भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
ठाण्यात येऊन दाखवा आणि ठाण्यातून जाऊन दाखवा अशी भाषा कायद्याच्या राज्यात सुरू आहे!
एक राजकीय हत्या दडपण्यासाठी हे चालले आहे!
मुख्यमंत्री साहेब अशाने तुमचे गृहमंत्रीपद कुचकामी ठरेल आणि मुख्यमंत्री पदाची शोभा होईल!
@Dev_Fadnavis@PMOIndia@AmitShah
गुजरातमधील दोन माणसे आमचा महाराष्ट्र... महाराजांचा महाराष्ट्र पोखरणार? आमचा सह्याद्री पोखरणार? आणि आम्ही हतबल राहायचं? - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray#Gujarat#MNS#Nashik#TorrentPower#LatestNews
(Raj Thackeray, Gujarat, Nashik, MNS, Torrent Power, Maharashtra)
अमित शाह... कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. ती ज्या दिवशी तुम्हाला बसेल त्या दिवशी कळेल तुम्ही काय काय पापं केलीत. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#AmitShah#RajThackeray#MNS#BJP#Maharashtra#LatestNews
(Amit Shah, Raj Thackeray, MNS, BJP, Maharashtra, Latest News)
मुंबई विमानतळावरील T-1 टर्मिनलची दुरुस्ती रखडलेली असताना, प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा सल्ला का दिला जातोय?
मुंबई विमानतळावरील T-1 टर्मिनलची दुरुस्ती रखडवून, टर्मिनल बंद करायचा डाव तर नाही??