@mybmc@AjjuMishra8@bmcbbsr We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 070506
@Nishant_Gauli@mybmc@myBESTElectric We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 070373
@Abhischavan@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - 069738
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/iNYed94pvg येथे कृपया भेट द्यावी.
@amitremje@CMOMaharashtra@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - 069012
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/iNYed94pvg येथे कृपया भेट द्यावी.
@SayyedWarees@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 068852
@LETSCHANGE12@mybmc@mayor_mumbai@TawdeRitu We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 068126
@JaiSubhadraMata@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - 067933
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/iNYed94pvg येथे कृपया भेट द्यावी.
@Nishant42485604@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 067973
@gautam40745663 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 067632
@Adikc6@mybmc@mybmcWardA@rahulnarwekar We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 067776
जुलै २०२६ मधील मोठ्या भरतीचे (High Tide) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १४ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त असणार आहे 🌊
भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा...
सुरक्षित राहा, सतर्क राहा!
#MyBMCUpdates#MumbaiRains#Hightide
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रमाच्या अनुषंगाने, माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या नावाने, व्हॉट्सअॅपद्वारे अज्ञात क्रमांकावरुन मतदारांना तथ्यहिन संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
‘आपली मतदानविषयक माहिती जुळत नसल्याचे किंवा त्यासोबत बनावट कागदपत्रे असल्याचे चौकशीत आढळले आहे. आपण योग्य कागदपत्रे न दिल्यास आपले मतदान कार्ड वगळण्यात (Delete) येईल. यासाठी तात्काळ सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा’, असे या संदेशात म्हटले आहे. तसेच, त्याखाली मोबाईल क्रमांकही देण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने, हे स्पष्ट करण्यात येते की, माननीय निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे कोणतेही संदेश व्हॉट्सअॅपवरुन पाठविण्यात आलेला नाही. हा संदेश पूर्णत: तथ्यहिन आणि खोटा आहे. अशाप्रकारच्या संदेशाला कोणतेही उत्तर देऊ नये अथवा त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करू नये.
कृपया, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रमाबाबत अधिकृत माहितीसाठी माननीय भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा त्यांच्या अधिकृत समाज माध्यम (सोशल मीडिया) खात्यावरील माहिती पाहावी किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
#mybmcupdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@ceo_maharashtra
🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांनी जी उत्तर विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) आणि माहिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास आज भेट दिली.
🔹नागरी सुविधा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवासुविधांचा तसेच मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण(स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR)- २०२६ कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेली कार्यवाही आणि कामकाजाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
🔹उपआयुक्त (शिक्षण) श्रीमती प्राची जांभेकर, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) श्री. योगेश देसाई आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
साकीनाका येथील काजूपाडा पाईपलाईन मार्गावरील सत्यनगर नाल्याजवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या विहार मुख्य जलवाहिनीवर पाणी गळती आढळून आली.
ही गळती तातडीने रोखण्यासाठी जल अभियंता (HE) विभागाने शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी जलवाहिनीचे अलगीकरण (Isolation) केले.
अलगीकरणाची प्रक्रिया जलद व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी 'एअर व्हॉल्व्ह'मधून हवा सोडण्याची (Air Valve Bleeding) कार्यवाही करण्यात आली.
जलवाहिनीचे अलगीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जल अभियंता विभागाने गळतीस कारणीभूत ठरलेला खराब झालेला शिसाचा सांधा (Lead Joint) काढून त्याऐवजी नवीन सांधा बसविला. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असून पाणी गळती पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
जुलै महिन्यात १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे.
उधाणलेला समुद्र धोक्याची घंटा असू शकते...
सुरक्षित रहा, सतर्क रहा
#MyBMCUpdates#mumbairains
मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' प्रतिकृतीची महापौर श्रीमती रितू तावडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी
एल विभागामध्ये प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी; अनुभव व सूचनांच्या आधारे होणार पुढील निर्णय
🔷मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' (Manhole Rail Guard) ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १३ जुलै २०२६) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध नगरसेवक व नगरसेविका देखील उपस्थित होते.
🔷या प्रतिकृतीची सविस्तर माहिती घेतल्यानंतर महापौर श्रीमती तावडे तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर यांनी तिच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमी-जास्त (collapsible) करता येणे, काळोखावेळी दृश्यमानता वाढावी यासाठी त्यावर परावर्तक रंग (reflector) लावणे किंवा लुकलुकणारे दिवे बसवणे, यांसह इतरही सूचना दोघांनी केल्या.
🔷नागरिक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या चौकोनी आकाराच्या 'मॅनहोल रेलगार्ड'ची रचना मजबूत आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. उंची १ मीटर, लांबी १.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असा आकार असलेल्या या रेलगार्डमध्ये, गरजेनुसार व विविध ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी २२५ किलो आणि ८० किलो असे दोन वेगवेगळे वजनी पर्याय उपलब्ध आहेत.
🔷ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) मुंबईतील एल प्रशासकीय विभाग (L Ward) मध्ये वापरात आणली जाणार आहे. या विभागात प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर, तेथील अनुभव पाहून तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे 'मॅनहोल रेलगार्ड'ची जडणघडण कशी असावी, याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
🔷तसेच, या प्रायोगिक चाचणीदरम्यान मिळणारे अनुभव आणि सूचनांचा अभ्यास करून, मुंबईतील इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या प्रतिकृतीचा वापर करावा की नाही, याबाबतचा पुढील निर्णय महानगरपालिका प्रशासनातर्फे घेतला जाईल.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण-एक नातेवाईक' पद्धती तसेच अभ्यागत प्रवेशिका प्रणाली लागू करावी
महापौर श्रीमती रितू तावडे यांची सूचना, महानगरपालिका आयुक्तांना दिले पत्र
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी आणि रुग्णांना संसर्गमुक्त वातावरण मिळवून देण्यासाठी, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘एक रुग्ण-एक नातेवाईक’ पद्धती लागू करावी आणि ‘अभ्यागत प्रवेशिका प्रणाली’ (Visitor Pass Management System) सुरू करावी, अशी सूचना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. त्यासंदर्भात महापौरांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे.
🔷रुग्णालयातील वाढती गर्दी नियंत्रित करणे, स्वच्छता राखणे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथम केईएम, शीव (सायन) आणि नायर या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही पद्धती तातडीने लागू करता येईल, अशी विनंती महापौरांनी केली आहे.
महापौरांच्या पत्रातील सूचना -
🔷'एक रुग्ण - एक नातेवाईक' पद्धत - रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक रुग्णासोबत विभाग (वॉर्ड) मध्ये एकाच नातेवाइकाला थांबण्याची परवानगी असावी. यामुळे विनाकारण होणारी गर्दी टळेल आणि डॉक्टर्स व परिचारिकांना रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल.
🔷अभ्यागत प्रवेशिका प्रणाली - रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावरच आधुनिक अशी अभ्यागत प्रवेशिका प्रणाली सुरू करण्यात यावी. सुरक्षा रक्षक या प्रवेशिकांची तपासणी करतील. त्यातही, डिजिटल प्रणाली राबविल्यास सुरक्षेचा प्रश्न सुटेल आणि विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना आळा बसेल.
🔷अत्यवस्थ रुग्णांसाठी विशेष सवलत - अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या किंवा प्रकृती अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मानवतावादी दृष्टिकोनातून एकापेक्षा जास्त प्रवेशिका देण्याची विशेष सवलत असेल. याचा निर्णय घेण्याचे अधिकार रुग्णालय प्रशासनाला राहतील.
🔷या नियमांमुळे काही फायदे अपेक्षित आहेत. जसे की, (१) रुग्णालयाच्या मार्गिका (कॉरिडोअर) आणि वॉर्डमधील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. (२) गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा सुधारेल. (३) रुग्णांना शांत आणि संसर्गमुक्त वातावरण मिळेल. (४) नागरिकांमध्ये संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी पाळावयाची नागरी शिस्त (Civic Discipline) वाढीस लागेल.
🔷"रुग्णालयातील गर्दी व्यवस्थापनामुळे रुग्णसेवेचा तसेच स्वच्छतेचा दर्जा सुधारेल, कचरा कमी होईल आणि परिसर निर्जंतुक राखण्यास मदत होईल. तसेच, डॉक्टर्स आणि परिचारिकांना रुग्णांकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल. मुंबईकरांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी ही पद्धती अत्यंत प्रभावी ठरेल," असे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नमूद केले आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi