मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
गट ब पूर्व 2024 निकाल कधी लागणार?
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आयोग कधी विचार करणार?
मुख्य परिक्षेला आयोग किती दिवस देणार?
एक निकाल तयार करण्यासाठी 2 महिने लागत आहे का?
बदल आवश्यक..
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. एवढी विनंती.
@AbhiPawarBJP@mpsc_office@CMOMaharashtra
सरकारने सारथीच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे....
महाज्योती,Barti,tarti यांचे फंड वेळेवर जमा होतात आणि सारथीला काही द्यायची वेळ आली की कागदी घोडे नाचवायला सुरवात होते?
लवकरात लवकर सरकारने सारथीचे फंड रिलीज केले पाहिजे...?
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
मा.@mpsc_office गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे.
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024:
– 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.
– आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात.
– आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा.
– ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी.
२. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024:
– PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी.
– आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.
हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल.
#MPSC_आंदोलन
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
#विद्यार्थ्यांचा_आवाज
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
@Dev_Fadnavis लोकशाही मार्गाने विद्यार्थी पुणे , छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागात आज आंदोलन करत आहेत. @mpsc_office हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 45 दिवसांचा वेळ देऊन, राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी. तसेच गट ब च्या पदसंख्येत वाढ करावी.
युवांच्या हक्कांसाठी #साहेब सदैव मैदानात !
#combine जागावाढ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी काल आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. या दोन्ही विषयात साहेब व्यक्तिशः लक्ष घालत असून आयोगाशी साहेबांनी बोलणे केले आहे. मुख्य परीक्षेसंदर्भात आजच निर्णय होईल, ही अपेक्षा आहे तर combine परीक्षेसंदर्भात साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून जागावाढीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल.
#mpsc
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
मागच्या वर्षी 134 दिवस, यावर्षी फक्त 28? हीच का MPSC ची तयारीची संधी?
पूर्व परीक्षेच्या निकालानंतर UPSC ने नेहमीच मुख्य च्या तयारीसाठी 80+ दिवस दिलेले आहेत.
@mpsc_office@AbhiPawarBJP#PostponeMPSCMains
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
महाराष्ट्र.
विषय: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 पुढे ढकलण्याबाबत विद्यार्थ्यांच्यावतीने विनम्र निवेदन.
महोदय,
मी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना व परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांच्या वतीने खालील निवेदन आपणांस सादर करीत आहे:
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भात आयोगाच्या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, संबंधित मुद्यांकडे आपले लक्ष वेधणे गरजेचे आहे.
१. १२ मार्च २०२५ रोजी मुख्य परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला.
२. मात्र, २९ मार्च २०२५ रोजी आयोगाने सुधारित निकाल प्रसिद्ध केला.
३. या कालावधीत EWS व SEBC (मराठा) संवर्गातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी, दस्तऐवज पडताळणी व बदलत्या निकषांमुळे अभ्यासासाठी फारसा वेळ मिळू शकला नाही.
४. विशेषतः, EWS उमेदवार २९ मार्चच्या निकालानंतर प्रथमच पात्र ठरले असून त्यांना तयारीसाठी खूपच अल्प वेळ मिळाला आहे.
५. SEBC विद्यार्थ्यांचे NCL संदर्भातील तांत्रिक त्रुटींमुळे मौल्यवान वेळ वाया गेला.
ही परीक्षा MPSC द्वारे वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असल्यामुळे, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य तिच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ही परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची न्याय्य व समजूतदार मागणी आहे.
जर ही मागणी वेळेत मान्य केली गेली नाही, तर ही प्रक्रिया न्यायालयीन वादात अडकण्याची शक्यता आहे, आणि त्याचा परिणाम संपूर्ण परीक्षापद्धतीवर होऊ शकतो.
ही मागणी नैसर्गिक न्यायसंगत असून कोणाच्याही नुकसानाविना सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी आहे.
आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AUThackeray@iambadasdanve@INCHarshsapkal@VijayWadettiwar@mpsc_office@Mpsc_Andolan @degree_holders @punyachiMPSC@AAPMaharashtra
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde #Mpsc #Re_exam
#combine2024जागावाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्याचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks@mpsc_office
अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का?
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?
एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. आरक्षणातील गोंधळ, SEBC/EWS संदर्भातील अस्पष्टता, व तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी संभ्रमित आहेत.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. सचिव @Suvarnakharat4, @mpsc_office यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना केल्या नाहीत तर परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकू शकते.
मागील 8-10 दिवसांपासून MPSC च्या वेबसाईटवरील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. 26 एप्रिल रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा नियोजित असून विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असून अभ्यासाचा वेळ मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यातच खर्ची होत आहे. आयोगाने तत्काळ या बाबींमध्ये लक्ष घालून सर्व अडचणीतून विद्यार्थ्यांची सुटका करावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे.
@mpsc_office
#MPSC | #विद्यार्थीहित |