Corrupt people are the biggest anti nationals . These are the people who steal land, money , resources belonging to Indians for their personal use . Once they get the resources and power they started calling those people anti national who oppose corruption!
Demanding immediate administrative intervention over chronic traffic snarls and hazardous road conditions, hundreds of IT professionals, resident welfare associations, and local citizens from Hinjawadi, Maan, and Marunji organized the peaceful ‘Smart IT City Sankalp Morcha’. Marching with placards stating ‘We Want Safe Roads, Not Promises’ and ‘So Sad We Have to Fight for the Basics’, the demonstrators highlighted the daily ordeal faced by lakhs of commuters traveling to Rajiv Gandhi Infotech Park. The key demands raised include a complete peak-hour ban on heavy vehicles like dumpers and RMC mixers, urgent road widening, permanent repairs of crater-like potholes, deployment of adequate traffic police personnel, and accelerated completion of pending civic and metro infrastructure to prevent fatal road accidents.
#Pune #Hinjawadi #ITPark #PuneTraffic #PCMC
Participated in the Hinjewadi residents and IT sector employees morcha today.
As of 2026, the residents and IT Sector employees who live here have to protest for piped water, waste management, traffic snarls and for better roads.
The Metro is due for inauguration but not getting VIP dates for the same. The roads beneath the Metro lines are horrible.
And this is the premier wealth creation mode of India.
The CM apparently had promised better facilities last year but things remain unchanged.
It’s only when we choose to protest, things move a bit, and we will keep at it till the regime wakes up to serve the people and deliver on the basics, and the promises!
🚨 उद्याच्या हिंजवडी रहिवासी मोर्च्याला पाठींबा! 🚨
काही दिवसांपूर्वी मी हिंजवडीला स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भयंकर वाहतूक कोंडी, नियमित न उचलला जाणारा कचरा, हाऊसिंग सोसायट्यांना अपुरा पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांचा अभाव, ह्या सगळ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
ज्या हिंजवडीला आपण देशाच्या IT सेक्टरचं नाक म्हणतो, त्याच हिंजवडीत शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
फॉर्च्युन 500 कंपन्या असो किंवा स्टार्टअप्स असो आणि ये-जा करणारे लाखो नागरिक असलेल्या ह्या परिसराची ही अवस्था किती दिवस अशीच राहणार?
⚠️ मेट्रोच उदघाटन पेंडिंग, रस्त्याचे खड्डे आणि दुरवस्था तशीच, ट्राफिकसाठी कॉन्स्टेबल तैनात नाहीत. ⚠️
🚨 जर इथून ह्या कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला तर असलेल्या रोजगारांचं काय? 🚨
मुख्यमंत्री काल हिंजवडी जवळ आले पण आयटी सेक्टरमधील हिंजवडीत राहणाऱ्यांना भेटलेच नाहीत!
त्यांना भेटण्याऐवजी आपल्या परिसरासाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांना घरातच बंदिस्त केल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.
उद्याच्या स्थानिक नागरिकांच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. हिंजवडीच्या नागरिकांसाठी लढण्याचा आमचा इरादा पक्का आहे.
Sad to see my Maharashtra become the state it has become. Full of Goons. If Govt of Maharashtra doesn’t take strict action we are doomed for a long time.
जागतिक स्तरावर पुण्याची ओळख 'आयटी हब' म्हणून करणाऱ्या हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसराची दूरवस्था झाली आहे. रस्त्यांची बिकट अवस्था, दररोजची प्रचंड वाहतूक कोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक रहिवाशांना मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. येथील दूरवस्थेबाबत मी स्वतः शासन आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. गेल्या २ वर्षांत खड्डे आणि अपघातांमुळे २० पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, तरीही राज्य सरकारला जाग येत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे.
गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध आस्थापनांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत 'सिंगल पॉईंट अथॉरिटी' नेमण्याची घोषणा झाली. परंतु, वर्षभरानंतरही या अथॉरिटीच्या माध्यमातून एकही मुख्य प्रश्न सुटलेला नाही. PMRDA, महापालिका, MIDC आणि PWD यांच्यात समन्वय नसल्याने कामे रखडली आहेत. परिणामी येथील उद्योग इतरत्र जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मोठ्या परिश्रमाने आणि दूरदृष्टीने उभारलेला येथील आयटी उद्योग केवळ पायाभूत सुविधांच्या दुर्दशेमुळे इतरत्र जाण्याच्या मानसिकतेमध्ये असेल तर राज्य सरकार हिंजवडीच्या समस्यांबाबत अजिबात गंभीर नाही असेच म्हणावे लागेल.
केवळ घोषणा करायच्या आणि बैठकांचे सोपस्कार पाडायचे, या पलीकडे प्रत्यक्ष काहीही काम झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मी नागरीकांनी पुकारलेल्या आंदोलनात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कारण स्थानिक नागरिक, गृहिणी आणि तरुण अभियंते जेव्हा आपल्या हक्कांसाठी आंदोलनाची हाक देतात, तेव्हा ते या व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया चाकण पाठोपाठ पुण्याच्या परिसरातील दुसऱ्या मोठ्या औद्योगिक वसाहतीचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्या आणि ते प्राधान्याने सोडवा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
बावधन परिसरातील सर्व्हिस रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. NHAI आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर त्रस्त नागरीक आणि बावधन सिटीझन्स फोरम ला रस्त्यावर उतरून 'खड्डे भरो' आंदोलन करावे लागले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. नागरीक कोट्यवधी रुपयांचा कर भरतात, तरीही त्यांना अशा रस्त्यांचा त्रास का सहन करावा लागतो? प्रशासनाच्या या धिम्या आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घातला जातो हे अतिशय संतापजनक आहे.
माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नीतीनजी गडकरी, NHAI आणि पुणे महापालिका प्रशासनाकडे मागणि आहे की, कृपया बावधन सर्व्हिस रस्त्यांची पाहणी करून तेथे तात्काळ पक्के डांबरीकरण करण्यात यावे. येथे पावसाचे पाणी साचू नये यासाठी योग्य जलनिस्सारण व्यवस्था उभारण्यात यावी. नागरीकांना वारंवार पाठपुरावा करुनही योग्य पायाभूत सुविधा मिळत नाहीत ही अतिशय खेदाची बाब आहे.
@nitin_gadkari@OfficeOfNG@NHAI_Official@PMCPune@OfficialPMRDA@bavdhancitizens
सिंहगड रस्त्यावर ब्रह्मा हॉटेलसमोर खानापूर-स्वारगेट पीएमपीएल बसमधील प्रचंड गर्दीमुळे पडून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. मृत तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
हा अपघात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुटपुंज्या सेवेचा परिणाम आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त व पीएमपीएमएल प्रशासनाकडे मागणी आहे की कृपया या मार्गावर बस फेऱ्यांची संख्या वाढवून गर्दीचा ताण कमी करावा. यासोबतच तरुणीच्या कुटुंबाला प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घेतली जावी.
@PMCPune@PMPMLPune
A young woman passed away this morning after falling from an overcrowded PMPML bus on Sinhagad Road, near Brahma Hotel. The incident occurred around 10:30 am, when the bus, travelling from Khanapur to Swargate, was carrying an unusually large number of passengers. Due to the heavy crowd, the woman reportedly fell from the bus and came under a school bus that was following behind, leading to her unfortunate passing. The incident has once again brought attention to the issue of overcrowding in public transport buses, which continues to pose serious safety risks for commuters, especially during peak hours. Authorities are yet to share further details regarding the exact cause and any action being taken following the incident.
#Punetimesmirror #PuneNews #SinhagadRoad #PMPMLBus #RoadSafety
तुम्ही आम्हाला ५ मिनिटे देत नाही,
तर आम्ही तुम्हाला ५ वर्षे का द्यावीत?
@PMOIndia@CMOMaharashtra
Will PM listen to IT sector issues while he is in Pune ? Or will it just be a program ?
#Mahalunge#HitechCity How many times residents have to protest just for roads .
@CMOMaharashtra@PMCPune@navalMH
When will you allocated due funds to Mahalunge and near by areas ?
How many more life’s just bcoz of roads ?
चाकणला भेट दिल्यानंतर, हिंजवडीला देखील भेट देऊन येथील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांची, रहिवाशांची भेट घेतली. मी मुख्यमंत्र्यांना ह्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे आणि गेल्या वर्षीसारखे केवळ आश्वासन न देता, त्यांनी दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांत ३६,२११ उद्योग बंद झाले आहेत किंवा राज्याबाहेर गेले आहेत.
पायाभूत सुविधांचा झालेला बोजवारा आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार यामुळे चाकणमधील २० उद्योगांनी तिथून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
माझ्या भेटीनंतर, उद्योगमंत्र्यांना तिथे भेट द्यावी लागली, त्यांनी सुमारे ५ तास घालवले आणि घोषणांचा पाऊस पाडला. मंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली की नाही, हे पाहण्यासाठी मी पुढील महिन्यात पुन्हा चाकणला भेट देणार आहे.
त्याचप्रमाणे हिंजवडी आणि परिसरासाठी, मी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या ह्या पत्रात नमूद केल्या आहेत. ह्या मागण्या अत्यंत मूलभूत आहेत, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर उद्योग दुरीकडे स्थलांतरित होतील.
येथील रहिवाशांनी ६ सप्टेंबर रोजी आंदोलनाचे नियोजन केले असून आम्ही त्याला आमचा पाठिंबा जाहीर केला आहे.
#Maharashtra #Chakan #Hinjewadi #Pune
Bajaj pune grand tour साठी अख्या पुण्यातले खड्डे बुजवले का तर विदेशातून लोक भाग घेणार होते. त्यानंतर सरकार आणि प्रशासन दोघं झोपी गेले. अखेर काल एका ११ वर्षीय मुलाचा खड्ड्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला. हजारो लोकांनी आवाज उठवला, त्याच्या अंत्ययात्रेला एकत्र आले. तेंव्हा कुठे सरकार आणि प्रशासनाला खाड्ड्कन जाग आली आणि आता हालचाली चालू झाल्या. निष्क्रिय शब्द पण लाजेल असा तर यांचा कारभार आहे!
हिंजवडीसारख्या आयटी क्षेत्रात नवीन कंपन्यांची वाढ झालेली नाही.
सध्याच्या कंपन्या विचार करताहेत, प्रवासासाठी एक-दीड तास वेळ लागत असेल तर आपण इथे थांबायचं तरी का?
बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील ग्रीन कोट सोसायटीसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. राज्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेक मृत्यू झाले असून याला सर्वस्वी रस्त्यातील भ्रष्टाचार कारणीभूत आहे. दोन-दोन हातांनी कमिशन खाल्ल्यामुळं रस्त्यांची कामं निकृष्ट झाली आणि आता पावसाने त्याच रस्त्यांत खड्डे पडल्याने याच खड्ड्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. याबाबत संबंधित रस्त्याचा ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तरच यापुढं कामाचा दर्जा राखला जाईल आणि असे निष्पाप नागरिकांचे बळी जाणार नाहीत.
#खड्ड्यांचा_बळी #रस्ते_भ्रष्टाचार
#RoadSafety #Pune
पंतप्रधानांना बोलावून वरच्या मेट्रोचं उद्घाटन कराल, पण खालच्या अशा रस्त्याचं काय?
पादचारी, दुचाकी आणि चारचाकी उडत नाहीत जाणार हिंजवडीत! 😐
हा व्हिडिओ आहे इन्फोसिस मेट्रो स्टेशन जवळचा, रस्त्याच्या मधे रोड barrier ठेवलेत. एवढी मोठी PMT पण तिथल्या खड्ड्यात कुचत आहे, दुचाकीचं आख्ख चाक जात आहे त्यात. 🫡
सर्व हिंजवडीच्या फुटपाथची अवस्था ह्या व्हिडिओ मधून समजत असेलच. प्रत्येक मेट्रो स्टेशन खाली ही परिस्थिती आहे.
रोज संध्याकाळी ४ नंतर इथूनच ट्रॅफिक चालू होतं. जमलं तर इन्फ्रामन, उद्योग मंत्री किंवा विरोधी पक्षाने येऊन बघावं. 🙏🏻
#Hinjawadi #IT_Park #Infosys #Metro #Pune #Road
हिंजवडीतील दयनीय रस्ते, विस्कळीत झालेली वाहतूक तसेच तिथल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत नागरी पायाभूत सुविधांचा असलेला अभाव ह्यामुळे त्रस्त रहिवाशांना भेटण्यासाठी आज हिंजवडीला भेट दिली.
हिंजवडी महाराष्ट्रातील आयटी क्षेत्राचा केंद्रबिंदू असल्याचे म्हटले जाते, परंतु अशा पायाभूत सुविधांच्या ढासळलेल्या स्थितीमध्ये इथल्या मोठ्या कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी ट्राफिक, कचरा व्यवस्थापन आणि पाण्यासाठी दररोज संघर्ष करत आहेत.
पायाभूत सुविधांची ही ढासळलेली स्थिती आणि शहर व्यवस्थापनाचा अभाव ह्यामुळे जर इथल्या मोठ्या कंपन्यांनी स्थलांतर केले, तर त्याचा नोकऱ्यांवर मोठा फटका बसेल.
मला भेटलेले स्थानिक रहिवासी लवकरच एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत, आम्ही त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
आम्हाला उत्तरदायित्व आणि काम हवे आहे.
दोन वर्षे राज्यातील सगळे infrastructure projects थांबवा. राजकीय पक्षाची लगेच उपासमार सुरू होईल.
Infra Corruption Model
- १००० कोटीचा प्रकल्प
- ४०% भ्रष्टाचार म्हटले तरी ४०० कोटी गायब
- प्रकल्पासाठी कर्ज घेता येते
- कंत्राटदार Party Fund देतो
- विकासाचा भास निर्माण करता येतो