MPSCचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षांच्या हॉल तिकीटवर आहे, त्या सर��व परीक्षांची तातडीने चौकशी करा!
MPSCच्या परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना, अवर सचिव अभिजीत लेंडवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षांच्या हॉल तिकीटवर आहे, त्या प्रत्येक परीक्षेची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे.
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते ��पाई, सुरक्षित साठवणूक, वितरण आणि परीक्षा प्रक्रियेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे फॉरेन्सिक ऑडिट झाले पाहिजे. ही मागणी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी नाही; तर लाखो विद्यार्थ्यांचा MPSCवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.
महाराष्ट्र काँग्रेसची मागणी स्पष्ट आहे - लेंडवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षांच्या हॉल तिकीटवर आहे, त्या सर्व परीक्षांची चौकशी झालीच पाहिजे!
@INCMaharashtra @mpsc_office @bhimanwar @Dev_Fadnavis @INCRojgar
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत ४० -४० लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे.
आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही.
आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office
ऑफलाईन परीक्षा, संविधानिक अधिकार!
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ आणि १६ नुसार सार्वजनिक रोजगारातील प्रत्येक उम��दवाराला समान संधी, निष्पक्ष प्रक्रिया आणि पारदर्शक भरतीचा अधिकार आहे. त्यामुळे MPSC परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय हा केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक विषय नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांशी संबंधित प्रश्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर ऑनलाइन परीक्षांचा निर्णय ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्याचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे ऑनलाइन परीक्षा नाकारली असताना, पुन्हा ऑनलाइन परीक्षेसाठी समिती स्थापन करणे हा विद्यार्थ्यांचा अपमान आणि त्यांच्याशी केलेली फसवणूक आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या आंदोलनाचा आदर करण्याऐवजी, त्यांच्या भावनांशी राजकीय खेळ खेळून तात्पुरती घोषणा करणे आणि पुन्हा त्याच ऑनलाइन परीक्षेचा मार्ग खुला ठेवणे ही गलिच्छ राजकारणाची पद्धत आहे. CBT परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध हा त्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नाही. प्रश्न आहे, त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीला पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी परीक्षा प्रक्रिया मिळणार आहे का? मागील दोन द���कांपासून MPSC ची ऑफलाइन OMR परीक्षा विश्वासार्हपणे घेतली जात असताना ती बदलण्याची तातडीची गरज काय? महापरीक्षा पोर्टल का बंद करण्यात आले? TCS आणि IBPS सारख्या संस्थांकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या पारदर्शक निकषांवर देण्यात आली? ऑनलाइन परीक्षांबाबत वारंवार प्रश्न निर्माण झाले असताना त्याच पद्धतीचा आग्रह का?
सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक, निःपक्षप��ती आणि मनमानीपासून मुक्त असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. CBT पद्धत स्वतःच घटनाबाह्य आहे असा दावा नाही; मात्र कोणतीही परीक्षा पद्धत असो, ती संविधानाच्या अनुच्छेद १४ आणि १६ मधील समानता व समान संधीच्या तत्त्वांशी सुसंगत असली पाहिजे. ऑगस्ट २०२७ नंतर पुन्हा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय हा कायमस्वरूपी तोडगा नाही. हा विद्यार्थ्यांचा आजचा प्रश्न उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न आहे. २०२६ मध���ये ७० हजार पदांची भरती कधी होणार? सरळसेवा भरती २०२६ मध्येच MPSC मार्फत होणार आहे का? सरकारने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे. आज राज्यातील लाखो विद्यार्थ्यां��ध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या मेहनतीशी, भविष्याशी आणि भावनांशी केलेल्या या राजकीय फसवणुकीची किंमत सरकारला मोजावी लागेल. जमावबंदी लावून विद्यार्थ्यांचा आवाज दडपता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या भावनांशी राजकारण करून त्यांना कायम फसवता येणार नाही.
प्रश्न केवळ ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन परीक्षेचा नाही. प्रश्न आहे, घटनात्मक समान संधीचा, पारदर्शकतेचा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष��याचा. कितीही दडपशाही करा, ऑनलाईन परीक्षा आम्हाला मान्य नाही. विद्यार्थ्यांचा विश्वासघात आणि फसवणूक "महाराष्ट्र" कधीच मान्य करणार नाही.
@INCHarshsapkal@satejp @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @mieknathshinde_ @SunetraA_Pawar @CongressRojgar @MahaChiefSec
#OnlyOfflineExam #MPSC #MPSC_Offline
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठल��ही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात ��ुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नां��ी उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या आंदोलना��ा उपस्थित राहून संबोधित केलं आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. MPSC कडून होणारी ऑनलाईन परीक्षापद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची TET रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी तसंच MPSC कडं वर्ग कलेल्या ३ आणि ४ च्या पदांच्या भरतीसाठीचा सिलॅबस जाहीर करावा, वेगवेगळ्या परिक्षांसाठी वेगवेगळं शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्यात यावं आदी मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या आहेत.
या सर्व मागण्यांसाठी सरकारकडं वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून आणि विधानसभेतही याबाबत आवाज उठवला आहे. परंतु सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेवटी आज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. १२ जुलैपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यानंतर यापेक्षाही अधि��� मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ��ेण्यात आला. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं, अपेक्षा आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. आम्ही मात्र सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायम लढत राहू...!
यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. नितेश कराळे सर, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, रविकांत जी तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, म���.आ.सुनील भुसारा, मा. आ.संजय काळे, मा. आ. संजयभाऊ वाकचौरे, पंकजनाना बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे, यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अनेक मान्यवर मंडळी आणि राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MPSC #mpscstudents #पोलीसभरती #TETExam #chhatrapatisambhajinagar
MPSC ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व आक्र��श उसळला आहे.
हा केवळ जमाव नाही, तर लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचा आवाज आहे. हीच विद्यार्थ्यांची एकजूट MPSC ला अन्यायकारक निर्णय मागे घ्यायला भाग पाडेल. आता तरी MPSC आणि राज्य सरकारने या निर्णयाचे गांभीर्य ओळखावे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा नाही, तर ऐकण्याचा आणि अभियांत्रिकीसह सर्व MPSC भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
विद्यार्थ्यांचा सं���र्ष न्यायासाठी आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या संघर्षात ठामपणे विद्यार्थ्यांसोबत उभी आहे.
@INCHarshsapkal @satejp @bhimanwar @imshivrajmore @SalunkeSagarK