मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराला यश
काल मी सरकारच्या राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांना हिंदीची परीक्षा देण्याच्या सक्तीविरोधात पोस्ट टाकली.माध्यमातल्या मित्रांनी त्याची सकाळपासून दखल घेतली.
ही परीक्षा कायमस्वरूपी रद्द करावी अन्यथा परिपत्रकाची होळी करण्याची मराठी अभ्यास केंद्राची भूमिका आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याबद्दल आक्रमक भूमिका घेतली.संदीप देशपांडे यांचेही आभार.
मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी या परीक्षेला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.गरज पडल्यास ती परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची भूमिका त्यांनी मांडली. परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याचीच गरज आहे.
ते जेव्हा घडेल तेव्हा मंत्रिमहोदयांचं शंभर टक्के अभिनंदन करता येईल.
हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाचा बीमोड करण्यासाठी कायम सावध राहण्याची गरज आहे.
यापुढची लढाई हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती नावाचं थोतांड महाराष्ट्रातून कायमचं हद्दपार करण्याची असणार आहे.
प्रत्यक्ष कृतीत सहभागी व्हा.
जय मराठी ! जय महाराष्ट्र !
मराठी भाषा म्हणजे आपलं अस्तित्व आहे, साहित्य, कला, ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान या सर्वांची निर्मिती करून भाषेला अधिक बळकट करणाऱ्या सर्वांना माझे विनम्र अभिवादन. लिपी आणि सुलेखनाच्या च्या माध्यमातून मी भाषेसाठी माझा खारीचा वाटा उचलणार आहे. #marathibhashadin#मराठीभाषागौरवदिन
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।
मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयीन जागेसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहोत.रमेश पानसे सरांची चरई ठाणे येथील जागा काही वर्षे वापरत होतो.सध्या ती उपलब्ध नाही.
ठाणे महानगरपालिकेची गावदेवी मंदिराजवळच्या जागेसाठी चारेक वर्षे प्रयत्न केले.पण अद्याप ती हाती आली नाही.
सरकारविरोधातला आमचा संघर्ष लक्षात घेता शासकीय जागा मिळणं शक्य नाही हे ओघानेच आलं.
कामाचा वेग आणि आवाका खूप वाढला आहे.
सध्या माझं घर हेच आमचं कार्यालय आहे.
माझ्या घराला गोडाऊनचं रूप आलं आहे.
मराठी अभ्यास केंद्राला घाटकोपर ते दादर परिसरात शक्यतो स्टेशनच्या जवळ कार्यालयासाठी जागा हवी आहे.
दोन ते तीन कार्यालयीन कर्मचारी पूर्ण वेळ बसून लॅपटॉपवर काम करू शकतील अशी ,प्रासंगिक बैठका( १० ते १५ जण बसू शकतील अशा) घेण्यासाठी उपयुक्त जागा हवी.
टॉयलेटची स्वतंत्र सोय हवी.
साधारणपणे १५ ते २० हजार भाडे देता येऊ शकेल.
शक्यतो डिपॉझिट नसल्यास उत्तम.
संपर्क
आनंद भंडारे- ९१६७१८१६६८
एका विशेष मोहिमे अंतर्गत मुंबईत हरवलेले वा चोरीला गेलेले अंदाजे ₹ २ कोटी किंमतीचे १६५० मोबाईल उत्तरप्रदेश राज्यातील विविध भागातून हस्तगत करण्यात आले आहेत.
आजपर्यंत या मोहिमे अंतर्गत एकूण ३३५१४ मोबाईल फोन मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
#MumbaiPolice4All
Lost in Mumbai.
Found in Uttar Pradesh.
1,650 Phones Brought Back Home.
Under a special operation, 1,650 mobile phones worth approximately ₹2 crore, which were lost or stolen in Mumbai, have been recovered from various parts of Uttar Pradesh.
A total of 33,514 mobile phones have been returned to their rightful owners under the special operation.
#MumbaiPolice4All
पाठिंब्याचे दोन शब्द लिहाल का?
मित्रहो,
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. परंतु मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस व महाराष्ट्रधर्म यांचे हित पाहता मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा , समाज आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था , संघटना, गट आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' प्रसिद्ध केला असून तो सर्वांसाठी खुला केला आहे. राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणूक होत असून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा'त समावेश केलेल्या बाबींसाठी आपण सर्वांनी आग्रही रहायला हवे.
या 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' तील गोष्टींबद्दल आपण सहमत असाल तर कमेंटमध्ये फक्त 'पाठिंबा आहे' एवढे दोन शब्द लिहाल का? आणि जमल्यास आपापल्या फेसबुक भिंतीवर ही पोष्ट शेअर कराल का?
" सध्या लोकशाहीत जनतेच्या मताला किंमत नाही, त्यामुळे त्रिभाषा या विषयावर तुम्ही जनतेची मतं विचारात घेत आहात. तिसरी भाषा ही ५वीपासूनच शिकवली जाणे अधिक योग्य आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशात त्रिभाषा सूत्रात फक्त हिंदीलाच प्राधान्य का दिले जात आहे? विद्यार्थ्यांना इतर भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध व्हावेत. तसेच ५वीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या भाषेसाठी ग्रेडिंग प्रणाली ठेवली जावी, ज्यामुळे त्या भाषेच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या मुख्य मार्कशीटवरील गुणांवर कोणताही परिणाम होणार नाही.'
त्रिभाषा समितीच्या जनसुनावणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. संदीप देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.
#MNSAdhikrut
मराठी भाषा टिकवायची असेल तर ती -
फक्त सरकारी व्यवहाराची,
अनुदानासाठीच्या संमेलनांची,
भावनिक मुद्यांची किंवा
प्रमाण वा बोलीभाषांच्या वादाची भाषा न राहता, “पैशांची भाषा” व्हायला हवी.
ती सधन व्हायला हवी. भावनांसोबत आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला हवी.
मराठी आर्थिक व्यवहाराची भाषा झाली तर नक्कीच ती अधिक ताठपणे, अभिमानाने जगभरात बोलली व आपसुक रुजवली जाऊ शकते.
त्यासाठी ती ज्ञान, साहित्य, वाड्ग्मय, अभंग, अध्यात्म, इतिहास यासोबतच पैशांची होणेही तितकेच गरजेचे आहे.
भावनेच्या अतिरेकात वहात जाण्याऐवजी खरतर व्यवहार्य निर्णय व योग्य तो धडा घ्यायचा आणि द्यायचा.
टोकाचे पाऊल उचलायला अजिबात बुद्धीची गरज नसते पण काहीतरी कंस्ट्रक्टिव्ह करण्यासाठी शांत डोक्याने निर्णय घेणे कधीही उत्तम!
आणि सर्वात महत्वाचं - मराठी माणसाला कोणताही संकोच न बाळगता एकमेकांना थेट मराठीतून मदतही मागता यावी. भरभरून मदत करताही यावी.
- प्रफुल्ल वानखेडे
(१) संगीत देवबाभळी” या नाटकाबद्दल फार ऐकून होतो; आज नेमका कार्तिकी एकादशीच्या दिवशी बेंगळुरूत ते पाहण्याचा योग जुळून आला, हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल.
@PrasadMKambli@teambhadrakali
(९) प्रत्येक स्त्रीने हे नाटक नक्की पाहावे, पण मी तर म्हणेन—प्रत्येक पुरुषाने ते आवर्जून पाहायला हवे. यामुळे आपल्या सभोवतालच्या स्त्रिया, त्यांचा संघर्ष, त्याग याबद्दल एक नवा, अधिक सहानुभूतीचा, व्यापक दृष्टिकोन मिळेल आणि त्यांच्याबद्दल जास्त आत्मीयता व आदर वाटेल.