आई मेली, बहीण तडपून मेली, स्वतः कॅन्सर ग्रस्त..
#MPSC आंदोलकमन सुन्नी करणारी नरेंद्रची व्यथा 🥹💔
नांदेड मधील युवक
स्वतःच्या हक्कासाठी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करतोय..
कुठं फेडालं हे पाप 🫡
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#Pune#महाराष्ट्र
आंदोलन दिवस 10 वा 🔥
या महाराष्ट्रात मोठं होयचं असेल तर मरावं लागतं असं सिंधुताई म्हणजे आमची माय सांगून गेली होती.
आज त्या माईला सुद्धा अभिमान वाटतं असेल माझी पोरं संघर्ष करून त्यांच्या हक्काच्या न्यायासाठी लढत आहेत❤️🔥🙏🏻🥹
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#MPSC#आंदोलन
अरे उठ युवका आता जागा हो 🔥
MPSC आंदोलनाचा धागा हो 🔥
अजूनही वेळ गेली नाही मित्रांनो जेवढे मित्र मैत्रिणी असतील तेवढे सगळे घेऊन या 🔥🫡
एक लक्षात ठेवा.. आता 4 दिवस आता आंदोलनात आला तर आयुष्यभर राजा म्हणून जगशीला💯🔥
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#mpscगटब2025#Pune
मित्रांनो लेंडवे च्या काळातील खूप घोटाळे बाहेर येत आहेत🔥💣
सर्व #MPSC करणाऱ्या मित्रांनो आपल्याला ही चळवळ मोठी करायची आहे ❤️🔥
सर्वांनी फॉलो करा ..@mpscaspirantt
तरचं आपल्या ट्विट च्या माध्यमातून हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार जाग होईल 💯
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन
😎लेंडवे साहेबांची MPSC पेपरफुटी संबंधी Call Recording Viral झाली आहे.
👍एक दोन दिवसांत तुम्हाला ऐकायला मिळेल.
😍जेवढे जेवढे पेपरफुटीचे विषय बाहेर येत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी
🫡अभिजीत गणपतराव लेंडवे हे नाव अग्रस्थानी आहे.
#MPSC#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#Pune
रस्त्यावर उतरलेली तरुणाई ही केवळ गर्दी नाही, तर व्यवस्थेला जाब विचारणारा बुलंद आवाज आहे अन्यायाविरोधातील हा संघर्ष म्हणजे हक्कांसाठी आणि परिवर्तनासाठी पेटलेली लोकशक्ती आहे. 🔥
रात्री 10.30 वाजता
📍 एस. एम. जोशी पूल, पुणे
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#MPSC#MPSCआंदोलन
@Core_punekar@dpranav88 अरे मित्रा तुझ्या बुद्धीला गंज चढला आहे जरा
अध्यक्षांचा राजीनामा घेता येत नाही हे आम्हाला तुझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. आम्ही नैतिकतेने राजीनामा द्यायला सांगतो आहे.
राजीनामा घेणे आणि स्वतःहून राजीनामा देणे ह्यात फरक असतो. नसेल माहिती तर polity वाच
न भुतो न भविष्य 🔥💣
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विद्यार्थी एकता एकजुटीच्या यशस्वी लढ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आज आंदोलन स्थळी या 🔥🔥
काका जात आहेत. लागा तयारीला 💯💯💯
#MPSC#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#Pune#आंदोलन
😎😎😎 आज मोठ्या टेलिग्राम ग्रुपच्या ऍडमिनचा MPSC पेपरफुटी मधील बॉम्ब स्फ़ोट करणार आहे. पुराव्या निशी....
🫡🫡🫡ऋषी सर
आज रात्री.. S.M . जोशी पुल पुणे
सगळ्यांनी या मित्रांनो 🔥💣
#MPSC#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#Pune#आंदोलन
दुर्दैव आहे महाराष्ट्रातील आम्हा #MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कारण पुरावे देऊन सुद्धा गोर गरीब पोरांच्या स्वप्नांपेक्षा इथल्या व्यवस्थेला राजकारण महत्त्वाचं वाटतं आहे 💔🙏🏻🥹
आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#Pune@Dev_Fadnavis
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षेचा पेपर फुटल्याचे आम्ही यापूर्वीच पुराव्यांसह सिद्ध केले आहे. या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच तीव्र असंतोष असताना, आता 'गट-ब' (कम्बाईन) परीक्षेबाबतही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत निवड झालेला मुख्य आरोपी विजय किंगर याला कम्बाईन पूर्व परीक्षेत १०० पैकी तब्बल ९० गुण मिळाले आहेत, जे अत्यंत संशयास्पद आहेत. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीतील दोन मुख्य आरोपी विजय किंगर आणि साजिद सांदे या दोघांनाही गट-ब मुख्य परीक्षेच्या पेपर-१ (भाषा) मध्ये अगदी एकसारखे १२८.५० गुण मिळाले आहेत! हा निव्वळ योगायोग कधीच असू शकत नाही.
आयोगाच्या या अनास्थेमुळे आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. MPSC चे संपूर्ण शुद्धीकरण केल्याशिवाय हे गैरप्रकार थांबणार नाहीत आणि सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची संधी मिळणार नाही.
आपली ही लढाई व्यवस्था बदलण्याची आणि हक्क मिळवण्याची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सत्याग्रहाच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा द्यावा!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
मित्रांनो @RRPSpeaks दादांची तब्बेत खराब होत आहे.
स्टंट म्हणून कितीही टीका होऊदे पण #MPSC करणाऱ्या प्रत्येकाला समजत.
आपण स्वतःहून दादांना आंदोलन करूया म्हणून सांगितलं
जर दादांना घेऊन गेले तर आपलं अस्तित्व संपलं म्हणून समजा 💯 आता तरी जागे व्हा
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह