संवाद से समाधान की नीति से मोदी सरकार राज्यों के बीच लंबित मामलों का तेजी से निवारण कर रही है। सरदार सरोवर परियोजना पर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान और मध्य प्रदेश के बीच एक महत्वपूर्ण समझौता हुआ है।
नर्मदा अवार्ड से जुड़े इन दशकों पुराने भुगतान संबंधी लंबित मुद्दों के समाधान से इन राज्यों में जल सुरक्षा बेहतर होगी, राज्यों के बीच समन्वय को नई ऊर्जा मिलेगी तथा किसानों और जनकल्याण के लिए दूरगामी परिणाम सुनिश्चित होंगे।
पूर्वी 'व्होट जिहाद'ची भाषा करणाऱ्यांना आज अचानक हिंदुत्वाची आठवण होणे, हा निव्वळ राजकीय दिखावा आहे.
भगव्या ध्वजाचा अपमान करणारे आणि प्रभू श्रीरामांविषयी अवमानकारक भूमिका घेणाऱ्यांचा हा खोटा कळवळा महाराष्ट्राची जनता ओळखून आहे.
निवडणुकीपूर्वी 'व्होट जिहाद'साठी दाढ्या कुरवळणाऱ्यां उध्वस्त ठाकरेंना आज पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली आहे. 'जे जय श्रीराम म्हणतात, त्यांना मी हरा@खोर म्हणतो' अशी हिंदुद्वेषी गरळ ओकणाऱ्या उबाठांचे खरे रूप महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे.
पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय झाल्यामुळे ते हल्ली भगव्या ध्वजाला 'फडकं' म्हणायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. प्रभू श्रीराम काल्पनिक आहेत म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आज कसला हा खोटा कळवळा दाखवत आहेत?
#ShameOnUBT
राज्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी जलसंधारण, सौर कृषिपंप, दिवसा मोफत बीज, कृषी यांत्रिकीकरण, प्रमाणित बियाणे, सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार अशा विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्याने काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis जी यांनी वेळ काढून 'कॉर्पोरेट कायदे (सुधारणा) विधेयका'च्या जॉईन्ट पार्लमेंट्री कमिटी सदस्यांची आज अनौपचारिक भेट घेतली. चहापानादरम्यान झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा आणि गप्पा झाल्या. या संवादातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खासदारांना महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी विकासकामांची माहिती मिळाली. महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीकडे किती गतीने पावले टाकत आहे, याचा अनुभव सर्वच खासदारांनी घेतला.
Impact ‘Borivali Pattern’
बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी रॅम्प उभारण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ काम पूर्ण केले. मात्र, प्रत्यक्ष वापर करताना हा रॅम्प सुरक्षित नसल्याची बाब एका दिव्यांग बांधवाने व्हिडिओद्वारे माझ्या निदर्शनास आणून दिली.
या तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आणि रॅम्पची दुरुस्ती करून तो अधिक सुरक्षित व सुलभ करण्यात आला.
नागरिकांच्या सूचनांना प्रतिसाद देत त्यांच्या समस्या तातडीने सोडवणे, हीच 'बोरीवली पॅटर्न'ची खरी ओळख आहे.
तुमच्या या प्रतिक्रिया आणि समाधान, हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे. यामुळेच अधिक संवेदनशील आणि नागरिकाभिमुख काम करण्याची प्रेरणा मिळते.
धन्यवाद! 🙏
‘बोरीवली पॅटर्न’मुळे बोरिवलीत नागरिकांची सुरक्षितता, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, शिस्तबद्ध वाहतूक आणि दैनंदिन जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
#SanjayUpadhyay #Borivali #BorivaliPattern #DivyangJan #CitizenFirst #PublicSafety #AccessibleBorivali #BJP
मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत आवश्यक आहे.
जर कर्नाटकातील SIR प्रक्रियेदरम्यान मशिदी आणि विवाह सभागृहांमध्ये मतदार यादी पुनरावलोकनाचे काम करून घराघरांत जाऊन पडताळणी करण्याच्या अनिवार्य नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर हा अत्यंत गंभीर विषय आहे.
जर घराघरांत जाऊन पडताळणी करण्याऐवजी इतर ठिकाणी प्रक्रिया राबवली जात असेल, तर या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निःपक्षपाती आणि नियमांनुसार होणे गरजेचे आहे.
मतदार यादीतील प्रत्येक नोंद ही लोकशाहीच्या बळकटीकरणाशी निगडित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेला स्थान नसावे.
#SIR2026 #ElectionCommission
@ECISVEEP
📍बोरिवली (पूर्व)
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार मा. श्री. पीयूष गोयल जी यांच्या पुढाकारातून आणि प्रभाग क्रमांक १३च्या नगरसेविका राणी द्विवेदी-निघूट यांच्या माध्यमातून आयोजित “MEGA JOB FAIR” ला भेट दिली.
रोजगाराच्या विविध संधी युवक-युवतींपर्यंत पोहोचवून त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने सक्षम बनवणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. अनेक तरुणांच्या करिअरला नवी दिशा देणारा हा रोजगार मेळावा ठरत आहे.
यावेळी उपस्थित युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, कौशल्य विकास आणि रोजगारासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.
याप्रसंगी माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह, मंडळ अध्यक्ष देवेंद्र सिंह, नगरसेविका राणी द्विवेदी-निघूट, वॉर्ड अध्यक्ष धर्मवीर ठाकूर, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, आणि मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali #MegaJobFair #Employment #YouthEmpowerment #PiyushGoyal #BJP
*भारतीय जनता पार्टी* के प्रदेश अध्यक्ष, महान संगठनकर्ता, *रवींद्रजी चव्हाण जी* जिनके नेतृत्व में पार्टी ने स्थानीय निकाय चुनावों में ऐतिहासिक सफलता हासिल की। *प्रदेश अध्यक्ष के रूप में एक वर्ष* पूरा होने पर उन्हें हार्दिक बधाई!
भारतीय जनता पार्टी *बोरीवली पश्चिम मंडल* की साप्ताहिक बैठक *आमदार संजय उपाध्याय जी* की प्रमुख उपस्थित मे संपन्न हुई।
यह बैठक मैं..
आजी/माजी नगरसेवक
मंडल में रहने वाले महाराष्ट्र/मुंबई/जिला के पदाधिकारी ओर मंडल की टीम उपस्थिति थी|
आनेवाले कार्यक्रम ओर संगठन के विषय पर चर्चा की
आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. @AshwiniVaishnaw जी यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान बोरिवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी व आधुनिकीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी केली. तसेच बोरिवली–चर्चगेट दरम्यान एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, बोरिवली–बेलापूर लोकल सेवा सुरू करणे, दहाणू–विरार–बोरिवली मार्गावरील मेमू सेवांच्या जागी आधुनिक लोकल गाड्या सुरू करणे, अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविणे तसेच पश्चिम उपनगरांतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बोरिवली हे पश्चिम रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असून, दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक त्या मागण्या रेल्वेमंत्र्यांसमोर मांडल्या.
यापूर्वी विलेपार्ले रेल्वे स्थानकावर एस्कलेटर बसविण्याच्या मागणीची अंमलबजावणी सुरू झाल्याबद्दल माननीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. या सर्व मागण्यांबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असून, बोरिवलीकरांच्या हितासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील.
याप्रसंगी माझ्यासोबत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान आणि भाजपा उत्तर-मध्य मुंबई जिल्ह्याचे महामंत्री शुभ्रांशू दीक्षित उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali #AshwiniVaishnaw #Railway #MumbaiLocal #WesternRailway #BJP
📍 योगीनगर, बोरिवली (प.)
आज योगेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेतले.
तसेच चमेलीदेवी गोकुळचंद अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि योगेश्वर महादेव धाम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन 'निःशुल्क ॲलोपॅथिक दवाखान्याचा' शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सल्ला आणि औषधोपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून, डॉ. इंदिरा घई यांच्या माध्यमातून नियमित आरोग्य सेवा दिली जाणार आहे.
समाजहित आणि जनसेवेच्या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या लोकहितकारी उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त, संचालक, डॉक्टर आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
याप्रसंगी संयोजक दिनेश झाला, जिल्हा मंत्री सुरेंद्र गुप्ता, अमित व्यास, ट्रस्टचे विश्वस्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali
📍 चारकोप सेक्टर-८, बोरिवली (प.)
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या 'मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर' अंतर्गत चारकोप सेक्टर-८ (पॅकेज-E) येथील कामाची आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी पाहणी केली.
या प्रकल्पाअंतर्गत चारकोप सेक्टर-८ पर्यंत उन्नत मार्ग (Elevated Transition) विकसित करण्यात येत असून, महत्त्वाचे इंटरसेक्शन उभारले जाणार आहे. तसेच येथून बोरिवलीकडे जाणाऱ्या वाहनांना विद्यमान रस्ते जाळ्याशी थेट जोडणी मिळणार असल्याने वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार जी, आमदार अमित साटम जी, आमदार प्रकाश सुर्वे जी, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका संध्या दोषी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali #MumbaiCoastalRoad #CoastalRoadNorth #Development #MumbaiInfrastructure #BJP
@Dev_Fadnavis@ShelarAshish@AmeetSatam@TawdeRitu@misanjayghadi
📍 बोरिवली
आज भाजपचे कार्यकर्ते मितेश प्रजापती यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय कार्यात निरंतर यश लाभो, ही सदिच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी माजी नगरसेवक प्रवीण शाह, संयोजक दिनेश झाला, जिल्हा मंत्री सुरेंद्र गुप्ता, मंडळ अध्यक्ष नैनेश शाह, देवेंद्र सिंह, मंडळ अध्यक्षा सुरेखा ठोके, नगरसेवक शिवानंद शेट्टी, वॉर्ड अध्यक्ष धर्मवीर ठाकूर, रचित जैन, अमित कदम, श्रेया प्रभू, हनुमान मेकला, चेतना उपाध्याय, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali #Bjp
दखल माध्यमांची!
दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. @AshwiniVaishnaw जी यांच्यासोबत झालेल्या भेटीची माध्यमांनी दखल घेतली आहे.
या भेटीदरम्यान बोरिवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीला गती देणे, एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, बोरिवली- बेलापूर लोकल सेवा सुरू करणे तसेच पश्चिम उपनगरांतील लाखो प्रवाशांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बोरिवलीकरांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक रेल्वे सुविधा मिळाव्यात यासाठीचा हा पाठपुरावा यापुढेही कायम राहील.
#SanjayUpadhyay #Borivali #AshwiniVaishnaw #RailwayDevelopment #MumbaiLocal #WesternRailway #BJP
मुंबईच्या विकासाला नवी दिशा, नव्या वेगाने!
सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात 'मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर' आकार घेत असून, अधिक वेगवान, हरित आणि सुसंलग्न मुंबईच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
वर्सोवा ते भाईंदर दरम्यान उभारला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बोरिवलीसह पश्चिम उपनगरांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असून, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे.
#MumbaiCoastalRoad #DevendraFadnavis #MumbaiDevelopment #Infrastructure #SanjayUpadhyay #Borivali
📍 न्यू एमएचबी कॉलनी, बोरिवली (प.)
सकल हिंदू समाज आयोजित 'हिंदू संमेलन' कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताच्या विचारांनी प्रेरित अशा या संमेलनात समाजातील विविध घटक एकत्र येऊन हिंदू एकता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्यांवर विचारमंथन करण्यात आले. तसेच विविध पारंपरिक सादरीकरणांनी कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री. जयेश मिस्त्री आणि सौ. मेघावी सोनी, नगरसेविका श्वेता कोरगावकर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali #HinduSammelan #BJP
आठवडा ०५ | दिवस ०२
१४ जून २०२६ | रविवार
दिल्लीतील शिवाजी स्टेडियम ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-३ हा जवळपास दीड तासांचा प्रवास 'एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रो'मुळे अवघ्या १८ मिनिटांत पूर्ण झाला.
वेळेची बचत, इंधनाची बचत आणि प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित व आधुनिक वाहतूक व्यवस्था...
विकसित भारताच्या दिशेने वेगवान पायाभूत सुविधांची हीच ताकद आहे.
#SanjayUpadhyay #DelhiMetro #AirportExpress #Infrastructure #ViksitBharat #Borivali