राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदी व स्व. आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र आ. रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद व आमचे सहकारी आ. उत्तमराव जानकर साहेब यांची प्रतोद पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..!
#ncpsp
दहिवडी कॉलेज दहिवडी चे प्राचार्य डॉ.एस टी साळुंखे सर यांची एस.एम.जोशी कॉलेज हडपसर,पुणे या ठिकाणी बदली झाली त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 📷
#प्रभाकरदेशमुख#prabhakardeshmukh
आज लोधवडे येथे देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. आपण सर्वांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजवावा आणि लोकशाही आणखी बळकट करण्यात मोलाची भूमिका पार पाडावी.
#votenow#MaharahstraElection2024
दहिवडी येथे चैतन्य जप प्रकल्पचे 24 वे राज्यस्तरीय शिबीर पार पडत आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची पालखी या निमित्ताने दहिवडी शहरात निघाली. या वेळी भेट देऊन पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. सदरील जप प्रकल्पात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
दीपावली पाडवा निमित्त गोविंदबाग बारामती येथे देशाचे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष @PawarSpeaks साहेब यांची भेट घेतली व साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी खासदार सुप्रिया सुळे ताईंची सुद्धा भेट झाली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
#ncpsp
माझे अतिशय जवळचे सहकारी डॉ. महेश माने यांचा काल वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त काल त्यांच्या हॉस्पिटल मध्ये भेट देवून सहकाऱ्यांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा केला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !!
#वाढदिवस_शुभेच्छा#birthdaywishes#prabhakardeshmukh#प्रभाकरदेशमुख
आपल्या सर्वांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या अर्थात वसुबारस या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, शांती आणि भरभराटी येवो, या सदिच्छा!
#वसुबारस#diwali2024#शुभेच्छा#प्रभाकरदेशमुख