BMC SE पदाची ॲानलाईन भरती परिक्षा TCS ION सेंटरवर घेणेबाबतआणि परिक्षेसाठी दिलेले खाजगी परीक्षा केन्द्र रद्द करणेबाबत मुंबई महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ/दुय्यम अभियंतासाठी ९ फेब्रुवारीला होणारी परीक्षा वादग्रस्त केंद्रांवर होत आहे. एक केंद्र तर असे आहे की पेपर फुटी कारणामुळे आधी रद्द केले होते.
अश्या ठिकाणी परीक्षा घेऊन प्रामाणिक मुलांवर अन्याय होईल. याबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करायला हवा. (१/२)
मा. आशिष शेलार,
पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय : मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेणेबाबत.
संदर्भ : वरील विषयावर आज झालेली चर्चा.
महोदय,
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी ६९० अभियंता पदांच्या भरतीबाबत, राज्यातील लाखो अभियंता परीक्षार्थींच्या जिव्हाळ्याचा विषय समजून घेऊन, तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल खूप खूप आभार.
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाबा आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा.
धन्यवाद,
@ShelarAshish@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या
खालील बातमीत नगर अभियंता म्हणत आहेत की आम्ही स्थापत्य आम्ही TCS Ion degital चा विचार करू हे पूर्णतः चुकीचे आहे, स्थापत्य साठी वेगळा न्याय व विद्युत आणि यांत्रिकी साठी वेगळा हे योग्य नाही, कृपया सर्वांसाठी समान न्याय आणि समान संधी असायला पाहिजे.
#BMC_At_TCS_Ion_Centre
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
मा. @mieknathshinde साहेब
@mybmc च्या 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या दुय्यम अभियंता परीक्षेसाठी आजपासून केवळ दोन दिवस उरले आहेत.
सर्व उमेदवार आपणास ION digital center allotment साठी विनंती करून थकले.आपण मौन बाळगून आहात.
🔸@mybmc आयुक्त मा.भूषण गगराणी सर आपल्यासारख्या उच्चशिक्षित,अनुभवी व नावाजलेल्या
अधिकाऱ्याकडून परीक्षार्थीना पारदर्शकतेची अपेक्षा आहे,मुळात तो
त्यांचा अधिकारच आहे.
तरीही आपण अद्याप यावर कार्यवाही का करत नाही हे अनाकलनीय तर आहेच सोबत धोक्याची घंटा आहे.
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन एकतर 600-700 km दूर center देऊन काय साध्य करत आहात?
👉 ज्या center वर यापूर्वी गैरप्रकार,गैरव्यवहार झाले आहेत तिथेच पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे कळसच गाठला.
हेच का विद्यार्थी हित ??
🔶 सगळं संशयास्पद च आहे...
सुविधा नसलेले, अडगळीतले centers allot करणे, अधिकृत ठिकाणी परीक्षा घेणे टाळणे,
संध्याकाळी 5-7 हा exam timing
मग exam transparency ची अपेक्षा सोडूनच द्यायची काय?
सरकारने व मा.आयुक्त महोदयांनी तसे जाहीर करावे.
👉 कोटींमध्ये परीक्षा शुल्क जमा झाले त्या परीक्षेचे हे असे हाल ?
परीक्षेला जातानाच पारदर्शकता गायब असेल तर काय त्या परीक्षेला अर्थ उरतो.
🔸 सर्व उमेदवारांतर्फे पुन्हा एकदा सांगतोय..
यावर पुनर्विचार करावा.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकही ठिकाणी गैरव्यवहार ,गैरप्रकार झाल्यास,उघडकीस आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी
@mybmc ची तर असेलच , सरकारला याचा जाब विचारला जाईलच
याची कृपया अत्यंत गंभीरतेने नोंद घ्यावी
@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra@maha_udd@NANA_PATOLE@ssaunik
"आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी केंद्रांवर आयोजित केल्या जात असून, यामुळे गैरप्रकार व घोटाळ्यांची शक्यता वाढली आहे"
- @Dhananjay_AAP ,उपाध्यक्ष, #आप_महाराष्ट्र@mybmc#Scam
Scam in the BMC Saralseva Bharti 2024 Exam
@unmeshgujarathi@sproutsnews
Mumbai: Concerns are mounting over the potential for a major scam in the upcoming Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Saralseva Bharti 2024 exams, scheduled to be held
https://t.co/WicIzzAWPK
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा.
@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP sir , BMC म्हणत आहे की मार्च महिन्यातले पेपर try करू tcs वर घ्यायला, ९ फेब चे आता तिथेच होतील.
याला काय अर्थ आहे? ९ तरिखेची एकच शिफ्ट मध्ये परीक्षा आहे. नंतर १ महिण्याने दुसरे पेपर. इतकी घाई का? ज्यांची ९ फेब आहे त्यांचा अभ्यास प्रामाणिक नाही का? त्यांची काय चूक?
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
महोदय,
मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
राज्यातील परीक्षा घोटाळ्यांची परंपरा खंडित करण्याची तुम्हाला ही एक संधी आहे.
@Dev_Fadnavis@AUThackeray@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ShelarAshish@MPLodha
#BMC_iONexamसेंटरचद्या #BMC_At_TCS_Ion_Centre
#TCS_ION_Digital #BMC
#Dhananjay_Shinde
#DhananjayShinde
#BMC_JE #BMC_SE
@mybmc ने अगोदरच मार्च २०२४ मधील प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीसाठी डिसेंबर महिना लावला आणि आत्ता का येवढी घाई सुरू आहे? कृपया पुन्हा एकदा परीक्षा केंद्र यासंदर्भात संवेदशीलतेने निर्णय घेण्यात यावा.
आदरणीय भूषण गगराणी IAS,
आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC),
कनिष्ठ अभियंता सर्व पदांची परीक्षा TCS च्या अधिकृत ION डिजीटल केंद्रावरच झाल्या पाहिजेत यासाठी BMC ने तातडीने प्रसिद्धीपत्रक जाहीर करावे.
@mybmc@CMOMaharashtra
जर खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली गेली तर, हमखास पेपरफुटी होऊ शकते, मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखो तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
सरकारने यात लक्ष घालून लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !
#BMC_iONexamसेंटरचद्या
@Dhananjay_AAP