शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी रोहित दादांनी सुरू केलेल्याअन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात आज कुंती वहिनी,दादांची मूल आणि आई देखील उपस्थित होत्या.आता थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी दादांची तपासणी केली असता दादांची साखर कमी झाल्याने आणि BP देखील लो झाल्याने सरकारी डॉक्टरांनी दादांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे.परंतु दादांनी तो धुडकावून लावला.यावेळी दादांची फॅमिली काळजीपोटी स्टेजवर आली होती.दादांच्या मुलांना आणि परिवाराला अश्रू आवरता आले नाहीत.
हा मोठा भावनिक क्षण होता.
अजितदादांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बारामती येथील नगरसेवक किशोर मासाळ सध्या भलतेच अडचणीत आले आहेत.पण स्वतःची चूक मान्य करून जाहीर माफी मागण्याऐवजी,आज त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे "चोरी वरून शिरजोरी"आणि निव्वळ "हास्यास्पद" प्रकार आहे.
मासाळ यांनी आपल्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी थेट आ. रोहित दादा पवार यांच्यावर आरोप केला आणि त्यांना माझा राजीनामा हवाय असा दावा केला याला राजकारणात 'स्वतःचे हसे करून घेणे' म्हणतात.
फॅक्ट ही आहे की ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मासाळ आहेत,त्याच पक्षाच्या बारामती तालुका अध्यक्षांनी आणि बारामती शहर अध्यक्षांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या बारामतीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी किशोर मासाळांच्या विधानाचा तीव्र निषेध केला असून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
किशोर मासाळ यांना माझा थेट प्रश्न आहे जर तुमचा राजीनामा रोहित पवार मागत आहेत,तर मग अजितदादांच्या पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष हे रोहित पवारांचे ऐकून चालतात का ? की ते रोहित पवारांचे कार्यकर्ते आहेत ?
आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाचा अपमान करायचा,पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाठीशी उभे राहात नाहीत हे दिसल्यावर,सहानुभूती मिळवण्यासाठी आणि मूळ विषयावरून लक्ष भरकटवण्यासाठी थेट विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव घ्यायचे,हा बालिशपणा बारामतीकर ओळखतात.
थोडक्यात काय तर घरच्यांनीच घरातून हाकलून लावण्याची तयारी केली असताना,शेजाऱ्यामुळे मला घरात घेत नाहीत,असा कांगावा किशोर मासाळ करत आहेत.पक्षाच्या अध्यक्षांनीच राजीनामा मागितल्यानंतर आता रोहित पवारांवर आरोप करणे म्हणजे "रोगापेक्षा उपाय भयंकर" आणि अत्यंत हास्यास्पद आहे.चुका लपवण्यासाठी आरोपांचे फुगे हवेत सोडण्यापेक्षा, अजित दादांच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना आधी उत्तरे द्या!
@RRPSpeaks
महागाईचा दर ४.६ टक्क्यांवरून ५.१ टक्क्यांवर गेल्याचे तसंच GDP ग्रोथ रेट ६.९ वरून ६.६ पर्यंत खाली आल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला आहे. महागाई बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत असून लोकांचे उत्पन्न देखील त्याच वेगाने घसरत आहे.
केंद्र सरकारच्या हातातील कळसूत्री बाहुले असलेल्या रिझर्व्ह बँकेला काही प्रमाणात का होईना आकडेवारी द्यावीच लागत आहे. सर्व गोष्टींचं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असं अजितदादा कायम म्हणायचे. केंद्र सरकारने देखील कोणतंही सोंग न करता देशावर घोंगावणाऱ्या मंदीच्या संकटाकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा सर्वसामान्य उध्वस्त होतील.
@PMOIndia
#महागाईचा_भडका #मंदीचे_संकट
#GDP #EconomicSlowdown
देशात काहीतरी बिघडलंय. देश चालविणारे व त्यांची प्रवृत्ती यांचा हिशोब झाला पाहिजे.
वेदांत श्रीवास्तवा, सार्थक सिद्धांत, रायलेन अनिल,निसर्ग अधिकारी या विद्यार्थ्यांनी देशातील स्पर्धा व पात्रता परीक्षांचे ऑडिट करून परीक्षांबाबतीतील अव्यस्थापन उघड केले.आता @abhijeet_dipke आणि त्याची कॉक्रोच जनता पार्टी टीम सरकार करीत असलेल्या शैक्षणिक दुर्लक्षितपणावर पुढील प्रहार करणार.
' बदलो बदलो आज की शिक्षा, नही तो मांगनी होगी भिक्षा ' अशा घोषणा देत आम्ही मोठे झालो पण आज शिक्षणाची अधिकच दुरावस्था करून ठेवली आहे. शिक्षणमंत्री बदलून सुरुवात होईल पण दृष्टीकोन कसा बदलणार? कॉक्रोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन. अहिंसक व लोकशाही मार्ग सोडू नका. आंदोलनात घुसखोरी करणाऱ्यांपासून सावध रहा.
सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!
#MaharashtraPolitics
"अमृतकाळ"च्या जाहिराती सुरू आहेत, पण अर्थव्यवस्था काय सांगते?
- मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत GST संकलनात जवळपास ५० हजार कोटींची (~२०%) मोठी घट झाली आहे.
- RBI ने आज दिलेल्या माहितीनुसार महागाई दर ४.६% वरून ५.१% वर गेल्याचा अंदाज आहे.
- GDP Growth Rate ६.९% वरून ६.६% वर घसरण्याचा अंदाज आहे.
जेव्हा महागाई वाढते, विकासाचा वेग कमी होतो आणि सामान्य नागरिकाची क्रयशक्ती घटते, तेव्हा अर्थव्यवस्थेची खरी अवस्था सरकारी जाहिरातींमधून नाही तर बाजारातून दिसते.
देशातील तरुण रोजगारासाठी झगडत आहेत, उद्योग गुंतवणुकीत सावध आहेत आणि सामान्य कुटुंबांचा खर्च वाढत आहे.
म्हणून प्रश्न पडतो, देश विकासाच्या मार्गावर आहे की Stagflation च्या धोकादायक वळणावर?
15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा Accounting घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्यूचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LIC ने गुंतवणूक केलीच कशी ? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून SEBI सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झाले आहे. यात सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे LIC चा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे.
#RajeshMehtaScam #LICScam #SEBIFailure #जनतेचा_पैसा #ScamExposed
भारताची अर्थव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकार सतत अपयशी ठरत असल्यानेच RBI ला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सुमारे 1.02 लाख कोटींचं सोने विकण्याची वेळ आली असावी. चोर कधी चोरी कबूल करतच नाही, त्याचप्रमाणे नेहमीच्या सवयीनुसार सरकारच्या कळसूत्री बाहुली RBI ने हा व्यवहार नाकारला आहे. असो, जगातील सहाव्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाचा खोटा तोरा मिरवणाऱ्या केंद्र सरकारसाठी ही शरमेची बाब नाही का ?
#भारतीय_अर्थव्यवस्था #RBI #EconomicMismanagement
कांद्याला 25 ते 30 रु दर, कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 15 रु अनुदान, नाफेडची खरेदी मार्केट समितीत करावी, तसेच नाफेड खरेदीची मर्यादा 10 लाख टन करणे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ठेवल्या हे कालच्या शेतकरी एकजुटीचे यश आहे.
नाफेडची खरेदी मार्केट समितीतच करण्याची मागणी मान्य झाली असली तरी इतर मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे, याचा अर्थ कांद्याचे दर वाढवणे, अनुदान देणे, खरेदी मर्यादा वाढवणे याबाबत अर्धे मंत्रिमंडळ जाऊनही ठोस तोडगा निघालेला नाही. येत्या तीन चार दिवसांत केंद्र सरकारने यावर तोडगा काढला नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करून पुढील आंदोलन पुण्यात किंवा नाशिकमध्ये करण्यात येईल. केंद्र सरकार तोडगा काढेल, ही अपेक्षा !
@ChouhanShivraj@Dev_Fadnavis
#कांदा_उत्पादक_शेतकरी #शेतकऱ्यांना_न्या_द्या #OnionFarmers
#शेतकरी_एकजूट #कांदा_आंदोलन #FarmersProtest #MaharashtraFarmers
मोती आणि टरबूज्याची पार लायकीच काढलीय सपकाळांनी🤕
तरीच सगळी भाजपची लावारीस पिसाळली आहेत
Well done @INCHarshsapkal यांना हरामखोरांना अशीच भाषा कळते 👏🏼👏🏼
@INCMaharashtra