जय भिम जय भारत,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (सेक्टर १५, ऐरोली) हे नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) उभारलेले एक भव्य, आधुनिक स्मारक आणि ज्ञान केंद्र आहे.
#jaybhim#airoli#ऐरोली#jaybharat#बाबासाहेब#ambedkar
पुन्हा एकदा ठाणे मध्ये हुक्काबार जोमात!
वारंवार माहिती देऊन ही ठाणे येथील लुईस वाडी परिसरातील Harbour 04 येथील हुक्का बार बंद होण्याचं नाव काही घेत नाही, जागरूक नागरिकांनी दिलेल्य��� माहिती नुसार हा हुक्का बार सकाळी 3,4 वाजेपर्यंत सुरू असतो येथे दारू, तंबाखू फ्लेवर केमिकल युक्त हुक्का युवकांना देऊन या देशाच��� युवा पिढी नशेत ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांना विनंती आहेकी किरकोळ कारवाही करून आपण काय सिद्ध करू इच्छिता, असले नशेच्या बाजाराला कायमच कुलुप लावण्याची कृपा करावी
@Info_Thane1 @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR
ठाणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा बळी ठरत असलेला बाळकुम गणेश विसर्जन घाट !
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून शहरातील खाडी किनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विसर्जन सुविधांसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत साकेत-बाळकुम परिसरातील खाडी किनारपट्टी आणि विसर्जन घाटाच्या विकासाचे काम मार्च २०१८ मध्ये वर्क ऑर्डर देऊन अधिकृतपणे सुरू झाले. या संपूर्ण खाडी किनारा विकास आणि विसर्जन घाटांच्या निर्मितीसाठी शासनाचे आणि पालिकेचे कोट्यवधी रुपये (सुमारे ४२ ते ५० कोटींहून अधिक रुपयांच्या पॅकेजअंतर्गत) खर्च करण्यात आले. नागरिकांना सुलभ व पर्यावरणपूर��� विसर्जन स्थळ मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश होता, परंतु हा उधळलेला पैसा केवळ कागदावरच मसुदा ठरल्याचे दिसत आहे.
आज बाळकुम विसर्जन घाटावर प्रत्यक्ष नजर टाकल्यास तिथे पसरलेली अस्वच्छता आणि प्रशासनाची अनास्था स्पष्टपणे दिसून येते.
महापालिकेने घाटाच्या सिमेंट-कँक्रीटच्या बांधकामावर कोट्यवधींची उधळण केली, परंतु पूजासा��ित्य व निर्माल्य टाकण्यासाठी एक साधी कचरापेटी किंवा निर्माल्य कलश ठेवण्याची साधी तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही.
योग्य व्यवस्थापन आणि कचरापेट्या उपलब्ध नसल्यामुळे नागरिक व भाविक नाइलाजाने किंवा अज्ञानामुळे फुले, हार, प्लास्टिक व इतर निर्माल्य थेट खाडीच्या पात्रात टाकत आहेत. यामुळे जलप्रदूषण तर मोठ्या प्रमाणावर होतच आहे, पण घाटाच्या पवित्रतेचेही विडंबन होत आहे.
ठाणे महापालिकेचे स्वच्छता विभाग आणि स्थानिक प्रशासन केवळ उत्सव काळात तात्पुरती मलमपट्टी करतात. वर्षभर या घाटाची साधी निगा राखली जात नसल्याने हा परिसर आज कचऱ्याचे साम्राज्य बनला आहे.
लोकांच्या करातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी अशा प्रकारे पाण्यात घालवायचा आणि मूलभूत सुविधाही पुरवायच्या नाहीत, हा ठाणेकरांच्या विश्वासाचा विघातक घात आहे. गणेश विसर्जन घाटावर नियमित कचरापेटी, निर्माल्य कलश आ��ि स���फसफाईची कायमस्वरूपी व्यवस्था करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेल्यामुळे बाळकुम घाट आज दुर्दशेचा सामना करत आहे. कृपया महानगरपालिकेने तात्काळ येथे स्वच्छता करून या ठिकाणी निर्माल्य कलश किंवा कचरापेटी बसविण्याची तसदी घ्यावी. #बाळकुम #माजिवडा #साकेत #ठाणे #विसर्जनघाट #cleanup #कचरापेटी @TMCaTweetAway @ThaneCityPolice @Info_Thane1 @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @mpcb_official
मुंबईत एसआरए ( SRA ) प्रकल्पांच्या नावाखाली सामान्य आणि गरीब जनतेच्या हक्कावर कसा डोळा ठेवला जातो, याचे एक संतापजनक उदाहरण मुलुंड पूर्वमधून समोर आले आहे. मुलुंड पूर्���मधील, हरी ओम नगर जवळील, नगर भूमापन क्रमांक ६८, ६९ आणि ७० या ठिकाणी 'अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचा SRA प्रकल्प सुरू आहे. हा प्रकल्प 'युनायटेड कन्स्ट्रक्शन कंपनी' करत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा उघडकीस आला असून, SRA प्राधिकरणाने या प्रकल्पावर मोठी कारवाई करत थेट 'काम थांबवण्याची' नोटीस बजावली आहे!"
नेमका घोटाळा काय आहे? एसआरएच्या नियमांनुसार, कोणत्याही इमारतीच्य�� चारही बाजूंना सुरक्षेच्या दृष्टीने आणि मोकळ्या हवे��ाठी किमान ६ मीटर म्हणजेच सुमारे २० फूट मोकळी जागा सोडणे अत्यंत बंधनकारक असते. भविष्यात आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी सहज जाऊ शकेल, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु, 'युनायटेड कन्स्ट्रक्शन कंपनी'ने या अत्यंत महत्त्वाच्या नियमाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे! प्रकल्पाच्या चारही बाजूंना कोणतीही नियमानुसार मोकळी जागा न सोडताच अत्यंत धोकादायक पद्धतीने बांधकाम कर���्यात आले आहे."
जेव्हा या बेकायदेशीर प्रकाराची पोलखोल झाली, तेव्हा SRA प्राधिकरणाला अखेर जाग आली. प्राधिकरणाने या प्रकरणी गंभीर दखल घेत युनायटेड कन्स्ट्रक्शन कंपनीला दणका देत काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की, एवढा मोठा नियमभंग होत असताना स्थानिक अधिकारी आणि यंत्रणा झोपली होती का? बिल्डरने प्रशासनाला अंधारात ठेवले की अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सगळा खेळ सुरू होता? हा अत्यंत गंभीर सवा�� आता मुलुंडमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
गरीब झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली होणारा हा मनमानी कारभार आता थांबायला हवा. SRA प्राधिकरणाने केवळ नोटीस देऊन न थांबता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी असणाऱ्या युनायटेड कन्स्ट्रक्शन कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या भ्रष्टाचाराविरोधात शासन आणि प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
#मुंबई #mulund #SRA #hariomnagar #thane #पुनर्वसन #झोपडपट्टी #कोपरी @CMOMaharashtra @srabrihanmumbai @mieknathshinde @DGPMaharashtra @jagograhakjago @Info_Thane1@mybmc @MumbaiPolice
कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या वरदहस्ताने 'RD ऑर्केस्ट्रा अँड कार्तिक बार'मध्ये सुरू आहे का नियमांचे उल्लंघन? महिला वेटरच्या आडोशाने 'छमछम'चा गोरखधंदा जोमात!
"कोळसेवाडी पोलिस���ंचा डोळाझाकपणा की अर्थपूर्ण मूकसंमती? रात्री नटून-थटून बारमध्ये बसणाऱ्या महिलांचा नेमका उद्देश काय?"
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा 'RD ऑर्केस्ट्रा, कार्तिक रेस्टॉरंट अँड बार' सध्या गंभीर नियमांच्या उल्लंघनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बार चालकांकडून अबकारी व पोलीस विभागाच्या नियमांना सरेआम पायदळी तुडवले जात असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
🚨 बारमधील धक्क���दायक प्रकार:
महिला वेटरच्या नावाखाली वेगळाच खेळ: कागदोपत्री महिलांना 'वेटर' म्हणून दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात त्या आदबीने सेवा देण्यासाठी नव्हे, तर ग्राहकांना तोकडे कपडे घालून आकर्षित करण्यासाठी आणि बारमध्ये गर्दी खेचण्यासाठी वापरल्या जात असल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे.
टेबलपेक्षा महिलांची संख्या अधिक: रोज रात्री ९ वाजेनंतर या बारचे चित्र अत्यंत चिंताजनक असते. हॉटेलमधील एकूण टेबल��्या संख्येपेक्षा तिथे उपस्थित महिलांची संख्या जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
परवान्याच्या अटींना हरताळ: बार चालवण्याच्या नियमावलीला आणि परवान्यातील अटी-शर्तींना केराची टोपली दाखवून हा सर्व सावळागोंधळ बिनदिक्कतपणे सुरू आहे.
👮♂️ पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह!
कल्याण-डोंबिवलीतील अशा अवैध प्रकारांवर वचक ठेवण्याची आणि कारवाईची जबाबदारी कल्याण कोळसेवाडी पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, पोलिसांच्या नाकाखाली हा सर्व खेळ रोज संध्याकानंतर सुरू असतानाही, खाकी वर्दी याकडे दुर्लक्ष का करत आहे?
रात्री ९ नंतर गस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना या बारमधील हा प्रकार दिसत नाही का? की 'अर्थपूर्ण' आर्थिक हितसंबंधांमुळे पोलिसांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
⚡ नागरिकांचा आक्रमक पवित्रा आणि मागणी
तातडीने सखोल चौकशी: या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बारचेिंग्ज आणि सीसीटीव्ही फुटेज तपासावे.
कठोर कायदेशीर कारवाई: नियम धाब्यावर बसवून महिलांच्या नावाखाली गैरप्रकार चालवणाऱ्या संबंधित मालकावर व व्यवस्थापनावर तातडीने गुन्हे दाखल करावेत.
पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा: जर पोलीस प्रशासनाने यावर लवकरात लवकर कठोर पावले उचलली नाहीत, तर नागरिकांमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात येत आहे.
Place - RD Orchestra -Kartik Bar & Restaurant, 07, Lokgram, Opp Gafoor Seth Don Urdu school, near patari Pool Kalyan, Maharashtra - 421306
#kalyan #thane #patripool #orcheshtra #dancebar
@ThaneCityPolice @DGPMaharashtra @Info_Thane1 @CMOMaharashtra
गौरी पार्क जवळ, साई अक्ष इमारतीच्या बाजुला सेक्टर 30d, गोठिवली गाव, घणसोली, नवी मुंबई 400701 ( सोबत GPS फोटो जोडलेला आहे) स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार नमूद पत्त्यावर अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे, या अनधिकृत इमारतीची तत्काळ चौकशी करावी व कारवाही करून निष्कासित करण्यात यावे ही विनंती करत आहे तसेच या अनधिकृत इमारत बांधकामात मदत करणाऱ्या सि��को आणि महानगरपालिका कर्मचाऱ्याचीही चौकशी करून दोषी आढळ्यास निलंबन करावे ही विनंती
#घणसोली #ऐरोली #अनधिकृतबांधकाम #नवीमुंबई #सिडको #महानगरपालिका
@NMMConline @CIDCO_Ltd @DGPMaharashtra
@Info_Thane1
@CMOMaharashtra
ठाण्यात कायद्याची पायमल्ली: लुईसवाडीतील 'हार्बर ०४' बारमध्ये रासायनिक हुक्का अन् दारूचा खेळ; पोलिसांचे दुर्लक्ष की राजाश्रय?
महाराष्ट्राची प्रगत नगरी आणि सुरक्षित ठाणे म्हणून ज्या शहराची ओळख आहे, तिथेच आता कायद्याच्या हातावर तुरी देऊन चालणाऱ्या अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. ठाण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या लुईस वाडी, ठाणे पश्चिम येथील 'हार्बर ०४' (Kitchen & Bar) या ठिकाणाविषयी समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित ��रणारी आहे.
संध्याकाळी सुरू होणारी ही 'नशेतली मैफल' थेट सकाळी ३ ते ४ वाजेपर्यंत बिनदिक्कत सुरू असते, आणि यावर स्थानिक प्रशासनाचा कोणताही वचक उरलेला नाही.
१. तरुणाईच्या आरोग्याशी खेळणारा 'केमिकल युक्त हुक्का'
या बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना केवळ दारूच नव्हे, तर आरोग्यासाठी अत्यंत घातक असणारा केमिकल युक्त हुक्का खुलेआम पुरवला जात असल्याचे समोर आले आहे. हुक्क्याच्या धुरात तरुण पिढी आपले भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात घालत आहे. शासनाने हुक्का पार्लरवर अनेक निर्बंध आणले असताना आणि बंदी असतानाही, अशा प्रकारे उघडपणे विषारी रसायनांचा खेळ सुरू असणे म्हणजे कायद्याचा सर्रास अवमान आहे.
२. वेळेचे बंधन धाब्यावर; पहाटेपर्यंत चालणारे गैरप्रकार
नियम सांगतो की रात्री ठरलेल्या वेळेत बार आणि रेस्टॉरंट्स बंद झाली पाहिजेत. परंतु, 'हार्बर ०४' मध्ये मात्र रात्रीचे नियम लागू होत नाहीत की काय, असा प्रश्न पडतो. संध्याकाळपासून सुरू होणारे हे ठिकाण पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत ग्राहकांनी ग��्च भरलेले असते. या वेळेत शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना हा प्रकार दिसत नाही का? असा साधा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
३. वागळे इस्टेट पोलिसांची संशयास्पद भूमिका: दुर्लक्ष की लागेबांधे?
हा संपूर्ण प्रकार वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडत आहे. हद्दीतील एवढा मोठा अवैध धंदा पोलिसांच्या निदर्शनास आला नाही, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात इतक्या उशिरापर्यंत चालणारे बार आणि तिथे होणारी हुक्क्याची विक्री पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का?
पोलिसांनी या ठिकाणाची तात्काळ चौकशी करून येथे दिली जाणारी दारू आणि हुक्क्याच्या परवान्यांची सत्यता तपासायला हवी. परंतु, पोलीस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत की त्यांच्याकडून या गैरप्रकाराला पाठीशी घातले जात आहे, याची उच्चस्तरीय चौकशी होणे आता गरजेचे बनले आहे.
#हुक्काबार #ठाणे #harbour04 #bar #illegal
@ThaneCityPolice
@DGPMaharashtra
@Info_Thane1
@CMOMaharashtra @mieknathshinde @INCIndia @ShivSenaUBT_ @mnsadhikrut
कल्याण कोळसेवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे RD Orchestra BAR या बाबत आपण 2 दिवसापुर्वी या ठिकाणी सुरू असलेल्या नियमाचे उल्लंघन बाबत माहिती प्रसारित करण्यात आली होती व ती माहिती तंतोतंत खरी असून तसे सिद्ध करणारे हे संभाषण सोबत जोडले आहे. RD Orchestra येथून एका इसमाने बातमी करू नये या साठी सेट��मेंट करण्यासाठी फोन केला व यातूनच या ऑर्केस्ट्रा बार मध्ये अनेक नियमाचे उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले.
सुचना - अनुचित कामे करणाऱ्यांनी सेटलमेंट, धमकी, यासाठी कॉल करू नये, कॉल रेकॉर्ड करून सार्वजनिक केला जाईल, धन्यवाद
@ThaneCityPolice @DGPMaharashtra @Info_Thane1 @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR
फडतुस प्रशासनाचा फडतुस विकास!
Easrern Free way खालून CST कडे जाणाऱ्या या रस्त्याची दरवर्षानुसार दयनीय अवस्था झाली असून, येथील स्थानिक प्राशन अजून ही झोपेत आहे, फक्त तात्पुरती मलम पट्टी करून कॉन्ट्रॅक्टर दरवर्षी करोडो रुपये खड्डे बुजवण्याच्या नावाखाली खात आहे का? हे प्रशासन साधा टिकाऊ रस्��ा बनवु शकत नाही खुप लाजिरवाणी बाब ठरत आहे, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मेहरबानी करावी #खड्डा #रस्ते #विकास #मुंबई #वडाळा #bpt @MumbaiPortTrust @mybmc @MMRDAOfficial @CMOMaharashtra @nitin_gadkari @mieknathshinde @MumbaiPolice
ठाणे येथील नवशीब��ई कंपाऊंड, लवली फर्निचर समोर, ऑस्कर हॉस्पिटल जवळ, टीकुजिनीवाडी रोड, मानपाडा, ठाणे पश्चिम ( सोबत फोटो जोडलेला आहे) येथील सदर बांधकामासंबंधी पालिकेतून माहिती घेतली असता या ठिकाणी रिपेरिंग ची परवानगी दिली आहे असे समजते, पण खरतर या ठिकाणी रिपेरिंग न करता जुने बांधकाम पुर्ण निष्कासित करून नव्याने नवे बांधकाम केले जात असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सुरू असलेले सदर बांधकाम अनधिकृत असून महान���रपालिकेच्या सर्व नियमांची पायमल्ली करून बांधकाम केले जात आहे, सदर बांधकामांची चौकशी करून दोषी पालिका कर्मचारी व बांधकामधारकावर कठोर कारवाही करावी व सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे ही विनंती. @TMCaTweetAway @ThaneCityPolice @CMOMaharashtra @mieknathshinde @PratapSarnaik @MSEDCL @MahaDGIPR #illegalconstruction #thane #manpadachitalsar #awarness #tikujiniwadi
आयुक्तांचे आदेश न मानणारे सहाय्यक आयुक्त हे आयुक्ता पेक���षा मोठे झालेत का?
प्रशासन मेहरबान, तर भुमाफिया पैलवान!
मित्रानो, आज आपण ठाणे येथील सावित्रीबाई फुले उद्याना समोरील, शाउ स्मृती इमारतीच्या बाजूला, महात्मा फुले नगर, लोकमान्य - सावरकर नगर जवळील अनधिकृत इमारती बाबत माहिती घेणार आहोत, जानेवारी 2023 पासून सुरू असलेल्या या इमारतीचे काम आज ही 2026 मध्ये पूर्ण झालेले दिसून येते, गुगल हिस्ट्री नुसार जानेवारी 2025 मध्ये ह्या इमारतीचे सातव्या मजल्याचे काम सुरू होते. आणि आता 2026 मध्ये आठ मजल्यांची ही इमारत पूर्ण तयार झाली आहे.
आपण पालिकेला जानेवारी 2025 मध्ये या बांधकामाबाबत विचारणा केली असता पालिकेने या इमारती बाबत उत्तर दिले त्या उत्तराला अनुसरून आपण या विषयासंबंधित माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहोत
आपण स्क्रीनवर ठाणे महानगरपालिकेच��� एक पत्र पाहू शकता, या पत्रात कायद्याच्या कलमांची मोठी यादी आहे, पोलिसातल्या तक्रारींचा उल्लेख आहे आणि 'काम थांबवा' अशा नोटिसांचा पाऊस आहे. या इमारतीला पाडण्यासाठी या नोटिसा निघाल्या, ती इमारत आज दिमाखात उभी आहे! मग प्रश्न पडतो, पालिकेची ही कारवाई केवळ कागदावरच मर्यादित आहे का?"
ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती ने दिलेल्या उत्तरात काय म्हटले आहे? हे पाहुयात!
#ठाणे #लोकमान्यनगर #महात्माफुलेनगर #अनधिकृतबांधकाम #ऐरोली #माजिवडा #बाळकुम #रबाळे #घणसोली #महानगरपालिका @CMOMaharashtra @mieknathshinde @TMCaTweetAway @ThaneCityPolice @MahaDGIPR @NCPspeaks @Shivsenaofc @INCIndia @VBAforIndia
अनधिकृत इमारतीवर कारवाही कधी होणार? @NMMConline@CIDCO_Ltd
ऐरोली मध्ये सध्या काय चालले आहे या आपल्या सिरीज च्या सहाव्या भागात आज पुन्हा एकदा नवी मुंबई येथील ऐरोलीच्या शिव कॉलनी जवळ, श्री गजानन महाराज मार्गावरील, भारत बेकरी, स���क्टर 1 येथील भूखंडावरील घोटाळ्या बाबत जाणून घेणार आहोत.
गुगल मॅप डेटा अनुसार 2021 ते 2024 पर्यंत या ठिकाणी एक मोठे झाड दिसत आहे झाडा जवळच भारत बेकरी होती, त्यानंतर ऑक्टोबर 2024 या दिनी महानगरपालिकेला येथील सर्व झाडे व तेथील भारत बेकरी आणि इतर बैठी घरे दुकाने तोडून इमारत बांधकाम सुरवात झाली असताना आढळून आली आणि त्या नंतर महानगरपालिकेने नोव्हेंबर 2024 मध्ये या अनधिकृत बांधकाम धारकास नोटीसा बजावल्��ा आणि जानेवारी 2025 मध्ये किरकोळ कारवाही केली आणि पुढे नियमानुसार पुढे कार्यवाही करू असे उत्तर दिले ते आपण स्क्रीनवर पाहू शकता. स्क्रीन वर आपण जानेवारी 2025 चे फोटो पाहू शकता, महानगरपालिकेची आणि सिडको ची अशी कोणती कारवाही आहे, ज्यामध्ये काम न थांबता आज 2026 मध्ये इमारत तयार झाली आहे, इमारतीच्या तळ मजल्या वर आपणास भारत बेकरी ही दिसून येते महानगरपालिकेची आणि सिडको अधिकारी यांची पैसे खाण्याची भूक किती आहे हे या प्रकरणातून दिसुन येते, अश्या नालायक लोकांनमुळे लोकांचे हक्काचे पाणी वीज, जमीन आज या अनधिकृत इमारतींना दिले जाऊन सामान्य नागरिक मात्र सुविधे पासून आज ही वंचितच राहिला आहे.
ऐरोली मधील षंढ राजनेत्याना लाजा वाटल्या पाहिजे एक ही पक्ष उघड उघड चाललेल्या भ्रष्टाचारा विरुद्ध एक शब्द काढायला तयार नाहीत, वाहत्या गंगेत हात कसा धुता येईल यावरच या या नेते मंडळीच लक्ष असते, ऐरोली मधील प्रस्थापित जूने नेते आपला सातबारा कसा वाढेल, प्रत्येक अनधिकृत बांधकामामध्ये हिस्सेदारी कशी मिळेल याच विचारात आह�� , त्या मुळे घर घेणाऱ्या ग्राहकांनो अश्या अनधिकृत इमारती मध्ये घर घेऊ नका कारण एक दिवस या इमारती जमीनदोस्त होतील आणि तुमच्या मेहनतीचा पैसा नक्कीच व्यर्थ जाईल, सतर्क रहा जागृत ग्राहक बना, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत हा शेअर करा आणि फसवणुकीपासून इतर नागरिकांचाही बचाव करा.
धन्यवाद , जय भारत जय संविधान
#ऐरोली #airoli #अनधिकृतबांधकाम #नवीमुंबईमहानगरपालिका #महाराष्ट्र @shivsena @ekntah @cmomaharashtra