ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि #मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचं आज निधन झालं.
मराठी भाषेवरील निस्सीम प्रेम आणि व्याकरणशास्त्राचा सखोल व्यासंग हे त्यांच्या प्रदीर्घ कार्याचे वैशिष्ट्य होते. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी शब्दलेखनकोश’ यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांमधून तसेच ‘अंतर्नाद’च्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी मराठी लेखनविश्वाला मार्गदर्शन केले.
प्रमाणभाषेचा आग्रह, शुद्धलेखनाची शिस्त आणि भाषाविज्ञानाच्या माध्यमातून व्याकरण अधिक सहज समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न पुढील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा आहे.
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आयुष्यभर ज्ञानसाधना करणाऱ्या #भाषायोगिनी यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏
मोरूच्या मावशीच्या भूमिकेत साडी नेसून केलेला ‘टांग टिंग टिंगा’ डान्स, जत्रामधील ‘कान्होळे’, पछाडलेला एक डोळा बारीक करुन 'मालक, मालक’ करत किरकिर करणारा 'किरकिरे', श्रीमंत दामोदरपंतचे 'गणपत' अशा असंख्य भूमिकेतून अजरामर झालेले
अभिनेते #विजयचव्हाण यांना आज स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
𝙈𝙖𝙮𝙖 is the illusion of measurement.
The One appears as many because we measure it.
Our senses create the illusion of manyness while actually residing in Oneness.
The mind divides what is Whole, then forgets it ever did.
It names the Waves and loses sight of the Ocean.
कधी कधी मोठ्या बदलाची सुरुवात मोठ्या यंत्रणेतून नाही, तर एका छोट्याशा कल्पनेतून होते…
कोपरगाव येथील संजिवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२वीत शिकणाऱ्या साईश्रद्धा अरविंद साळमुठे हिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी प्रवाशांना बसच्या वेळा व रिअल-टाइम बस अपडेट्स सहज उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संपूर्ण प्रणालीचा वापर QR Code च्या माध्यमातून करता येतो. प्रवाशांनी QR Code स्कॅन केल्यानंतर कोणतेही साइन-अप किंवा लॉगिन न करता थेट वेबसाइटवर जाऊन आपल्या बसच्या वेळा व उपलब्ध माहिती पाहता येते.
या प्रकल्पासाठी तिला भारत सरकारकडून Utility Patent देखील प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रवासी या सुविधेचा उपयोग करत आहेत. सध्या हे सॉफ्टवेअर अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. विशेष म्हणजे, एवढे उपयुक्त सॉफ्टवेअर विकसित करूनही तिने त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची मागणी केली नाही. तिच्या या कार्याची दखल घेत, तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली.
एका १२वीच्या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी केला, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
एका बाजूला स्वतःच्या ज्ञानातून समाजाला काहीतरी देण्याची तिची भावना आणि दुसऱ्या बाजूला तिच्या शिक्षणाला आधार देण्याची ही संधी… हा क्षण निश्चितच मनाला भावणारा आहे. आज तिच्या हातातील कौशल्याला प्रोत्साहन मिळाले आहे, उद्या हेच कौशल्य समाजाच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास आहे.
#PratapSarnaik #TransportMinister #MaharashtraST #YouthPower #Innovation
@msrtcofficial