मी नेपाळ चा निषेध करतो!
फक्त मीच नाही तर प्र���्येक भारतीयाने नेपाळचा निषेध केलाच पाहिजे!
सरकारने तातडीने नेपाळला सक्त ताकीद देऊन त्याच्या या अशा वागण्यावर ताशेरे बीशेरे ओढले पाहिजे. वेळ पडली तर लष्कराला तयार राहायला सांगितले पाहिजे!
एका ३५वर्षाच्या रॅपर ला जो कर्नाटक राज्यातून स्ट्रक्चरल इंजिनियर झाला. त्याला तुम्ही काठमांडूचा मेयर करता आणि आता नेपाळचा पंतप्रधान!
नेपाळ तू काहीही करतोस! माग��्या वर्षी त्या जेन झी ला घेऊन सत्ता उलथून टाकलीस.
नेपाळ तू असं का करतोस? तुझ्या आशा या वागण्याने आम्हा भारतीयांना खुप म्हणजे खूपचं त्रास होतो. आम्ही दुर्लक्ष करायचे ठरवतो पण तरी तू रोज आपलं नविन काहीतरी करत राहतो .
तो बालेंद्र शहा उर्फ बालेन शहा नेपाळ मध्ये नवी पहाट आणू पाहात आहे. लोकांमध्ये मिसळून, काळा गॉगल लाऊन मस्त सेल्फी काढत आहे. प्रायव्हेट शाळा कॉलेज बंद करत आहे. vip कल्चर बंद करून मंत��र्या संत्र्याना सामान्य माणसासारखे वागण्याचे धडे देत आहे. संपुर्ण युवा मंत्रिमंडळ तयार करत आहे.
काय चालवलं हे! कधी विचार केला का याचा आपला शेजारी भारतावर काय परिणाम होईल.
आमच्या देशाचं सर्व राजकारण म्हाताऱ्यांच्या भरवशावर चालते. आम्ही ही राजकारणात ��ीढी दर पीढी म्हातारेच ठेवतो. ते त्यांच्या दुकानदाऱ्या बरोब्बर चालवतात. त्याचे कारण असे की नविन विचारच नाही येऊ द्यायचे आम्हाला युवकांच्या डोक्यात!
तुम्ही नेपाळ्यांनी ते सर्व जुने खोडं k p शर्मा ओली, प्रचंड, शेरबहादुर देऊबा यांना पार गारद केलं आणि आता सर्व नवीन युवा, शिकलेले, तज्ञ लोक मंत्रिमंडळात भरत आहात. सरकारी दवाखान्यात नर्स असलेल्या मुलीला तुम्ही देशाची आरोग्य मंत्री केलं.
थोडा तर��� विचार करा. ठीक आहे आमची नेते मंडळी गेंड्याच्या कातडीची आहे. पण उद्या भारतातले युवा मोबाईल मधुन तोंड वर काढून बंड करून उठले तर काय करायचं आम्ही?
जे नेपाळी आमच्या इकडे रात्री गस्त घालायचे, सलाम साब म्हणायचे; ते आता एकदम एवढी वैचारिक क्रांती करून राहिले.
हे आम्ही बिलकूल खपवून घेणार नाही.
प्रशांत बोराडे, चंद्रप��र.
"हो, मी माझ्या पत्नीला मारलं…"
बेंगलूरू मधून आलेला हा आवाज कोणत्याही चित्रपटाचा डायलॉग नव्हता…
ही एक अशी सत्यकथा होती, ज्याने संपूर्ण देशाला हादर���ून टाकलं.
७६ वर्षांचा एक वृद्ध…
Indian Space Research Organisation (ISRO) मधील निवृत्त वैज्ञानिक…
ज्याने आयुष्यभर देशासाठी काम केलं…
आज स्वतःच्या निर्णयाच्या ओझ्याखाली कोसळलेला.
नाव – वी. नागेश्वर राव.
विज्ञानाच्या माध्यमातून देशाला पुढे नेणारा एक माणूस… 🚀🇮🇳
पण आयुष्याच्या एका वळणावर तो हरला.
ही कथा रागाची नाही…
ही कथा लोभाची नाही…
ही कथा आहे भीतीची…
अश्या भीतीची, जी माणसाला आतून पोखरते… 😔
तो आपल्या पत���नीचा तिरस्कार करत नव्हता…
तो तिच्यावर खूप प्रेम करत होता… ❤️
कदाचित इतकं, की तिच्याविना आयुष्याची कल्पनाही त्याला सहन होत नव्हती.
दररोज तिची खालावत जाणारी तब्येत…
तिचं आजारपण… तिची असहायता…
आणि त्याच्या मनात सतत एकच प्रश्न –
"जर मी आधी गेलो… तर हिचं काय होईल?" 💔
एकुलती एक मुलगी… परदेशात… 🌍
तिच्या आयुष्यात व्यस्त.
आणि इथे हे दोघं…
चार भिंतींमध्ये… वाढत्या एकटेपणासोबत.
माणूस वेदनेने नाही तुटत…
तो तेव्हा तुटतो, जेव्हा त्याला भविष्य अंधारलेलं दिसतं. 🌑
कदाचित त्या वृद्धाने हजार वेळा स्वतःला थांबवलं असेल…
हजार वेळा समजावलं असेल…
पण एक दिवस भीतीने त्याच्यावर विजय मिळवला.
त्याने पत्नीचा गळा आवळला…
आणि पळून गेला नाही.
लपला नाही.
तिथेच बसून राहिला… जणू तोही आतून संपला होता.
पोलीस आले…
आणि त्याने शांतपणे सांगितलं –
"हो, मी माझ्या पत्नीला मारलं…"
हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही. ⚖️
हा आपल्या समाजाचा आरसा आहे.
आज प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न –
मुलं मोठी व्हावीत… यशस्वी व्हावीत… परदेशात जावीत… ✈️
पण त्याच यशाची किंमत कोण चुकवतं?
रिकामं घर…
ओस पडलेलं अंगण…
फोनच्या एका ��िंगसाठी वाट पाहणारी आई… 📞
दरवाज्याच्या टकटकवर दचकणारे वडील…
आपण मुलांना उडायला शिकवत आहोत… 🕊️
पण परत यायला शिकवत आहोत का?
मोठं घर…
दोन मुलं परदेशात…
आई अंथरुणाला खिळलेली…
वडील तिचा आधार…
एका दिवशी वडिलांना हृदयविकाराचा झटका… 💔
आणि तिथेच संपलं सगळं.
घर बंद…
आत एक मृतदेह… आणि एक असहाय आई.
दिवसा मागून दिवस निघून गेले…
कोणी दरवाजा ठोठावला नाही…
कोणी चौकशी केली नाही…
जेव्हा दरवाजा त���डला गेला…
तेव्हा फक्त दुर्गंधीच बाहेर नाही आली…तर
नात्यांची सडलेली जाणीव बाहेर आली. 😢
मुलांना बातमी दिली गेली…
पण ते आले नाहीत.
कदाचित वेळ नव्हता…
किंवा मन नव्हतं.
मग विचार करा… 🤔
अशी संपत्ती कशाला…?
अशी प्रगती कशाला…?
जिथे आई-वडिलांच्या श्वासालाही साथ नसते…
जिथे शेवटची वर्षं एकटेपणात जातात…
आपण मुलांना सक्षम बनवत आहोत…
पण संवेदनशीलही बनवत आहोत का? ❤️
हा विकास आहे का…?
की आपली सर्वात मोठी हार…?
थोडा वेळ थांबा…
स्वतःला विचारा –
ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य झिजवलं…
त्यांच्या शेवटच्या काळात आपण त्यांच्या सोबत आहोत का?
की आपणही त्यांना चार भिंतींमध्ये…
आणि अंतहीन प्रतीक्षेत सोडून चाललो आहोत…? 🕰️
"ज्या हातांनी आपल्याला उभं केलं… ते हात शेवटी एकटेच राहावेत का?"
#jyotinimbalkar
फक्त स्टॅम्प ड्युटी चुकवणे इतकाच गुन्हा या प्रकरणात असेल तर मग उद्या तेवढी स्टॅम्प ड्युटी भरून ही जमी�� कोणीही विकत घेऊ शकतो का?
40 एकराची महार वतनाची जमीन.. एक प्रकारे सरकारी जमिनीचा अपहार करण्याचा प्रयत्न
त्याची शिक्षा फक्त दुय्यम निबंधक आणि आजवर नाव माहित नसलेला पार्टनर यांनाच?
अजित पवारांची ही केस …. एकनाथ खडसेंसारखीच नाही का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उप मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार ?
पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या Amadea Holdings LLP नावाच्या कंपनीने, १८०४ कोटीची महार वतनाची जमीन ३०० कोटीला घेतली? ह्या व्यवहारात २ दिवसात स्टँप ड्यूटी देखील माफ करण्याचे आदेश आले ?
मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे
१) महार वतनाची जमीन
Bombay Inferior Village Watans Abolition Act, 1958, कलम 5(3) नुसार:
अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता य���त नाही.
म्हणजे कायद्याने…
•वतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता विकता येत नाही.
•जर परवानगी न घेता विक्री झाली, तर ती बेकायदेशीर (illegal transfer) ठरते.
•अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते.
मग महसूल मंत्री ही जमीन जप्तीचे आदेश कधी देणार?
२) ही जमिन असलेल्या भागात आधीचे व्यवहार काय भावाने झाले ह्याचा तपशील द्यावा
३) स्टँप ड्यूटी न घेण्याचा निर्णय कोणी व कुठल्या अधिकाराने घेतला?
४) हा व्यवहार १० कोटीच्या वरचा असल्याने EOW आणि ED ने ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. १ लाख रुपये Paid Up Capital असलेल्या कंपनीत ३०० कोटी कसे आले ? Unsecured Loan होते की Bank Loan? Unsecured loan असेल तर कुठल्या डायरेक्टर ने दिले ? जर पार्थ पवारने दिले तर हे कुठून आले?
आणि हे जर त्याने दिले असतील तर हा ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल.
@zee24taasnews ह्यांनी हा मोठा घोटाळा उघड केला आहे. @kamleshsutar
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार —
पण पोराच्या १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ !
ही माफी फुकट नव्हती का?
लक्ष्मण हागे राहतो ते ठिकाण आणि फलट��� हे ठिकाण दोन तास अंतराचे आहे, पण हा सुपारी बहाद्दर तिथे का गेला नाही? पिडीत कुणीही असुद्या त्यांना जात धर्म नसतो पण विषय एखाद्या समूहाचे कातडे पांघरून दलाली करणाऱ्यांना उघडे पाडण्याचा आहे.
काही iघाल्यांनी बीड जिल्ह्यात पैसा,पॉवर, सत्तेसाठी खून पाडले, आरोपी स्वाजातीचे म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले,त्या जातीच्या नेत्यांनी मंत्रिपदासाठी समाजाचा दबाव वापरला,सगळा महाराष्ट्र बघत होता यांचा नंगानाच,यांच्यामुळे बीड बदनाम झाला आणि आरोप करतात आम्ही विष पेरलं म्हणे
मराठ्यांनो लक्षात ठेवा !!
जर संतोष देशमुख आपला भाऊ होता
तर संपदा मुंडे आपली बहीण होती
खासदार आणि त्याच्या pa ला सोडू नका
dysp पण निलंबित झाला पाहिजे
इथे आपला विषय क��लिअर आहे
मराठा समाज जातीवादी नाही आणि आरोपीचा मागे उभारणार नाही
फलटणमधल्या डॉक्टर तरुणीचे आत्महत्या प्रकरण भयानक संतापजनक आहे
एक MBBS झालेली शेतकऱ्याची मुलगी वैद्यकीय अधिकारी म्हणून एखाद्या ठिक���णी नियुक्त होते.. आणि अवघ्या 2 वर्षात तिच्यावर आत्महत्येची वेळ येते
तिने चार महिन्यांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, आपल्या तक्रारीचे काय झाले म्हणून आरटीआय दाखल केला, माझ्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला तर पोलीस जबाबदार असतील असं आधीच लिहून ठेवलं होतं
ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर या प्रकरणात आरोप आहे त्या फलटण पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन ��रायला परवा 26 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा आहे
या प्रकरणाचं चित्र स्पष्ट होत नाही, त्या मुलीला न���याय मिळत नाही तोवर मुख्यमंत्री तिथे जाणार नाहीत ही साधी अपेक्षा आहे.
#अवलादी बाग कायमचा सुखवल्याशिव शांत बसणार नाहीत वाटतं,
हा माज का आहे माहितेय...??
नासलेला #नेता बोकांडी घेतो म्हणून....!
कुत्र्याच शेपूट वा��ड ते वागडच...
खरा मायक्रो ओबीसी नेता💪🏻💪🏻
माधव जातीचे तेली समाजातील व्यक्ती आमदार झाला म्हणून जळतात यांचे वर
माननीय आमदार संदीप भैया शिरसागर यांचं हार्दिक अभिनंदन तुमच्या पाठीशी मराठा समाज पूर्ण पाठीशी आहे 🚩🚩
अंतरवली सराटीत मराठा आरक्षण लढ्याचे प्रणेते, मा.मनोजदादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मनोजदादांच्या नेतृत्वातून समाजाला न्याय आणि हक्कासाठी नवी दिशा मिळाली आहे. त्यांचा त्याग, संघर्ष आणि दृढनिश्चय हे मराठा समाजासाठी प्रेरणादायी आहेत.