पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित सिंधुदुर्गच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, आज या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
वृक्षलागवड हा केवळ एक औपचारिक उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि जगवणूक यावर विशेष भर देणे आवश्यक आहे, असे यावेळी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#वृक्षारोपण #सिंधुदुर्ग
कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. याच कार्यक्रमात ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ अंतर्गत नगरपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या ‘नमो गार्डन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात आले.
नमो गार्डनमुळे नागरिकांना विरंगुळ्याचे, आरोग्यदायी वातावरणाचे आणि सामाजिक उपक्रमांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून रस्ते, सार्वजनिक सुविधा, उद्याने, पर्यटनवृद्धीस चालना देणारे प्रकल्प आणि सौंदर्यीकरणाची कामे राबवून परिसराचा विकास अधिक गतिमान केला जाणार असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक संतोष नानचे, नितीन माणेरीकर, सभापती पार्वती गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती संजना म्हावळणकर यांच्यासह कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुरत्न समृद्ध योजने' अंतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील राज्यमार्ग क्रमांक १८९ लगत असलेल्या तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण आज करण्यात आले. भविष्यात दोडामार्गसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. मोपा विमानतळ वरून पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातात. ते पर्यटक दोडामार्ग शहरात थांबले पाहिजे. त्यामुळे उलाढाल वाढून रोजगार निर्मिती होईल. यासाठी वेगवेगळ्या योजना रबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नितीन माणेरीकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे, सभापती पार्वती गवस, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मणेरी येथील वेदांत हॉल येथे आयोजित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर टॅलेंट आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत योगदान द्यावे. जिल्ह्यातच सर्व युवकांना नोकऱ्या देण्याचा माझ्या प्रयत्न आहे. जिल्ह्यातच राहून दर्जेदार नोकरी करण्यासाठी तयार राहा. सुरू होणारे प्रकल्प समजून घ्या. त्यासाठी आमच्याबरोबर संवाद ठेवा, असे आवाहन केले.
व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, दोडामार्ग सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर, संजय सातार्डेकर, सोनिया कुबल, जिल्हा पत्रकार संघांचे कार्यकारी सदस्य सुहास देसाई, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तसेच तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, प्रशालेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 मुंबई |
#ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन मॉन्सूनसाठी सज्ज राहण्याचे आवाहन सर्व यंत्रणांना केले.
ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मॉन्सूनपूर्वी वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश दिले. तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांनी एकत्रितपणे समन्वय साधून या कामांना गती द्यावी असेही निर्देश यावेळी दिले. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवून, काम चालू असलेल्या रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणावेत, तसेच जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावे असेही आदेश याप्रसंगी दिले.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि मुंब्रा येथे गतवर्षी दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाटात सुरू असलेल्या सुरक्षा कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या दोन्ही ठिकाणी ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही निर्देश यावेळी दिले. यंदाचा मॉन्सून काळात शुन्य जीवितहानी व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयाने पण दक्ष राहून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यासोबतच भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मुंब्रा या हद्दीतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेद्वारे पुनर्विकास करण्यासाठी ठाणे मनपाच्या धर्तीवर क्लस्टर सेल स्थापन करून या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश सबंधित मनपाच्या आयुक्तांना दिले.
यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, आमदार प्रतिभा गायकवाड, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी संदीप माने, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवीन सोना, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
#Thane #EknathShinde #Maharashtra
@iravindraphatak
📍 #मुंबई |
मुंबई आणि महानगर परिसरातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक विशेष बैठक मुंबईत पार पडली. यावेळी आगामी पावसाळ्यात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे असे निर्देश दिले.
यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नालेसफाई सोबतच होल्डींग पाँड, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण जाळी बसवणे, होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत असे निर्देश याप्रसंगी दिले. तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी टीम म्हणून काम करून पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करावे असे आदेश यावेळी दिले.
मुंबईतील २००० किमी पैकी १७०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून रस्ते आणि खड्डे दुरूस्तीचा ८० टक्के खर्च कमी झाल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
यंदा जून ते सप्टेंबर याकाळात हाय टाईडचे (साडेचार मीटर) २४ दिवस आहेत. ९३४ ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आले असून ६५ मिनी पंपींग स्टेशन आहेत. पंपींग स्टेशनच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून त्याचे संनियंत्रण केले जाणार आहे. मुंबईत १००० आपदा मित्र, एनडीआरएफची ३ पथके, नौदलाची ९ पथके तैनात आहेत असेही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी मुंबईच्या महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, रेल्वे, पोलिस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौसेना, एनडीआरएफ तसेच बेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास म्हणजे निसर्गसौंदर्य आणि अस्सल मराठमोळ्या चवीचा शोध. आज याच प्रवासादरम्यान रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळ असलेल्या 'एम कॅफे' या ठिकाणी भेट देण्याचा योग आला आणि मन अक्षरशः प्रसन्न झाले.
कोलाडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपाहारगृहात गेल्या दोन वर्षांपासून अस्सल मराठी खाद्यसंस्कृती जपण्याचे काम सुरू आहे. पुरणपोळी, थालीपीठ, आंबोळी, मोदक आणि इतर अनेक पारंपरिक पदार्थ येथे अत्यंत प्रेमाने आणि ताजे बनवून दिले जातात. आज या ठिकाणी पुरणपोळी, थालीपीठ आणि आंबोळीचा आस्वाद घेतला. प्रत्येक पदार्थाची चव, गुणवत्ता आणि सादरीकरण अतिशय उत्कृष्ट वाटले. हॉटेल सांभाळत असलेले तरुण शेफ रोहित सावंत यांची मेहनत आणि जिद्द विशेष कौतुकास्पद आहे. हेड शेफ म्हणून ते स्वतः ग्राहकांच्या आवडीनिवडी जपत प्रत्येक पदार्थात घरगुतीपणा आणि अस्सल मराठी चव जपण्याचे काम करत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार ताजे पदार्थ तयार करून देण्याची त्यांची तळमळ प्रत्येक घासा गणिक जाणवते.
आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मातीतल्या चवी, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी काम करणारे रोहित सावंत यांच्यासारखे तरुण इतरांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहेत. रोहित सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत या ठिकाणची ओळख पोहोचो, व्यवसायाला भरभराट लाभो आणि अस्सल मराठी खाद्यसंस्कृतीचा हा सुगंध दूरवर दरवळत राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
आज मुंबई येथे नागपूर येथील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी, युवासेना शहर युवा अधिकारी आशिष हाडगे, कामगार सेनेचे शहर संघटक भुपेंद्र कठाने, युवासेना जिल्हा चिटणीस अब्बास अली, कंत्राटी रेल्वे युनियनचे अध्यक्ष कार्तिक करोसिया, वाहतूक सेनेचे शहर संघटक ललित बावनकर, कामगार युनियन अध्यक्ष कमलेश त्रिपाठी, उत्तर नागपूर विधानसभा संघटक आकाश शिर्के, नागपूर शहर कार्यालय सचिव मुन्ना तिवारी, पूर्व नागपूर विभाग प्रमुख तोरेन हिरौंदे, युवासेना विभाग संघटक शोहेब कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढील यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #Shivsenapakshapravesh
रस्त्यातील काट्यांकडे दुर्लक्ष करून "आयुष्यात मोठी स्वप्ने बघा" !
उपमुख्यमंत्री एकनाथ @mieknathshinde शिंदे ह्यांचा चिमुकल्यांना संदेश ! 👌
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवा भाऊ आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दोघांचेही मार्गदर्शन लाभलेले चिमुकले आयुष्यात मोठी ध्येय नक्कीच बाळगतील ! 💪