सगळ काही अचानक चांगल व्हायला लागत आणि अचानक सगळ अस नक्की हे आपल्या आयुष्यात आहे का नाही? मग मी काय करावं? अस जेव्हा वाटायला लागत तेव्हा नक्की काय करायचं? कोणाशी बोलाव काहीच कळत नाही.😔
@Saukhya22 Arrenge marriage मधे कुंडली का पाहतात माहीत आहे का? कारण अस की, दोन्ही व्यक्ती एकमेकांसाठी अनोळखी असतात, त्यांची कमी वेळेमध्ये ओळख पटावी म्हणून तसं करतात. कारण त्यांना ओळखण्यासाठी कमी वेळ असतो. आणि love marriage मधे already ते एकमेकांना ओळखत असतात. बस एवढंच बाकी काही नाही.
तुमच्या काय नियंत्रणात आहे ?
खाली 20 छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या संपूर्णतः आपल्या नियंत्रणात असतात. पण त्या आपल्या नियंत्रणात आहे याची जाणीव सुद्धा आपल्याला राहत नाही. हे आपल्या जाणिवेत यावे व रहावे यासाठी ही यादी.
१) तुमच्या धारणा/ श्रद्धा.
२) तुमचा दृष्टिकोन.
३) तुमचे विचार.
४) तुमचा मित्र परिवार ( निवडणे )
५) तुम्ही कुठली पुस्तके वाचता.
६) व्यायाम करणे.
७) तुमच्या आहार विषयक सवयी.
८) तुमची जोखीम घेण्याची क्षमता.
९) स्थिती/परिस्थितीचा अर्थ लावणे.
१०) मदत शोधणे,मागणे, प्राप्त करून घेणे.
११) कृतज्ञता.
१३) तुमचे प्रयत्न.
१४) काळजी करण्यात घालवलेला वेळ.
१५) तुमची संसाधने कशी खर्च करावी व बचत.
१६) अपयश आल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याची वृत्ती.
१७) आपल्या हातात जे आहे त्याबद्दल समाधानी असण्याची वृत्ती.
१८) वेळेचे नियोजन.
१९) आपण करू शकत असलेल्या बाबींचे नियोजन.
२०) सजगता.
ही यादी वारंवार वाचा म्हणजे या गोष्टी अधिकाधिक तुमच्या नियंत्रण येथील व या बाहेरील गोष्टी सुद्धा आपोआप नियंत्रणात यायला सुरुवात होईल.
डॉ प्रशांत भामरे.
@Sanprati560 हे बघ!
जे तुझं आहे ते तुला मिळाल्या शिवाय राहणार नाही. आणि जे तुझं नाही ते तुला मिळणार नाही.
स्वतःला त्रास करून नको घेऊ कुठल्या गोष्टीचा, नियतीने तुझ्यासाठी खुप काही चांगलं ठेवलं असेल. हताश नको होऊस..☺️🫂❤️