जनतेचा विश्वास, पदवीधरांचा कौल आणि नव्या जबाबदारीचा संकल्प..!
संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातून माझ्या विजयाचा हा क्षण केवळ आनंदाचा नाही, कृतज्ञतेचा आणि नव्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.
मी, डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या प्रत्येक पदवीधर मतदाराप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
हा विजय माझा एकट्याचा नाही. हा विजय त्या प्रत्येक पदवीधराचा आहे, ज्याने आपल्या भविष्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि शिक्षण, रोजगार व विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला. हा विजय त्या तरुणाईचा आहे, जिच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, त्या विद्यार्थ्यांचा आहे, ज्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी हव्या आहेत, तसेच त्या सर्व शिक्षकांचा, सुशिक्षित नागरिकांचा आणि परिवर्तनाची अपेक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.
या निवडणुकीत अनेकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. अनेक सहकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, हितचिंतक आणि माझ्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक हाताचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि पदवीधरांच्या विश्वासातून हा ऐतिहासिक टप्पा गाठता आला.
आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आपल्या अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही आणि आपल्या प्रश्नांपासून दूर जाणार नाही, हा माझा प्रामाणिक संकल्प आहे.
पुन्हा एकदा, माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व पदवीधर मतदारांचे, महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार..!
मराठवाड्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करूया
आपला विश्वास, माझी जबाबदारी
आपल्या अपेक्षा, माझा संकल्प
आणि पदवीधरांचे हित, माझे सर्वोच्च प्राधान्य
आपला..!🙏
डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील
संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ
#मराठवाडा
‘ॲटॉमिक हॅबिट्स’मधील २० शिकवणी
१. लहान-लहान विजयांची बेरीज म्हणजे यश.
२. आधी आपण आपल्या सवयी घडवतो; नंतर आपल्या सवयी आपल्याला घडवतात.
३. थोड्या काळाच्या तीव्र प्रयत्नांपेक्षा सातत्य अधिक प्रभावी ठरते.
४. चांगल्या सवयी अंगीकारण्याच्या मार्गातील अडथळे दूर करा.
५. आपल्या सवयींची नियमित नोंद ठेवण्याची कला आत्मसात करा.
६. आपल्या कामाचे वातावरण अधिक अनुकूल बनवा.
७. चांगल्या सवयी रुजण्यासाठी वेळ लागतो.
८. आपली संगत काळजीपूर्वक निवडा.
९. कष्टाने साधलेली प्रगती स्वतःच्या चुकांमुळे गमावू नका.
१०. योग्य कृती सहज करता येईल, असा कमीत कमी अडथळ्यांचा मार्ग तयार करा.
११. तुम्हाला तुमच्या बांधिलकीची जाणीव करून देणारा आणि प्रगतीचा आढावा घेणारा साथीदार शोधा.
१२. ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेवर प्रेम करा.
१३. जिंकणाऱ्यांची आणि हरणाऱ्यांची ध्येये अनेकदा सारखीच असतात.
१४. यश ही जीवनशैली आहे; एखादी एकमेव घटना नाही.
१५. नुसते बोलणे सोपे असते; तुमची खरी ओळख तुमच्या कृतींतून ठरते.
१६. चांगल्या सवयी विकसित होण्यासाठी वेळ लागतो.
१७. तुम्ही स्वतःला जसे समजता, त्यातूनच तुमचे भविष्य घडते.
१८. तुमचे परिणाम म्हणजे तुमच्या सवयींचा काही काळानंतर दिसणारा प्रभाव.
१९. आज तुम्ही कुठे आहात, यापेक्षा कोणत्या दिशेने वाटचाल करत आहात, हे अधिक महत्त्वाचे आहे.
२०. तुम्ही केवळ ध्येये उंच ठेवल्याने त्या उंचीवर पोहोचत नाही; प्रत्यक्षात तुमच्या दैनंदिन कार्यपद्धतीच्या पातळीइतकीच तुमची कामगिरी होते.
या ७ गोष्टी केल्यात, तर ६० दिवसांत तुमच्या आयुष्यात प्रचंड बदल दिसेल!
१. २१ दिवस रात्री १० नंतर फोन वापरू नका.
फोन बाजूला ठेवा. मेंदूला खऱ्या अर्थाने विश्रांती घेऊ द्या.
२. दररोज ३० मिनिटे चाला.
साधे चालणेसुद्धा ऊर्जा, मनःस्थिती आणि एकाग्रता सुधारते.
३. दररोज १० पाने वाचा.
नियमित थोडेसे वाचन करण्याची सवय तुमची विचारशक्ती विकसित करते.
४. दररोज सकाळी सर्वप्रथम पाणी प्या.
चहा, कॉफी पिण्याआधी भरपूर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.
५. दररोज सकाळी ३ उद्दिष्टे लिहा.
उद्दिष्टे स्पष्ट असली की कृतीची दिशाही स्पष्ट होते.
६. या आठवड्यात लक्ष विचलित करणारी एक गोष्ट दूर करा.
तुमचा वेळ वाया घालवणारी एखादी सवय सोडा.
७. दररोज रात्री ७–८ तास झोपा.
चांगली झोप हा इतर सर्व गोष्टींचा पाया आहे.
आजपासून सुरुवात केलीत, तर ६० दिवसांनंतर तुम्हाला या निर्णयाचा आनंद होईल!
मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं.. 27 हजार रुपये पर हेक्टरच्या घोषणा झाल्या… पण दिवाळीला फक्त 940/- मिळाले.
धायमोकलून रडतानाही डोळ्यातून थेंब खाली पडू दिला नाही म्हाताऱ्याने! इथे दुष्काळ जाणिवांचा आहे.. भावनेचा आहे.
#मराठवाडा#दुष्काळ
@vnpatilofficial साहेब, मागील 6 महिन्यांपासून व्याज परतावा जमा नाही.शासन तो व्याज परतावा जमा का करत नाही त्याच उत्तर भेटायला तयार नाही.जर वेळेवर व्याज परतावा आला तरच नवीन उद्योजक उद्योग करतील. नवीन LY निघत नाहीत.
डिसिप्लिन म्हणजे मनाविरुद्ध जाणे!
मन म्हणते आराम करूया पण आपण काम करत राहणे.
मन म्हणते सोडून देऊ या पण आपण टिच्चून काम चालू ठेवणे.
मन म्हणते उद्या/ नंतर करू पण आपण आत्ताच सुरू करायचे.
ही अशी शक्ती आहे जी अशक्याला शक्य करून टाकते.
डिसिप्लिन म्हणजे आपले मन म्हणजे आपण नव्हे हे लक्षात घेणे, अनुभवातून शिकत जाणे.
आपले मन म्हणजे मी नव्हे.
.मनात आलेला प्रत्येक विचार अंमलात आणणे माझ्यावर बंधनकारक नाही हे शिकणे, आत्मसात करणे यात ताकदवान होण्याचे रहस्य आहे.
आपण मनाप्रमाणे नाही तर मनाला आपल्याप्रमाणे करायला भाग पाडणे ही खरी साधना आहे.
जस्टिस स्वर्णकान्ता शर्मा जी से न्याय मिलने की मेरी उम्मीद टूट चुकी है।
अपनी अंतरात्मा की आवाज़ सुनते हुए, गांधी जी के सिद्धांतो को मानते हुए और सत्याग्रह की भावना के साथ, मैंने फ़ैसला किया है कि मैं इस केस में उनके सामने पेश नहीं हूंगा और कोई दलील भी नहीं रखूँगा।
महिलाओं के पीछे छिपकर सरकार परिसीमन बिल पास कराना चाहती है।साफ़ शब्दों में क्यो नहीं कहते कि,महिला आरक्षण 2023 में पारित हो चुका है।543 सीटों में सरकार महिलाओं को 33 % सीटें देना नहीं चाहती ! महिलाओं के नाम पर हम 850 सीटें बढ़ाना चाहते हैं ताकि 2029 का चुनाव सिर्फ़ उत्तर भारत के भरोसे जीत सके !
ईडी, कारखान्यांच्या बँक गॅरंट्या यांच्या जीवावर होतो तो राजकीय दहशतवाद.
मागच्या अकरा वर्षांत राजकीय डावपेचांची जागा ह्या दहशतवादाने घेतली आणि यालाच राजकारण समजण्याची सवय समाजाला लावली गेली.
केवळ बुद्धीच्या जोरावर या दहशतवादाला आव्हान देणे हाच या युगाचा राजधर्म आहे!
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे वास्तव पहिले. गावोगावी जाऊन दिसलेली दृश्यं हृदय पिळवटून टाकणारी होती. शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.
उभं पीक पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नष्ट झालं आहे. अनेक शेतकऱ्यांनी केलेला खर्च एका क्षणात वाहून गेलं. केवळ पीकच नाही, तर शेताला जीवन देणारी उपजाऊ मातीही पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली. शेतात बसवलेले सोलर पंप आणि इतर सिंचनाची साधनं उखडून गेली आहेत. शेतकऱ्यांचे आधार असलेली जनावरेही या संकटाला बळी पडलीत. घरांच्या, दुकानांच्या भिंती कोसळल्या आहेत.
याहूनही वेदनादायक म्हणजे पंचनाम्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. शेतकरी ढासळलेल्या मनःस्थितीत सरकारकडे मदतीसाठी डोळे लावून बसले आहेत. सरकारने त्यांची आर्त हाक ऐकावी ही विनंती🙏🏼
#ओला_दुष्काळ_जाहीर_करा @NCPspeaks
आज वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते
ndrf च्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले..!
या कार्यात ndrf च्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!
#अतिवृष्टी #नुकसान #परांडा
यातल्या बहुतांश विषयांवर मी पुर्वी लिहिले आहे पण आता एका ठिकाणी सर्व मिळाले म्हणुन पुन्हा टाकतो आहे. त्यापैकी कोणतेही एक वापरून काम करायला सुरुवात करा आणि प्रत्येक दिवशी अधिक उत्पादक, अधिक परिणामकारक बनत जा !
१.
करियरच्या-व्यावसायिक आयुष्याच्या सूरूवातीला अत्यंत क्लिष्ट (टेक्निकली कॉम्प्लेक्स) प्रॉब्लेम्स सोडवायच्या भानगडीत पडू नये.
अगदी पायाभूत गोष्टी सोप्या करायला शिकायचे, नव्या पद्धतींचा अवलंब करत, जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह व्हायचं!
आपोआपच मग बौद्धिक आणि आर्थिक प्रगतीला वेग येतो.
चांगले नातेसंबंध निर्माण करायचे आहेत? प्रभावी संवाद शिकायचा आहे?
तर रॅपोर्ट हे पुस्तक नक्की वाचा. आपल्याला अनेकदा वाटतं की पुस्तक वाचायला वेळ नाही म्हणूनच हा सारांश खास तुमच्यासाठी अगदी मोफत.
मिळवण्यासाठी फक्त RT करा, आणि लिंक DM द्वारे पाठवली जाईल.
खूप कमी पुस्तके असतात कि जे भूत-वर्तमान-भविष्य समोर ठेवतात!📚
जगातली सगळ्यात मोठ्या कंपनीची प्रगती कशी खुंटली?
स्पर्धेत टिकण्यासाठी काय बदल करावे लागले?
त्यात सत्या नाडेला ह्यांचा सहभाग आणि भविष्यात तंत्रज्ञान काय करू शकेल?
ह्या सगळ्याविषयी उत्सुकता असेल तर हे पुस्तक वाचा!📖
अगदी बरोबर आहे पण त्यासोबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मर्यादांचा तुरुंग आपण स्वतः बांधलेला असतो, आखलेला असतो. त्या भिंती आपण स्वतः निर्माण केलेल्या असतात.
अर्थात त्यात आपला भूतकाळ, आपला सभोवताल, आपले फॉर्मल इन्फॉर्मल शिक्षण यांचे सुद्धा मोठे योगदान असते.
पण ते निष्कर्ष आपण स्वतः काढलेले असतात आणि तीच वस्तुस्थिती आहे असे समजून आपण वावरत असल्यामुळे त्या मर्यादा आपण स्वतःवर घालून घेतलेल्या असतात.
एकदा हे लक्षात आले की आपण आपल्या तुरुंगाच्या भिंती पाडून नव्या भिंती निर्माण करू शकतो. त्या आपण आपल्याला हव्या तशा सजवू शकतो.
एकदा या विचार प्रक्रियेत गेले की कष्टाची भावना कमी होते किंवा कष्ट जाणवत नाहीत.
मी शिक्षणामध्ये अत्यंत सुमार कामगिरी असलेले किंवा रडत खडत शिक्षण पूर्ण केलेले लोक यूपीएससी पास झालेले बघितले आहेत किंवा खाजगी क्षेत्रात नॅशनल हेड झालेले माझे काही मित्र आहेत.
म्हणजे कुठल्यातरी टप्प्यावर त्यांनी स्वतःभोवतालचा स्वनिर्मित तुरुंग तोडला आणि स्वतःच्या क्षमतांच्या बाबतच्या धारणांची यशस्वीरित्या पुनर्रचना केली.
आपण मानसिक दृष्ट्या सशक्त असल्याची 12 लक्षणे
१) एखादी गोष्टी योग्य केल्याबद्दल समाधान होण्यासाठी दुसऱ्याच्या मान्यतेची आवश्यकता नसते.
२) सशक्त व सुदृढ जीवनशैली ठेवायचा प्रयत्न करतो.
३) तात्पुरत्या डिस्ट्राक्षण्स ( स्क्रिन्स व्हिडिओ गेम इत्यादी ) कडे दुर्लक्ष करून वैयक्तिक ध्येयाला प्राधान्य देतो.
४) त्रासदायक, विषारी व्यक्तींना दूर ठेवून इतरांशी सुदृढ संबंध ठेवतो.
५) आपल्यासारख्या मानसिकतेच्या व आपली वाढ व यश यासाठी मदत करणाऱ्या, इच्छा असणाऱ्या लोकांशी मैत्री करतो.
६) कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो व दुसऱ्यांच्या मतांना त्याच्यावर प्रभाव पडू देत नाही.
७) स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो आणि स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल इतरांना दोष देत नाही, जबाबदार धरत नाही.
८) निर्णय विचारांची स्वतः घेतो व त्याला दुसऱ्याच्या व्हॅलिडेशनची आवश्यकता नसते.
९) सातत्याने स्वशिक्षणावर भर देतो त्यासाठी वाचन, नवीन तंत्र आत्मसात करणे यासारख्या बाबींचे शोधात असतो.
१०) मानसिक स्वास्थ्यासाठी, मन खंबीर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो त्यासाठी चे तंत्र ( मेडिटेशन, माईंडफुलनेस इत्यादी ) आत्मसात करतो, अपडेट करत राहतो.
११) शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम, खेळणे याच्यासाठी वेळ दररोज वेळ काढतो.
१२) स्वयंशिस्त व सातत्य ठेवण्यासाठी सातत्याने सबबी व कारणांवर मात करत प्रयत्न करत राहतो.
वरीलपैकी बाबी आपण करत असल्यास आपण मानसिक दृष्ट्या अत्यंत सक्षम व सशक्त आहात असा त्याचा अर्थ होतो. तसेच वरील बाबी आपण आपल्या आयुष्यात आत्मसात करायला सुरुवात केल्यास आपोआप मन सक्षम व सुदृढ होण्यास सुरुवात होते.
डॉ प्रशांत भामरे.
डॉ श्रीराम लागू यांचा हा व्हीडिओ फक्त दोन मिनिटांचा, झोपलेल्या अंतर्मनाला जागे करून स्पष्ट विचार करायला लावणारा संवाद, म्हणून अधूनमधून पुन्हा पुन्हा पहावा असा, त्यातील वैचारिक शिदोरी सुज्ञ माणसाला आयुष्यभरासाठी नवजीवन देणार 🌹🙏