स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ आणि रजिस्टर संस्था.
संपर्क:- 8668378583
पोलिस भरतीचा पेपर फुटला
@Dev_Fadnavis साहेब आपण ग्रहमंत्री आहात या प्रकरणाकडे गांभीर्याने घ्या आणि याची सखोल चौकशी करा.यात काही क्लास चालक तसेच अधिकारी सहभागी आहेत. हा योगायोग नसून जाणूनबुजून पेपर फुटीचा प्रकार आहे. यावर एक SIT नेमून याची चौकशी करा ही नम्र विनंती
@DGPMaharashtra
नियती किती निष्ठूर होऊ शकते याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे....
अक्षय कुमार पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून(MPSC) नोकरीचे स्वप्न पाहिले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना वडिलांनी मुलाला शिक्षणासाठी आधार दिला.
दोन वर्षांपूर्वी अक्षय पांडगळे याचे वडील कुमार पांडगळे यांना कॅन्सरचे निदान झाले. दोन वर्ष उपचार चालले. थोडी होती ती दोन एकर जमीन वडीलांच्या दवाखान्यासाठी विकावी लागली. दुर्दैवाने कुमार पांडगळे यांचे वीस दिवसांपूर्वी निधन झाले.
दरम्यान अक्षय पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वरिष्ठ लिपिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. काही दिवसांत त्याला नोकरीची ऑर्डर येणार होती परंतु नियती अत्यंत निर्दयी झाली.
मागील आठवड्यात अक्षय पांडगळे याला झोपेत असताना ब्रेन स्ट्रोक आला. तो सध्या अत्यवस्थ असून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि अवघ्या सात दिवसांचा तान्हा मुलगा आहे. उपचारांसाठी दररोज 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून एकूण खर्च 19 ते 20 लाख येणार आहे.
अक्षयला आणि त्याच्या परिवाराला आर्थिक मदतीची गरज आहे. आक्षय बरा होऊन अधिकारी होईल आणि तुमचे ऋण नक्कीच फेडील. या कठीण काळात त्याला मदत मिळणं गरजेचं आहे.
खाली अक्षयचा भाऊ सुशील कुमार पांडगळे याचे अकाऊंट डिटेल्स व मोबाईल नंबर जोडत आहे. जमेल तेवढी मदत नक्की करा.
Sushil Kumar Pandgale
बँक: HDFC Bank
A/C No.: 50100492651282
IFSC Code: HDFC0001515 Mobile-8850548917
@CMOMaharashtra@DevendraFbhau@Dev_Fadnavis@MahaDGIPR@mieknathshinde@SunetraA_Pawar@DrSEShinde@VijayWadettiwar@RahulGandhi@abpmajhatv@saamTVnews@TV9Marathi@mumbaitak@LoksattaLive@lokmat@SaamanaOnline@rautsanjay61@PawarSpeaks@PMOIndia@Aaple_Sarkarr
आपण #शक्तिपीठ महामार्ग योजिला आहे, तो कितपत उपयोगी आहे ते आपल्यालाच माहीत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या एकाही रस्त्यावर आजवर बोगदा काढलेला नाही,सर्व घाटमार्ग धोकादायक असून दरवर्षी ताम्हिणी,आंबेनळी,भोर आणि इतर घाटात कित्येक अपघात घडतात,पण यावर आपण तोडगा काढू शकलेला नाही
आपण #शक्तिपीठ महामार्ग योजिला आहे, तो कितपत उपयोगी आहे ते आपल्यालाच माहीत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या एकाही रस्त्यावर आजवर बोगदा काढलेला नाही,सर्व घाटमार्ग धोकादायक असून दरवर्षी ताम्हिणी,आंबेनळी,भोर आणि इतर घाटात कित्येक अपघात घडतात,पण यावर आपण तोडगा काढू शकलेला नाही
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
हे 8 मित्र फिरायला गेले असता त्यांचे वाहन दरीत 1500 फूट खाली कोसळले. त्यामुळे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य प्रारंभ केले असून प्रत्येकी 7 जणांची 5 पथके तयार केली आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लवकरच उर्वरित मृतदेह बाहेर काढले जातील. यात एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे. इतर स्वयंसेवी बचाव पथके सुद्धा मदत करीत आहेत.
मृतांपैकी 1 रत्नागिरी जिल्ह्यातील असून उर्वरित 7 हे सातारा जिल्ह्यातील आहेत. रायगड आणि सातारा पोलिस दल सुद्धा समन्वय ठेवून आहेत.
आज पुणे येथे समस्त स्पर्धा परीक्षा आणि पोलीस विद्यार्थी आयोजित कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
#Shivsena #EknathShinde #maharashtra
आयोगाने गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टायपिंग टेस्ट रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे निकाल वेळेत लागण्यास मदत होईल, आयोगाच्या निर्णयाचे स्वागत. @mpsc_office
NEET पेपरफुटी प्रकरणी आत असलेल्या मोटेगावकरला @mumbaitak अजूनही #सर म्हणते आहे?
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनेक क्लासचालक मागील काळात पेपरफुटीत अडकले आहेत, असा इतिहास आहे. काही क्लासचालकांनी क्षेत्र नासविले आहे, यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने कठोर कायदा आणणे गरजचे आहे.
नीट पेपरफुटीत महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे.आता ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे
आम्ही मागील काही वर्षात महाराष्ट्रातील मोठ-मोठ्या परीक्षांच्या पेपरफुटी समोर आणल्या आहेत,त्यात एकच निष्कर्ष निघतो,ऑफलाईन पेपर जर योग्य आणि संविधानिक संस्थेने घेतला तर पेपरफुटीला आळा बसतो
@Central_Railway मडगाव-नागपूर एक्सप्रेस, दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान मडगावहून सोडण्यात यावी,आता रात्री ८ ला सोडण्यात येत आहे
कोकणात ही गाडी मध्यरात्री नंतर येत असल्याने मराठी प्रवाशांना वेळ उपयोगाची नाही. गोव्यातील पर्यटकांना सुद्धा दुपारी १२ नंतर चेक आउट केल्यानंतर लगेच १-२ वाजता गाडी मिळेल
झुरळांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हे खरं आहे?
बऱ्याच वर्षांच्या राष्ट्रीय आणि पक्षीय धोरणांच्या अपयशामधे विनाकारण त्यांना खेचल्या बद्दल?
नीट परीक्षा रद्द:
खाजगी क्लासेसचे महाभूत
स्पर्धा परीक्षा.
ज्ञानाची कसोटी म्हणे.
मेहनतीचा उत्सव म्हणे.
समान संधी म्हणे.
हसू येते.
की किळस येते?
आज स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?
ज्ञानाची चाचणी?
नाही.
खाजगी क्लासेसच्या फीची चाचणी.
ज्याच्याकडे लाखो रुपये.
त्याच्याकडे “मार्गदर्शन”.
ज्याच्याकडे पैसा नाही.
त्याच्याकडे फक्त पुस्तके.
आणि काळोख.
ही व्यवस्था आहे?
की बाजार?
आईबाप जमीन विकतात.
कर्ज काढतात.
सोनं गहाण ठेवतात.
मुलगा “अधिकारी” व्हावा म्हणून.
आणि दुसरीकडे?
क्लास माफिया वातानुकूलित साम्राज्य उभे करतो.
भव्य पोस्टर्स.
टॉपरचे फोटो.
खोटे यश.
अर्धसत्य जाहिराती.
आणि ज्ञानाचे दुकान.
इतकेच नाही.
प्रश्नपत्रिका फुटींची सावलीसुद्धा
याच साम्राज्याभोवती फिरताना दिसते.
परीक्षा होण्याआधीच
“Expected Questions” कसे काय जुळतात?
काहींचे गुण चमत्कारिकपणे कसे वाढतात?
काही क्लासेसना प्रश्नांचा वास आधीच कसा लागतो?
स्पर्धा मग उरते कुठे?
ही परीक्षा असते?
की आधीच लिहून ठेवलेला निकाल?
प्रामाणिक विद्यार्थी रात्र जागतो.
आणि माफिया
प्रश्नपत्रिकांच्या गटारातून
यशाचे साम्राज्य उभे करतो.
ही स्पर्धा नाही.
ही थट्टा आहे.
निकोप स्पर्धेची निर्लज्ज विटंबना.
ज्ञान विकायचे असते का?
तेही किलोने?
पॅकेजने?
“फाउंडेशन बॅच.”
“टार्गेट बॅच.”
“रँकर्स बॅच.”
विद्यार्थी नाहीत.
गिर्हाईक आहेत.
आज विद्यार्थी अभ्यास करत नाही.
तो नोट्स पाठ करतो.
“Expected Questions” पाठ करतो.
“Shortcut Tricks” पाठ करतो.
परिणाम?
अधिकारी तयार होतात, डॉक्टर इंजीनियर तयार होतात
पण विचारवंत जन्मत नाहीत.
फाईल ढकलणारे मिळतात.
पण निर्णयक्षम बुद्धिमत्ता हरवते.
नैसर्गिक बुद्धिमत्ता मरते.
देशाला विकलांग नोकरशाही मिळते,
विकलांगता वैद्यकीय, अभियांत्रिकी मध्येही घुसते.
स्वतः अभ्यास करण्याची वृत्ती मरते.
ग्रंथालये ओस पडतात.
वाचन संस्कृती मरते.
आणि क्लासवाल्यांचे साम्राज्य वाढते.
आज प्रश्न असा आहे —
देशाला अधिकारी हवे आहेत?
की प्रशिक्षित पोपट?
खरे ज्ञान एकांतात घडते.
स्वतःशी झुंज देताना घडते.
पुस्तकांशी मैत्री करताना घडते.
अपयश पचवताना घडते.
ते “PowerPoint Presentation” मध्ये मिळत नाही.
पण सरकार खूश.
कारण क्लास माफिया म्हणजे मोठी अर्थव्यवस्था.
भाड्याच्या इमारती.
जाहिराती.
राजकीय पाठबळ.
करोडोंचा बाजार.
विद्यार्थी?
तो फक्त इंधन.
म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे.
खाजगी क्लासेसच्या या महाभूतावर बंदी आणलीच पाहिजे.
हो.
बंदीच.
शिक्षण म्हणजे उद्योग नाही.
स्पर्धा परीक्षा म्हणजे लिलाव नाही.
सरकारी अभ्यासिका वाढवा.
ग्रंथालये सक्षम करा.
ऑनलाईन मोफत दर्जेदार व्याख्याने द्या.
शैक्षणिक प्रवेश पूर्ण पारदर्शक करा.
आणि मग पाहा.
खरी बुद्धिमत्ता कशी उभी राहते ते.
खाजगी क्लासेसविरहित स्पर्धा.
हीच खरी निकोप स्पर्धा.
बाकी सगळे?
ज्ञानाच्या नावाखाली चाललेला
एक संघटित बाजार.
आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची
निर्लज्ज दलाली.
-महेश झगडे
ऑप्टिंग आउट करण्यासाठी एक उमेदवाराकडून पैसे मागण्यात आल्याची बातमी माध्यमांनी उचलून धरली होती.आज आयोगाने Opting Out पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला. Opting Out पर्यायामुळे शेकडो उमेदवारांना फायदा झाला आहे, आयोगाने सदर निर्णय घेण्यास जास्त घाई केली असे आमचे मत आहे. @mpsc_office
ऑप्टिंग आउट करण्यासाठी एक उमेदवाराकडून पैसे मागण्यात आल्याची बातमी माध्यमांनी उचलून धरली होती.आज आयोगाने Opting Out पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला. Opting Out पर्यायामुळे शेकडो उमेदवारांना फायदा झाला आहे, आयोगाने सदर निर्णय घेण्यास जास्त घाई केली असे आमचे मत आहे. @mpsc_office
https://t.co/JfOerVm7mi
OPTING OUT साठी 08 लाख मागणाऱ्या उमेदवाराचे नाव समोर आले आहे.आयोगाने/पोलिसांनी तरुणावर तत्काळ कारवाई करावी ही विनंती
आयोगाने प्रतिक्षा याद्या जाहीर कराव्या आणि एकदा मिळालेल्या पोस्टसाठी पुन्हा त्याच उमेदवाराला प्रवेश नाकारावा म्हणजे अशा घटना घडणार नाही