खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
मराठी रंगभूमी, संगीत, साहित्य, कुस्ती आणि विविध लोककलांना त्यांनी उदंड आश्रय दिला. अनेक कलाकार, साहित्यिक आणि संगीतकारांना त्यांनी प्रोत्साहन देऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला नवी उभारी दिली.
राजे, विनम्र अभिवादन🙏🌺
शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचाराने त्यांनी सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शाळा आणि शिष्यवृत्ती सुरू केल्या. १९०२ मध्ये मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षण लागू करून त्यांनी सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिला.
#मराठी संस्कृती, शास्त्रीय संगीत आणि नाट्यपरंपरेच्या जतनासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे जीवन म्हणजे कला, समर्पण, साधना आणि संस्कृतीची अखंड सेवा यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
कोटी कोट�� प्रणाम! 🙏🌹
‘संगीत मानापमान’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत स्वयंवर’, ‘एकच प्याला’ यांसारख्या अनेक गाजलेल्या संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहेत. त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर मराठी संगीत नाटकाची कलात्मक उंची जगासमोर नेली.
मराठी पाऊल पडते पुढे....
देशातील सर्वात कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक असणाऱ्या सीए इंटरमिजिएट (CA)परीक्षेत महाराष्ट्रातील डोंबिवली चा शार्दुल शेखर विचारे भारतात पहिला आला (AIR 1) 👌
शार्दुल यांनी ६०० पैकी ५३१ गुण मिळवले तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटिंग मध्ये १०० पैकी १०० गुण.
महाराष��ट्रातल्या ग्रामिण भागातल्या तरूणांसाठी खास “स्टार्ट-अप्स इनक्युबेशन सेंटर” असायलं हवं.
अनेकांच्या पहिल्या वा दुसऱ्याच पिढीत आता कुठे शिक्षण पोहचलेय. उद्योग-व्यवसाय तर अजून लांब.
त्यातही विज्ञान-तंत्रज्ञान आधारित उद्योग फारच कमी. तरुणांना यात योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे.
मा. तुकाराम मुंढे सर, वरिष्ठ सनदी अधिकारी ( ias) यांच्या जीवनावर आधारित असलेले नवीन पुस्तक आपल्या न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस कडून प्रकाशित होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
संपर्क : 8830466300
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
#tukarammundhe#म#मराठी#वाचन
महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन! तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार.पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजानं चमकतच राहील ना ? - सुनीताबाई देशपांडे
त्यांचा आवाज केवळ कानांना आनंद देणारा नव्हता, तर तो मनाला स्पर्श करणारा होता. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांच्या आठवणींना स्वर दिले, माधुर्य दिले. सुमनताई यांचा स्वर भारतीय संगीताचा अमूल्य वारसा आहे. लता, आशा, रफी, मुकेश, मन्ना डे यांच्या सुवर्णयुगात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपानांवर आपले नाव अजरामर करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीतील एक मधुर, निर्मळ आणि सुरेल स्वर कायमचा आज हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
कोल्हापूरात एक प्रयोग करायचा.
१००/२००/५०० रूपयांच्या काही नोटांमधे जीपीएस चिप्स लावून ट्रॅक करायच्या.
त्या नोटा हमखास
मटनाचं ठिकाण,
मिसळ,
बेकरी,
चप्पल,
रंकाळ्यातल्या तलावावर फेरी मारून येणार म्हणजे येणारच!
तुमच्या गावात/शहरात असा पैसा कोणत्या दुकानातून फेरफटका मारून येऊ शकतो?
आज बुद्धपौर्णिमा ! 🙏
आयुष्यात हजारो लढाया जिंकण्याऐवजी तुम्ही जेव्हा स्वतःवर विजय प्राप्त कराल, तेव्हापासून प्रत्येक लढाईत विजय हा तुमचाच असेल..
#बुद्धपौर्णिमा
आज आपला #महाराष्ट्रदिन
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाने ही सुंदर संपन्न अशी महाराष्ट्रभूमी साकार झाली आहे. त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
तसेच आज 'जागतिक कामगार दिन' कामगार हक्क समर्थनार्थ आज कामगार दिन साजरा केला जातो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती....
जगण्याला जगण्��ाचा अधिकार मिळवून देणाऱ्या भारताच्या या महामानवाला त्रिवार वंदन 🙏
तुम्ही होता म्हणून आम्ही आज आहोत