दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी गुजरात येथून ऐरोली, मुंबई येथे येणाऱ्या AR01S6030 या बसमधून मिठाईमध्ये मिसळण्यासाठी मावा (खवा) JANET’S Retail and Distribution Private Limited या कंपनीकडून पाठविण्यात आला होता.
मुंबईसारख्या शहरांमध्ये दिवाळीच्या तोंडावर मिठाईची मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचाच फायदा घेत लक्झरी बसमधून सदर माव्याची वाहतूक करण्यात आली. या बसचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना माल वाहतूक करणे हे मोटर वाहन कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. याकरिता परिवहन विभागाने या बसवर 02 नंबर 2026 रोजी 48000 हजार रुपयांचा दंड आकारला आहे. परंतु परिवहन विभागाने या बसला या मालासहित पुढे जाण्याची परवानगी नाकारायला हवी होती. परंतु असं का झालं नाही याची चौकशी झाली पाहिजे. आणि सदर वाहनाचा प्रवासी परवाना रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करायला हवी.
तसेच, या मालासाठी खरेदी-विक्रीचे इनव्हॉइस किंवा ई-वे बिल बस मालकांनी सादर केलेले नाही. यामुळे जीएसटी विभागाची फसवणूक झाल्याचे दिसून येते.
याशिवाय, सदर मिठाईच्या माव्यामध्ये टॅलकम पावडर मिसळलेली असल्याचा संशय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने FDA आणि Mumbai Police यांच्याकडे व्यक्त करण्यात आला आहे.
याच आधारावर टिळक नगर पोलीस, ठाणे यांच्या मदतीने FDA विभागाला माहिती देण्यात आली असून कारवाईसाठी सर्व माल FDA च्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. FDA अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत प्रयोगशाळेचा अहवाल येईल, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले आहे.
जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही.
— प्रदीप वाघमारे
कुर्ला विधानसभा - विभाग अध्यक्ष
@RajThackeray@amitrthackeray@SandeepDespande@Tukaram_IndIAS #FDA #tukarammundhe #SavePeople #Savelife @TilakNagarPS
निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून जो मतदारयाद्यांमध्ये गोंधळ घातला आहे, हा मतदारांचा आणि राजकीय पक्षांचा केलेला अपमान आहे. याविरोधात एक संयुक्त मोर्चा येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास कंपनी येथून सुरु होईल आणि मुंबई महापालिकेच्या जवळ त्याची सांगता होईल. त्यानंतर व्यासपीठावरून एकूणच परिस्थिती आणि पुढील दिशा यावर मार्गदर्शन केलं जाईल. हा मोर्चा अराजकीय असेल आणि त्यात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त देशाचा तिरंगा झेंडाच हातात असेल.
आज मी आणि श्री. उद्धव ठाकरे यांनी या मोर्च्याची माहिती देण्यासाठी ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. या मोर्च्यात सामील व्हावं असं आम्ही सर्व राजकीय पक्षांना, अगदी सत्ताधारी राजकीय पक्षांना पण आमंत्रण देणार आहोत. हा लढा फक्त राजकीय पक्षांचा नाही तर जनतेचा देखील आहे. त्यामुळे जनतेने देखील या मोर्च्यात मोठ्या संख्येने जरूर सामिल व्हावं.
४ ऑक्टोबर २०२६ ला सकाळी १० वाजता या मोर्च्याला सुरुवात होईल.
https://t.co/MExaBzpvFp
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचा / लोकांचा जीव धोक्यात टाकून थोड्याशा किरकोळ फायद्यासाठी अशा जड अवजड वाहनांना वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने रस्ता पार करून देण्याचे काम काही भ्रष्ट अधिकारी करत आहेत. ज्यामुळे लोणावळा शहरातून पुणे शहराकडे जाण्यासाठी मुंबई पुणे महामार्गावर जाणाऱ्या रस्त्याविरुद्ध अवजड वाहनांना खाली उतरवण्याचे काम महामार्ग पोलीस करीत आहेत. ज्यामुळे मागून येणारी वाहने व खालून येणारी वाहने यातील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. तरीही काही किरकोळ अपेक्षांसाठी अशा वाहनांना वाहतुकीच्या विरुद्ध रॉंग साईड मधून बा-ईज्जत रस्ता मोकळा करून दिला जात आहे. याची संपूर्ण चौकशी माननीय श्री. प्रवीण साळुंके, (भापोसे) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी करावी. आणि सर्वसामान्य नागरिकांना, प्रवाशांना संरक्षण द्यावे.. मागील अनेक वर्षांपासून हे उद्योग सुरू आहेत. याची साळुंखे साहेबांना ही कल्पना नसावी. अशी प्रार्थना करूया.
@HspThane @Khandala_Tap #Ravindra_Mudal
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ वरील पाथरगाव (तालुका मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीस बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. परंतु त्यांच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. सदर मार्गावर जड अवजड वाहनांचा सुळसुळाट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन व्हावे. @collector_pune@HSPMaharashtra@CMOMaharashtra
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ वरील पाथरगाव (तालुका मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीस बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. परंतु त्यांच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. सदर मार्गावर जड अवजड वाहनांचा सुळसुळाट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन व्हावे. @collector_pune@HSPMaharashtra@CMOMaharashtra
सदर वाहन #RTO च्या पूर्वपरवानगीशिवाय संरचनात्मक बदल / अनाधिकृत बॉडी बांधकाम करून वापरले जात आहे. असे असतानाही या वाहनास #ODC मालवाहतूक परवानगी दिली जाते. RC वरील Unladen Weight आणि प्रत्यक्ष मोकळ्या वाहणाचे वजन यात सुमारे ८ ते १० टनांचा फरक आहे. कार्गोचे वजन #TODA मध्ये जाहीर केलेल्या वजनापेक्षा प्रत्यक्षात जास्त आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पडताळणी न करता परवानगी दिली, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे निर्देश द्यावेत. «विश्वास ठेवा व नंतर तपासा» या धोरणाचा «नंतर तपासा» भाग अंमलात न आणणे ही परिवहन विभागाची हयगय आहे. म्हणजेच भ्रष्टाचाराला वाव देणं. ज्यामुळे परिवहन विभागाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. #JNPA #RajThackeray @AmitThackeray #MNSAdhikrut @MMVD_RTO@PratapSarnaik@mieknathshinde@CMOMaharashtra@rautsanjay61@advanilparab #NSICT #NSFT #APMTERMINAL #PSAMumbai #PanvelRTO #JayantChavanRTO
मोटार वाहन अधिनियमाचे प्रास्ताविकच «रस्त्यावरील सुरक्षेचे नियमन» हे आहे. फीज गोळा करून धोकादायक वाहनांना अधिकृतता देणे हा त्या प्रास्ताविकाच्या विरुद्ध व्यवहार आहे. परंतु मा. परिवहन आयुक्त (म. रा.) यांच्या कारकिर्दीमध्ये नोंदणी न करताच जड अवजड वाहने GVW पेक्षा जास्त भार घेऊन महामार्गांवर, राज्य मार्गांवर व शहरांमध्ये धावत आहेत. आणि परिवहन आयुक्तांना नागरिकांच्या सुरक्षेची चिंता नाही. असे दिसते. कारण खालील अधिकारी त्यांच्या आदेशाचं पालन करत नाहीत. @MMVD_RTO@PratapSarnaik #RajeshNarvekarIAS
मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवेश बंदी लागू करून देखील मुलुंड ईस्ट परिसरामध्ये जड अवजड वाहनांना कांजूरमार्ग वाहतूक विभागाकडून बंदी घातली जात नाही. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फ्रीवे कनेक्टर चे काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.
@MumbaiPolice@MTPHereToHelp