मराठी भाषेची महती काय सांगू
जिच्यामध्ये सरस्वतीची श्रेष्ठता आहे
जिच्यामध्ये सप्तसुरांचा नाद आहे
जिच्यामध्ये रसाळ मधाचा गोडवा आहे
जिच्यामध्ये सुवासिक फुलांचा सुंगध आहे
जिच्यामध्ये चंद्रालाही लाजवेल अस सौदंर्य आहे
जिच्यामध्ये इंद्रधनुष्याची रंगसंगती आहे
👇
समुद्राच्या रेतीवर रुप तुझे कोरले
निरभ्र आकाशाने रंग छान भरले
प्रत्येक कणातून काया तुझी चमकायची
स्पर्श केल्यावर मनात फुले फुलायची
अथांग समुद्रालाही ओढ तुला पहायची
लाट गर्जत किनारी भेटायला यायची
#हर्षरंग