Congratulations to the @nsitharaman@RBIsays@DFS_India@FinMinIndia
In the Jitu Munda case, a banker has been successfully made the scapegoat and suspended, while all the idle local administration officials have been let off the hook.
The failure was collective, but only one person has been punished.
Shame on all Bank Unions
नुकताच पर्शियन गल्फ भागात अमेरिकन क्षेपणास्त्राने एक व्यापारी तेलवाहू नौकेवर हल्ला केला. या नौकेवर २४ भारतीय खलाशी होते त्यापैकी २१ जणांना वाचवण्यात आलं तर ३ जणांचा यामध्ये मृत्यू झाला. यावर भारताने अधिकृतपणे निषेध व्यक्त केला आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ती म्हणजे हा काही चुकून झालेला अपघात नाही. प्रिसिजन म्युनिशन म्हणजे अचूक वेध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अस्त्रांचा वापर करून या तेलवाहू जहाजावर अमेरिकन लष्कराकडून हल्ला केला गेला.
आता या जहाजावर काही सशस्त्र इराणी किंवा कोणी खतरनाक दहशतवादी वगैरे नव्हते. MT Settebello नांवांचं हे संबंधित व्यापारी जहाज या युद्धाशी दुरान्वये संबंध नसलेल्या एका देशाचा ध्वज लावून मार्गक्रमण करत होतं. त्यावर वर उल्लेख केल्याप्रमाणे २४ भारतीय कर्मचारी काम करत होते. तरीही ८ जून रोजी अमेरिकेने ठरवून, या निःशस्त्र जहाजावर, आपली पर्शियन गल्फवरील सत्ता सिद्ध करण्यासाठी हा हल्ला केला. तशी अधिकृत माहिती अमेरिकन लष्कराच्या सेंटकॉमने दिली आहे.
आपण दररोज ज्या वस्तू वापरतो, त्या आपल्यापर्यंत पोचवणारी एक पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन असते. आपल्याला रोजच्या जीवनात लागणाऱ्या बहुतांश वस्तू या व्यापारी जहाजे नसतील तर आपल्यापर्यंत पोचणार नाहीत. कारण विमानं कितीही प्रगत झाली तरी ती जड मालाची किफायतशीर वाहतूक अजून तरी करत नाहीत. त्यासाठी व्यापारी जहाजेच लागतात. आपल्याला ज्या वस्तू दुकानात सहज मिळतात त्यासाठी कोणीतरी आपल्या कुटुंबापासून महिनोन्महिने दूर राहून व्यापारी जहाजात काम करत असतो. असे हजारो भारतीय तरुण मर्चंट नेव्ही / कमर्शियल शिपिंग क्षेत्रामध्ये कामाला आहेत.
तर अशाच प्रकारे व्यापारी वाहतूक करणाऱ्या या MT Settebello नांवाच्या व्यापारी जहाजावर हे २४ भारतातील कामगार रोजीरोटीसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून संबंधित जहाजमालकाची नोकरी करत होते. त्यांनी ना कोणाशी युद्ध केलं होतं ना जहाज त्यांच्या मालकीचं होतं... तरीही ट्रम्पने जगावर लादलेल्या इराण युद्धाचा ज्वर यापैकी तीन निरपराध कामगारांचे प्राण घेऊन गेला! अमेरिकेने ओमानजवळच्या या समुद्री मार्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एका निःशस्त्र व्यापारी जहाजावर नेम धरून या लोकांचे भर समुद्रात जीव घेतले अशी ही एकंदर बातमी आहे...
यावर मोदी सरकारने जो निषेध व्यक्त केला आहे तो अगदीच तकलादू स्वरूपाचा आहे असं तो वाचल्यावर वाटलं! ट्रम्पचं किंवा अमेरिकेचं थेट नांव न घेता असा नुसताच निषेध करून कसं चालेल? आपल्या निरपराध नागरिकांचे ट्रम्पने असे जीव घेतल्यावरही अशाच मिळमिळीत प्रेस नोट काढायच्या असतील तर तुमची छप्पन इंची छाती फक्त धुरंधर चित्रपटात आपल्या पक्षाची टिमकी वाजवण्यापुरतीच शिल्लक आहे काय? तुमची अशी नक्की काय मजबुरी आहे म्हणून त्या नरपिशाच ट्रम्पसमोर तुम्ही असे लाचार असल्यागत वागता?
त्यात कालच ट्रम्पने नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याबद्दल ट्विटवर मोदींचं अभिनंदन केलं होतं, त्यावर तिथेच पंतप्रधान अगदी लगेच थँक्यू वगैरे म्हणायला सज्ज होते. मात्र ट्रम्पच्या युद्घखोरीने जे भारतीय तरुणांचे हकनाक बळी घेतले आहेत त्याचा जाब ट्रम्पला विचारायला मात्र आपल्या पंतप्रधानांकडे वेळ उपलब्ध नसावा! कदाचित त्यांच्यासाठी नेहरूंचा रेकॉर्ड मोडण्याला त्या निरपराध खलाशांच्या जिवापेक्षा जास्त किंमत असावी!!
- मकरंद देसाई
@makmd
ता.क. यानंतर काहीच तासांपूर्वी MT Jalveer नांवाच्या जहाजावर ओमान परिसरात हल्ला झाल्याची बातमी दिसत आहे. हा हल्ला कोणी केला हे अजून स्पष्ट व्हायचं असलं तरी त्या व्यापारी जहाजावर भारतीय खलाशी असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे. जहाजावर हल्ला झालेला असल्याची खातरजमा झालेली आहे. तरी संबंधित सर्व खलाशी सुखरूप असावेत अशी आशा आहे...
5 Days banking a week is not just about work life balance; it is about improving productivity, employee wellbeing, and service quality.
#5DayBanking@PMOIndia@nsitharaman@RBI
SEBI ने म्हणे राजेश एक्स्पोर्ट्सविरुद्धच्या अंतरिम आदेशात ₹15.15 लाख कोटींच्या महसूल चुकीच्या नोंदी किंवा गैरमांडणीवर आक्षेप घेतला आहे... 😳💸📊
विचार करा आज मोदी आहेत म्हणून निदान हे कळतंय तरी आपल्याला, की कोण कुठे घपले करायलेत... 😅🔍
मोदी नसते तर अवघड होतं या देशाचं ❤️
दरवेळी एखाद्या खड्ड्याचा व्हिडिओ करताना माझ्या मनात एकच विचार असतो — हा खड्डा भरला नाही तर उद्या कोणाचा तरी जीव जाऊ शकतो.
अनेकदा रस्त्यावर उभे राहून चित्रीकरण करताना स्वतःचाही जीव धोक्यात घालावा लागतो. पण एखादा अपघात टळला, एखादे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले, तर हे सर्व कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटतात.
म्हणूनच आता जनजागृती करतानाही सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॅफिक कोन्स, बॅरिकेड्स आणि सुरक्षा साहित्य यासाठीच घेतले आहे, जेणेकरून आपण समस्या दाखवताना कोणालाही त्रास किंवा धोका होणार नाही.
माझा उद्देश कोणावर टीका करणे नाही, तर एखाद्या आईचा मुलगा, एखाद्या पत्नीचा नवरा, एखाद्या मुलांचे वडील सुरक्षित घरी पोहोचावेत हा आहे.
जर एका पोस्टमुळे, एका व्हिडिओमुळे किंवा एका आवाजामुळे जरी एखादा जीव वाचत असेल, तर वेळ मिळेल तसा हा प्रवास सुरूच राहणार…
कारण आकडेवारीत तो फक्त एक अपघात असतो, पण कोणासाठी तरी ते संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची सुरुवात असते.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#india #maharashtra #road #safety #preventionisbetterthancure #chaitanyaushalaxmanpatil
हा अपघात टाळता आला असता; कारण हा खड्डा आणि हा धोका मी आधीच दाखवला होता.
आज दिनांक 31 मे 2026. आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निगडे -पेण येथील त्या धोकादायक ठिकाणी उभे आहोत, जिथल्या खड्ड्याबाबत आम्ही वारंवार संबंधित प्रशासनाला कळवलं, सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आणि NHAI ला देखील माहिती दिली. त्यावर उत्तर आलं की, “आपण हा मुद्दा निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.”
पण माझा प्रश्न आहे – जेव्हा हा खड्डा याआधी अनेक वेळा दाखवला गेला, तेव्हा तो तातडीने का भरला गेला नाही?
आज याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. सुदैवाने वाहनातील प्रवाशांना जीवदान मिळालं. गाडीचं मोठं नुकसान झालं आहे आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील कार्यक्रमासाठी ते प्रवास करत होते, पण एका खड्ड्यामुळे त्यांचा संपूर्ण प्रवास आणि नियोजन विस्कळीत झालं.
अपघातानंतर पोलीस यंत्रणा आली, सरकारी यंत्रणा कामाला लागली, वेळ गेला, संसाधने वापरली गेली. हे सर्व टाळता आलं नसतं का?
आज येथे चारचाकी वाहन होतं म्हणून प्रवासी वाचले. पण याच ठिकाणी एखादा दुचाकीस्वार असता, त्याने हेल्मेट घातलेलं नसतं, तर परिणाम किती गंभीर झाला असता याची कल्पनाही करवत नाही.
प्रश्न फक्त एका खड्ड्याचा नाही. प्रश्न आहे निष्काळजीपणाचा. प्रश्न आहे वेळेवर कारवाई न होण्याचा. आणि प्रश्न आहे मानवी जीवांच्या सुरक्षेचा.
अपघात झाल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा, अपघात होण्याआधी उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे नाही का?
संबंधित प्रशासन, ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांनी याचा गांभीर्याने विचार करावा. कारण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही.
एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडत आहे. पण नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #nh66 #accident #savelife #preventionisbetterthancure #chaitanyaushalaxmanpatil #today #maharashtra #india
India is in real trouble. Don't think the Modi government understands how much it has made India vulnerable by joining in combat support with an unreliable US against China!
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
गाजावाजा करत केलेलं टेस्ला चं स्वागत आठवतंय ?
टेस्ला गुजरातमध्ये गाडी उत्पादन करण्यासाठी प्लांट सुरु करणार वगैरे बातम्या मोठ्या प्रमाणात फिरवल्या होत्या.
त्या टेस्ला ने आता आपला बोजाबिस्तरा भारतातून गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि यासाठी त्यांनी कारण काय दिले आहे ?
रशियाने सांगितल्यानंतर मग भारतीयांना समजलं.. शंभरेक भारतीय मेले.. ही परिस्थिती आहे इथल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची.. अजिबात विश्वास ठेवू नका यांच्यावर.. देशाचं वाटोळं करण्यात ही माध्यमे आघाडीवर आहेत.. त्यानंतर राजकारणी.. असो..❤️
#भारत
कॉलेजला constitution शिकवायला एक शलाका बाई होत्या. त्या म्हणायच्या हे बघ लेबो, तीशिकडे जाताना आपल्यातला सामाजिक, राजकीय किडा बॅकस्टेजला जातो. त्याची जागा हतबलता आणि इग्नोरन्स घेते. मग आपली लायकी कुटुंबात, मित्रांत रेज करण्यापूर्ती राहते. आपण स्वतः सुद्धा या व्यवस्थेचीच कीड आहोत.