तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते घडवण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचा एक भाग म्हणून 'डिजिटल लर्निंग' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात सामील होत डिजिटल लर्निंगचा अनुभव घेतला. या प्रशिक्षणाचा अनुभव पक्षकार्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल.
आपणही 'सरल ॲप'च्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी व्हा, हे विनम्र आवाहन!
#DigitalLearning #DigitalIndia #BJP4India
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री, राजकारणातील अष्टपैलू नेतृत्व आणि जनसेवक आदरणीय मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या धडाडीच्या नेतृत्वाला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#nileshrane #bjpmumbai #bjp
भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी नेते आणि देशाच्या एकता व अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे स्व. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!
#shamaprasadmukharji#bjp#bjpindian
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी मिळवलेला हा घवघवीत विजय म्हणजे पक्षाच्या लोककल्याणकारी धोरणांवर आणि कार्यकर्त्यांच्या अफाट कष्टांवर जनतेने दाखवलेला अढळ विश्वास आहे.
या निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न वरिष्ठ सभागृहात अधिक प्रखरतेने मांडले जावोत आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा रथ अविरतपणे पुढे चालत राहो, याच सदिच्छा!
#vidhanparishadelection #vidhanparishad #BJP #bjpindian
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी मिळवलेला हा घवघवीत विजय म्हणजे पक्षाच्या लोककल्याणकारी धोरणांवर आणि कार्यकर्त्यांच्या अफाट कष्टांवर जनतेने दाखवलेला अढळ विश्वास आहे.
या निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न वरिष्ठ सभागृहात अधिक प्रखरतेने मांडले जावोत आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा रथ अविरतपणे पुढे चालत राहो, याच सदिच्छा!
#vidhanparishadelection #vidhanparishad #BJP #bjpindian
साधे राहणीमान, उच्च विचार आणि देशाप्रती अथांग समर्पण असणाऱ्या भारताच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. देशाच्या प्रगतीमध्ये आणि लोकशाही मूल्ये जपण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांना सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
#rashtrpti #द्रौपदी_मुर्मू #draupadimurmuji
सायन कोळीवाडा विधानसभा, अँटॉपहिल मंडल सरचिटणीस जितेश गोळे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले समाजकार्य आणि पक्षनिष्ठा अशीच अविरत सुरू राहू दे. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
#JiteshGoleJi#SionKoliwada#AntopHill#BJPMumbai#GeneralSecretary
अणुशक्ती नगर विधानसभा, वाशी नाका मंडल अध्यक्ष उदयराज सिंगजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपण करत असलेले कार्य असेच अविरत सुरू राहू दे. आपणास पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य आणि यशाच्या हार्दिक शुभेच्छा!
#UdayrajSingh#AnushaktiNagar#BJPMumbai
भाजपा मुंबई महिला मोर्चा सरचिटणीस अंकिता चौधरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपले व्यक्तिमत्व आणि कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा!
#AnkitaChaudhary#BJPMumbai#MahilaMorcha#BJP#Leadership
भाजपा मुंबई सांस्कृतिक सेलचे ऊर्जावान संयोजक आणि आमचे मार्गदर्शक जैसलजी कोठारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कलेच्या आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपण पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत आहात. आपणास उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#bjpmumbai#bjp
स्वराज्य जननी, संस्कार मूर्ती, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, अशा थोर मातेचे विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील.
#rajmatajijau #rajmatajijaumasaheyb
विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी भाजप दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सम्मेलन’ अत्यंत उत्साहात संपन्न झाले. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत झालेल्या ऐतिहासिक विकासकार्यांचा आणि जनकल्याणकारी योजनांचा लेखाजोखा यावेळी प्रबुद्ध नागरिकांसमोर मांडण्यात आला.
#bjp #bjpmumbai #ViksitBharat #12YearsOfModiGovt #modisarkar
भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष तथा अणुशक्ती नगर विधानसभा, प्रभाग क्र. १४४ चे लोकप्रिय नगरसेवक मा. दिनेश (बबलू) पांचाळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो. समाजसेवेचा आणि जनतेच्या हितासाठीचा आपला प्रवास अधिकाधिक यशस्वी होवो, हीच सदिच्छा.
विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी भाजप दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सम्मेलन’ उत्साहात संपन्न झाले. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत झालेल्या ऐतिहासिक विकासकार्यांचा लेखाजोखा यावेळी प्रबुद्ध नागरिकांसमोर मांडण्यात आला.
विश्वासातून विकास आणि विकासातून जनकल्याण या ध्येयाने प्रेरित होऊन, विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे संकल्प केला.
याप्रसंगी आमदार श्री. प्रसाद लाड, ज्येष्ठ नेते आमदार श्री. कालिदासजी कोळंबकर, मुंबई सरचिटणीस श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेविका आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. राजश्री शिरवाडकर, ज्येष्ठ नेते श्री. रवी राजा, जिल्हा सरचिटणीस श्री. गजेंद्र धुमाळे, श्री. संदीप सिंग धाम, सौ. अक्षता तेंडुलकर, श्री. लोरिक यादव यांच्यासह सर्व सहकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#bjp #BJP4Maharashtra #ViksitBharat #12YearsOfModiGovt #modisarkar
आमचे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचे वडील तथा मार्गदर्शक आदरणीय संग्रामसिंह गायकवाड (सरकार) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने गायकवाड परिवाराचे आणि आमचे एक आधारवड हरपले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. या कठीण प्रसंगी विजयसिंहजी व संपूर्ण गायकवाड परिवाराला दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती.
#RIP
पत्रकारितेतील निर्भीड आवाज म्हणजे आचार्य प्र.के. अत्रे. लेखणीच्या बळावर त्यांनी समाजमनात एक अढळ स्थान निर्माण केले होते. समाजकारण असो किंवा मनोरंजन, त्यांचा वावर हा नेहमीच प्रभावी राहिला. त्यांनी लिहिलेली नाटके आणि गाजलेले अग्रलेख आजही आपल्याला समाजाचे प्रतिबिंब दाखवतात.
अशा या प्रखर वक्ते आणि संवेदनशील साहित्यिकास स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#pralhad_keshav_atre