लहानसहान चुकांना आपल्या पोटात घेतलं आहे.
आता असं वाटतं की याचं पुन्हा एकदा उत्तम बजेटमध्ये ध्वनिमुद्रण करावं.
Anadi Mi Anant Mi
https://t.co/IBsl7MSJ0i
कवी अशोक बागवे यांच्या 'मौनाचा निःशब्द कोलाहल' या पुस्तक प्रकाशनाच्या ऑनलाइन समारंभात मी मांडलेलं मनोगत.
कौशल इनामदार मनोगत । ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ प्रकाशन समारंभ। अशोक बागवे। https://t.co/PVSDGS3xbj via @YouTube#मराठी
कवी अशोक बागवे यांच्या 'मौनाचा निःशब्द कोलाहल' या पुस्तक प्रकाशनाच्या ऑनलाइन समारंभात मी मांडलेलं मनोगत.
कौशल इनामदार मनोगत । ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ प्रकाशन समारंभ। अशोक बागवे। https://t.co/PVSDGS3xbj via @YouTube#मराठी
काल सुधीर फडके यांच्या जन्मदिवसानिमित्त केलेल्या ‘कौशलकट्टा’च्या विशेष भागाला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार! असाच लोभ असू द्या! 🙏🏽
https://t.co/B1uIFztK29
वाचनसंस्कृतीवर आपण बरंच बोलतो पण श्रवणसंस्कृतीबद्दल तितकंसं बोलणं होत नाही. ‘ऐकण्याची’ कला आपण काहीशी गृहित धरतो. आपलं ऐकणं कसं बदलत गेलं यावर एक मुक्त चिंतन - काल ज्यांना ऐकता आलं नाही त्यांच्यासाठी -
https://t.co/Bfl6ytoz8g
जगातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात जोवर #जागतिकसंगीतदिवस सुरू आहे तोवर तो माझ्यासाठी सुरू आहे असं मानायला काय जातंय? म्हणूनच या दिवसाबद्दल माझे काही विचार आणि एक व्हिडिओ सूचना. ऐका आणि शेअर करा!
https://t.co/VKNikW77zM
मराठी संगीतामध्ये नवी उर्जा यायची असेल तर ती मराठी साहित्य, चित्रपट, नाटक यातही झिरपण्याची गरज आहे.”
- कौशल इनामदार @ksinamdar
(एकविसाव्या शतकातील मराठी संगीतकार … आणि त्याचासमोर असणारी आव्हानं
संदर्भ : क्षितिज जसे दिसते…)
#जागतिकसंगीतदिवस#worldmusicday
“मराठी संगीतकारांचा पिंड हा रचनेच्या बाबतीत अधिक सूक्ष्मतेकडे धाव घेणारा आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं एक कारण मला असं वाटतं की मराठी मन हे ॲकॅडेमिक आहे.