@drmpune@CMOMaharashtra@PMCPune काय कारवाई केली याचे उत्तर भेटेल का ???
की त्यासाठी परत तक्रार करावी लागेल
दुचाकीसाठी १ तासासाठी ५ रुपये असताना सर्रास हे लोक १० रुपये मागतात.
त्यांना फलक लावायला काय समस्या आहे ?
आता फक्त नीलम गोऱ्हे यांनी पुन्हा ठाकरे गटाकडून अर्ज दाखल करायचा बाकी आहे… म्हणजे महाराष्ट्राच्या अनैतिक राजकारणाचं वर्तुळ पूर्ण होईल.
कालपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या विरोधात भूमिका घेणारे सचिन अहिर आज शिंदे गटाकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरताना दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणात भूमिका, निष्ठा आणि विचार यांचं महत्त्व उरले नाही
या व्हिडिओत धक्कादायक गोष्ट टक्केवारी नाही… धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या आमदारचा आवाज.
ना भीती…
ना संकोच…
ना अपराधीपणा…
निर्लज्यपणे विचारतात…. मालक कोण?
जणू कमिशन मागणं हा जन्मसिद्ध हक्क आहे!
जेव्हा भ्रष्टाचार लपवावा लागत नाही…
तेव्हा समजायचं की सत्ता माजली आहे.
आणि हो. मालक जनता आहे आणि ह्याचाच तुम्हाला विसर पडला आहे.
आपण निष्ठा हा शब्द ऐकला की आपल्याला बाळा नांदगांवकर,संजय राऊत हे दोन व्यक्ती आठवतात
पण ह्या पुढे हा ही माणूस माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आठवेल
सावंत सर तुम्ही उद्धव साहेबांसाठी केंद्रीय मंत्री पदाला लाथ मारली!
शिवसेना फुटली पण @AGSawant निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिला!
एखादा उमेदवार एका चिन्हावर उभा रहातो. दुसरं चिन्ह असलेल्या पक्षाच्या उमेदवाराविरूध्द लढतो. कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेतात. उमेदवार निवडून आणतात.
मग काही दिवसांनी,
निवडून आलेला उमेदवार ज्यांच्याविरूध्द लढला त्यांच्याच बाजूला जातो.
असं झालं तर त्या लाखो मतदारांच्या मताची काय किंमत? आणि, जीवापाड मेहनत घेऊन प्रचार करणाऱ्यांची?
कुठवर चालणार हे? कुठल्या प्रकारची लोकशाही म्हणायची ही?
न्यायालय आपणहून काही करू शकत नाही का?
इतकं झाल्यावरही,
नागरिकांनी निवडणुका आणि लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा?
उद्धव ठाकरे मिल नहीं रहे थे..
संजय राऊत ने सबको परेशान किया..
अपने अपने क्षेत्र के लिए फंड नहीं मिल रहा था..
उद्धव ठाकरे बाहर नहीं निकलते हैं..
उद्धव ठाकरे को आत्मचिंतन करना चाहिए..
यह सब अब नया भारत के नए तरीके हैं जनता के फैसले को ठुकराने का.. जनता आपको शिंदे और मोदी के खिलाफ वोट देकर संसद पहुँचाती है, आप इन्हीं नेताओं से करोड़ों की डील करते हैं और भ्रष्टाचार को ऊपर दिए किसी एक लाइन से और ऑपरेशन टाइगर जैसे फैंसी शब्दों से जस्टिफाई करते हैं.. अब बीजेपी को ईवीएम से छेड़छाड़ या वोट खरीदने की मेहनत नहीं करनी पड़ेगी, वो केवल सांसदों को खरीदेंगे और सरकार बनाएंगे! आज मोदी सांसद खरीद रहे हैं, कल सीधे अडानी अंबानी खरीदेंगे!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपचे मालाड मध्ये असलेल्या शिल्पावर जैन झेंडा लावण्याचे अतिरेकी कृत्य केलेले आहे.
महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रालाच आव्हान देण्याची हिंमत होतेच कशी ? देवेंद्रजी हे कुणाच्या जीवावर चाललंय ?
@Dev_Fadnavis ?
हे एक अजिबात पटलेले नाही.
संजय राऊत म्हणतायत महाराष्ट्रात फुटीर खासदारांना 15 कोटी ॲडव्हान्स दिले.. महुआ मोएत्रा म्हणतायेत बंगालमध्ये 4 कोटी ॲडव्हान्स दिले.. 36 महिने.. एक कोटी प्रति महिना दिले जाणार.
एक देश, एक भाव तरी असायला हवा.
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लावला जाईल किंवा निकाल देण्यास विलंब केला जाईल असं आश्वासन खा. ओमराजे निंबाळकर यांना दिलं असल्याची चर्चा आहे. हे सत्य असेल तर शेवटची आशा असलेली न्यायव्यवस्था सुद्धा सरकारच्या इशाऱ्यावर चालते का?, असा प्रश्न पडतो.
आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कदापि ढळणार नाही, परंतु न्यायालये सुद्धा सौदेबाजीत भागधारक असतील तर न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्य माणसाने विश्वास ठेवायचा तरी कसा? सद्यची स्थिती न्यायव्यवस्थेवरील विश्वासार्हतेसाठी सुद्धा चिंताजनक असल्याने न्यायव्यवस्थेकडून या प्रकरणी तरी स्पष्टीकरण येणे गरजेचे आहे, अन्यथा दिवसेंदिवस हरवत चाललेली विश्वासार्हता लुप्त व्हायला वेळ लागणार नाही! असो, निकाल खा .ओमराजेंच्या बाजूने दिला जाणार असेल तर कोणाच्या विरोधात दिला जाणार हे देखील महत्वपूर्ण आहे!
#न्यायालयीन_स्वायत्तता #लोकशाही_धोक्यात #न्यायव्यवस्था #फोडाफोडीचे_गलिच्छ_राजकारण #OperationBazaar #संविधान #लोकशाही
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना...
या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे..
काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे.
केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे.
काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.
खासदार संजय दिना पाटील..आम्ही तुला मतदान दिले कारण तू भाजपच्या विरोधात उभा होता..
तुझी खासदार होण्याची लायकी नव्हती तुला मतदारांनी खासदार केला... मुंबईत एवढ्या उन्हात दोन दोन तास उभ राहून मतदान केलं होत कारण आम्हाला भाजप नको हवी होती..... आणि तूच भाजपच्या मांडीवर गेला?
यवतमाळचा संजय देशमुख याच्यासाठी माणिकराव ठाकरे थांबले...प्रचार केला जीव तोडून काम केले...आज हा भाजपकडे केला!
काँग्रेसचे अनेक मोठे नेते ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळला...काँग्रेसचे नेते बोलून दाखवत नाही,राष्ट्रवादी असो की शिवसेना सगळ्यांचा मान ठेवतात.. पदरी गद्दारी येते! #लोकशाही
7 खासदार मध्ये ओम राजे सोडले तर बाकीचे पुन्हा निवडून ही आले नसते थोड आता आदित्य ठाकरे यांनी मुंबई सोडून इतरत्र फिरावं सुरुवात करावी अजून ही मुंबईतच राजकारण करायचं असेल तर विषय सोडा राहुल गांधींना सोबत राजकारण चालू ठेवा कठोर व्हा महाराष्ट्र सेनेचे बेल्ट strong करा @AUThackeray
"आमदार, अधिकाऱ्यांना ५६ टक्के रक्कम वाटावी लागते..." अशी धक्कादायक कबुली कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या अधिवेशनात ठेकेदारांनी उघडपणे दिली आहे.
जर हा आरोप खरा असेल, तर महाराष्ट्रातील अनेक विकासकामांच्या निकृष्ट दर्जामागचे मूळ कारण यापेक्षा वेगळे असू शकत नाही. जनतेच्या करातून उभारलेल्या निधीचा मोठा हिस्सा जर भ्रष्टाचारात जात असेल, तर रस्ते खराब, पूल कमकुवत आणि प्रकल्प रखडलेले का दिसतात याचे उत्तर स्पष्ट होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात अशी भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात असेल, तर ती संपूर्ण राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि इतर विभागांतील सुमारे दीड लाख कोटी रुपयांची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. सांगली जिल्ह्यातील एका तरुण कंत्राटदाराने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना हे या व्यवस्थेचे भीषण वास्तव आहे.
यापूर्वी अधिवेशनात हा विषय मी लावून धरला होता. त्यावर समाधानकारक उत्तर अद्याप आलेले नाही. आगामी पावसाळी अधिवेशनात देखील सरकारला जाब विचारणार... त्यांच्याकडून फक्त उत्तराची नाही तर कंत्राटदारांची थकबाकी पूर्णपणे अदा करण्याची अपेक्षा आहे.
या गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.
#corruption #maharashtra