आज वार्ड क्रमांक १८० मधील नाले सफाई तसेच गणेश नगर येथील गल्ली बांधकामाच्या कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि वार्ड ऑफिसर यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली.
बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेऊन नाले सफाईची कामे पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर तातडीने पूर्ण करणे तसेच गणेश नगर येथील गल्ली बांधकामाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने लवकरात लवकर हाती घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच गणेश नगर येथील यश क्रीडा मंडळाच्या मागील बाजूस गटार तुंबणे व विविध समस्यांना स्थानिक रहिवाशी यांना त्रास होत होता,त्यासंधर्भात नाले सफाई व गटार दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ केला.
वार्डातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त परिसर उपलब्ध करून देण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी कटिबद्ध आहे.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@mybmc
मुंबईच्या मध्य-दक्षिण भागाला वीजपुरवठा करणाऱ्या गिरगाव संग्राही केंद्राच्या 33,000 व्होल्ट क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये मरीन लाईन्स परिसरात बिघाड झाल्याने गिरगाव परिसरातील मोठ्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
या आव्हानात्मक परिस्थितीत BEST च्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत रुळांखालील जुना तारखंड शोधून वीजपुरवठा पूर्ववत केला.
BEST समिती अध्यक्ष ह्या नात्याने मी या प्रकरणाचा आढावा घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका व वाहतूक पोलीस यांच्या परवानग्या घेऊन नेताजी सुभाष रोड, एफ रोड, महर्षी कर्वे रोड आणि श्यामलदास गांधी रोड परिसरात नवीन अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
गिरगाव व मलबार हिल परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
BEST कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून विजेतेपद मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्याचा मान मिळाला.
खेळाडूंची जिद्द, शिस्त, मेहनत आणि संघभावना हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
BEST परिवारातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी आणि आपल्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करावे, हीच सदिच्छा.
@Shivsenaofc
दादर येथील प्लाझा चित्रपटगृहाजवळ झालेल्या दुर्दैवी बेस्ट बस अपघातात जखमी झालेला २२ वर्षीय तरुण श्री. ऋषभ गुप्ता सध्या शीव रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहे. मी स्वतः रुग्णालयात जाऊन ऋषभच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्याच्या आई श्रीमती रामा गुप्ता, नातेवाईक श्री. अंकित गुप्ता व श्रीमती श्रद्धा शर्मा यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. ऋषभच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशासनाच्या वतीने केला जाईल आणि त्याच्या उपचारात कोणतीही कसर राहणार नाही,अशी सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच, संबंधित बेस्ट बस कंत्राटदाराला गुप्ता कुटुंबीयांना तात्काळ २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे हे देखील उपस्थित होते.
#BESTBus #EmergencyResponse #PeopleFirst #BMC
@mieknathshinde@DrSEShinde@TawdeRitu@misanjayghadi@mybmc@Shivsenaofc@TV9Marathi@abpmajhatv
BEST संयुक्त कामगार कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकांसह विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून देयके टप्प्याटप्प्याने देण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिले आहे.
तसेच कंत्राटी बससेवेत कामगार हक्क, किमान वेतन आणि प्रवासी सुरक्षिततेबाबत कठोर अंमलबजावणी व नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संवाद, समन्वय आणि कृती यांच्या माध्यमातून BEST अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये महायुतीचे उमेदवार श्री.रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवडून झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@iravindraphatak@Shivsenaofc
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘बेस्ट टर्नअराउंड प्रोजेक्ट’ अंतर्गत विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भातील बैठकीस उपस्थित राहून बेस्ट उपक्रमाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बेस्ट उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युइटी तसेच इतर अंतिम देयके तातडीने अदा करण्यात यावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळणे हा त्यांचा अधिकार असून, या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या निवारणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
बेस्ट उपक्रमाच्या सर्वांगीण विकासासोबतच कर्मचाऱ्यांचे हित आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण हे माझे प्राधान्य असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू राहतील.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@MPLodha@ShelarAshish@TawdeRitu@misanjayghadi@mybmc
नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना प्राधान्य देत, पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@mybmc
प्रभाग १८० मधील विद्यालंकार कॉलेज परिसरातील नाल्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला.
परिसरात पाणी साचू नये व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याबाबत वार्ड ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा केली.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@mybmc
शिवसेनेचे युवा, अभ्यासू आणि धडाडीचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के साहेब यांना दुसऱ्यांदा मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या कार्याला अशीच उत्तुंग भरारी लाभत राहो, ही सदिच्छा!
@mieknathshinde@DrSEShinde@nareshmhaske@Shivsenaofc
भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर व्हावा यासाठी ए-८१४ बससेवा आजपासून भाविकांच्या सेवेत रुजू! श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. सदा सरवणकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माझ्या पाठपुराव्यातून, तसेच सहकार्याने या विशेष बससेवेचे लोकार्पण आज संपन्न झाले. या प्रसंगी न्यासाचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, विश्वस्त मीनाताई कांबळी, राहुल लोंढे, जितेंद्र राऊत, सुदर्शन सांगळे, शिवसेना महिला विभागप्रमुख प्रिया सरवणकर गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दादर स्थानक ते रवींद्र नाट्य मंदिर मार्गे थेट श्री सिद्धीविनायक मंदिर अशी धावणारी ही विशेष बसफेरी असून, बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
@mieknathshinde@DrSEShinde@misadasarvankar@Shivsenaofc
आज वार्ड क्रमांक १८० मधील माझ्या प्रभागात सुरू असलेल्या नाले सफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पाणी साचू नये आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc