आज हा 83 वर्षाचा योद्धा #MPSC च्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांना जाऊन रात्री भेटले ... समस्या सुटणार ..
#लोकनेता#SharadPawar@PawarSpeaks
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक - २०२३ साठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil यांनी केले आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा! सर्व शिव-शंभू भक्तांना या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वराज्याच्या छाव्याचा, आपल्या शंभुराजांचा धगधगता इतिहास पुढच्या पिढीपर्यंत व घरोघरी पोहोचवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील, हेच त्यांना माझं कृतीतून अभिवादन!
आपले अतुलनीय साहस आणि धैर्याने स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूविरोधात छत्रपती संभाजी महाराज यांनी कडवी झुंज दिली. स्वराज्य निष्ठेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे स्वराज्य रक्षणकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा... आज माँसाहेबांच्या पावन स्मृतीस मानवंदना व पुष्पहार अर्पण करण्यात आल��� व या वेळी सर्व मित्रपरिवार उपस्थित होता...🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा रुजवून त्यांना प्रजाहितदक्षतेचे बाळकडू देणाऱ्या स्वराज्यप्रेरीका, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन...
#जिजाऊ_जन्मोत्सव
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निम्मित १३/०१/२०२३ रोजी शालेय मुलींसाठी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभाग घेण्यासाठी आप आपल्या ��ाळेत संपर्क साधावा..💐💐
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोस्तवा निमित्त दिं:- १२/०१/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ चौक येथे पुष्पहार व मानवंदना अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ..🙏🏼🙏🏼
सरत्या वर्षातील सुखद आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षात प्रवेश करूया. हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. नवी�� वर्ष सर्वांगीण प्रगतीचं वर्ष ठरो!..💐💐
#HappyNewYear2023
ऐतिहासिक जयस्तंभ हा शौर्य, न्याय आणि समतेचे प्रतीक म्हणून पिढ्यानपिढ्या आम्हाला प्रेरणा देत राहील...
शौर्य दिनानिमित्त कोरेगा��-भीमा येथील रणसंग्रामात आपल्या शौर्याची गाथा अमर केलेल्या वीरांना विनम्र अभिवादन...
#Jaystambh #BhimaKoregaon #ShauryaDiwas
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कडून #महाराष्ट्र_समजून_घेताना या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली
जोपर्यंत विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी व्यक्त केली.
#NCP
आजच्या दिवशी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली.आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही.याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस 'नोटाबंदीला श्रद्धांजली' वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
#Demonetization
आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी व्यक्त केला.