आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
बाबा ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा 🎂
विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! या निवडणुकीत महायुतीची एकजूट दिसून आली असून, महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्वांचे अभिनंदन...
भाजपाच्या उमेदवार आणि लढाऊ नेत्या पंकजाताई मुंडे, पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माझे मित्र श्री. योगेश टिळेकर, श्री. परिणय फुके, श्री. अमित गोरखे आणि श्री. सदाभाऊ खोत या सर्वांचे अभिनंदन...
@cbawankule@Dev_Fadnavis@ChDadaPatil@Pankajamunde@iYogeshTilekar@Parinayfuke@AmitGorkhe@Sadabhau_khot@BJPForPuneCity
धीरज रामचंद्र घाटे
अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर
#dheerajghateupdate #pune
राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या संदर्भात नुकतेच काही प्रमुख प्रसार माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी कोथरुड परिसरातून राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हव्या असलेल्या इम्रान खान आणि युनुस साकी या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.
पुण्यामध्ये वाढत असलेली बांगलादेशींची घुसखोरी आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे. या विषयात लक्ष घालून पुणे पोलिसांनी तातडीने घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पुणे पोलिसांकडे केली. या विषयी पोलिस आयुक्त मा. रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त मा. संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
बांगलादेशी घुसखोरांचा विषय गंभीर असून यामध्ये पोलिसांनी तातडीने लक्ष घालून विविध ठिकाणी तपास करून घुसखोरी केलेल्यांना ताब्यात घेतले पाहिजे. बांगलादेशी व्यक्ती शोधून त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे साथीदार शोधणे आणि घुसखोरी केलेल्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे पोलिसांकडे व्यक्त करण्यात आली.
गणेशोत्सवासह विविध सण अवघ्या काही दिवसांवर आलेले आहेत. त्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलिसांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे म्हणणे मी यावेळी पोलिसांपुढे मांडले.
यावेळी माझ्यासोबत प्रदेश सरचिटणीस मा. मुरलीधरजी मोहोळ, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. योगेशजी टिळेकर, माजी नगरसेवक सर्वश्री श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे, दीपक पोटे, राजेंद्र शिळीमकर, अजय खेडेकर, धनराज घोगरे, मनिष साळुंके, पक्षाचे प्रवक्ते श्री. संदीप खेडेकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, श्री. सुभाष जंगले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
@cbawankule@PuneCityPolice@BJP4Maharashtra@BJP4PuneCity
#dheerajghateupdate
#punepolice
सर्व पुणेकर नागरिकांनी याची कृपया नोंद घ्यावी.
खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या सतंतधार पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. आज (मंगळवारी) संध्याकाळी ५.०० वाजता खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
@PuneCityPolice@pmcpune@BJP4PuneCity
#rains #punerain #KhadakwaslaDam
#dheerajghateupdate