आज गोरेगाव येथे आझाद मैदानात झालेल्या युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात ��ुवासैनिकांशी, स्थानिकांशी संवाद साधला.
ह्यावेळी, देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रातही महाविकास आघाडीचंच सरकार येईल; हा विश्वास व्यक्त केला.
सभेस समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील जी, ��िवसेना नेते सुभाष देसाई जी, आमदार अनिल परब जी, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू जी, खासदार प्रियंका चतुर्वेदी जी, उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल किर्तीकर जी, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई जी उपस्थित होते.
गिरगाव म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला!
आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी गिरगाव शाखा क्र. २१८ ला भेट देऊन निष्ठावंतांशी संवाद साधला.
@ShivSenaUBT_@OfficeofUT@AUThackeray@AGSawant
जनसंवाद...
हा संवाद आहे लोकहितासाठी, न्यायासाठी आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी!
जनसंवादाची ही मशाल आज यवतमाळ-वाशीम लोकसभेतील पुसद येथे धगधगली. विठाबाईनगरात पार पडलेल्या ह्या सभेत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी व्यक्त केलेले विचार निष्ठावंत शिवसैनिकांची एकजूट मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
'माझी जनता हे माझं वैभव आहे, हे वैभव खोक्यामध्ये मावणारं नाही', हा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
‘ही तमाम जनता माझी आहे, म्हणून ते माझ्यासोबत आहेत‘ अशी साद घालत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ जनसंवाद साधला.
येणाऱ्या काळात विजय आपलाच आहे हा ठाम विश्वास इथल्या जनतेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हाच विश्वास कोकणच्या विकासाची दिशा ठरवणार.
आज पेण शहर हायस्कूलच्या प्रांगणात निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधून पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी जनसंवाद दौऱ्यास प्रारंभ केला. महाराष्ट्रासोबत गद्दारी करणाऱ्या प्रत्येकाला इथली माती गाडल्याशिवाय राहत नाही, हा इतिहास आहे. ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल तर हुकूमशाहीला एकजुटीच्या बळावर गाडावं लागेल, असा विश्वास ह्यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला.