संसारी माणसापेक्षा साधक श्रेष्ठ आणि साधकापेक्षा सिध्द व सिध्द पेक्षा संत श्रेष्ठ. संसारी माणस खूप आहेत पण साधक कमी आहेत , सिध्द तर विरळा जाणावा संत तर अती दुर्लभ आहेत.
प्रथम जीवाने साधक व्हावे. जो देव प्राप्ती करता साधनांवर आरूढ होतो तो साधक.
https://t.co/xmsNnDkWHe
देहाचे दोष या करिता पाहायचे आहेत की या देहाची आसक्ती नसावी. 'मी' म्हणजे देह व देहसंबंधी जे 'माझे' या माझ्यामुळे आपण करोडो जन्म, हे जन्म - मरणाच्या फेऱ्यात फिरावे लागते.
अहं ममतेच्या लवडसवडी l माते न पवतीच बापुडी ll
म्हणुनी जन्ममरणाच्या दुधडी l डहुळती ठेली
https://t.co/2G7kZz70q4
बाबांच्या फोटोवर टच करून संपूर्ण एपिसोड ऐकू शकता..!
चौऱ्याशि लक्ष योनी, चार खानी, तीन गुण या जिवसृष्टीमध्ये मानवी देहाला फार महत्त्व आहे..
भक्ती विण जिणे जळो लाजिरवाणे l
संसार भोगणे दुःख रूप ll
एक एक योनी कोटी कोटी फेरा l
मनुष्य देहीचा वारा मग लगे ll
https://t.co/QjJ1PxYLzk
औट म्हणजे काय?
वैदिक हिंदू धर्मामध्ये औट म्हणजे साडेतीन या अंकास फार महत्त्व आहे..
देव तू अक्षर l औटाचीये मात्रेसी पर l . किंवा
तैसी ती कुंडलिनी l मोटकी औट वळणी l..
🌀बाबांच्या फोटोवर टच करून संपूर्ण एपिसोड play करून ऐकू शकता.
https://t.co/apztIYAvcd
संतांकडे दैवी संपत्ती असते, 26 लक्षणांपैकी मुख्य तीन संपत्तीचा विशेष उल्लेख आढळतो.
हे तीन गुण जेथे असतात तेथे देवाची वस्ती असते..
दया क्षमा शांती l तेथे देवाची वस्ती ll तु. म.
सतत कृष्णमूर्ती सावळी l खेळे हृदय कमळी ll
शांती क्षमा तया जवळी l
https://t.co/kxFJe8yoqw
☝️बाबांच्या फोटोवर टच करून संपूर्ण एपिसोड play करून ऐकू शकता.
Subscribe करायला विसरू नका..
चित्त हे आकाश तत्वापासुन बनलेले आहे. यालाच चिदाकाश हृदय म्हणतात, चित्ताच्या पाच अवस्था आहेत...
https://t.co/qCuz5Llsdx
☝️बाबांच्या फोटोवर टच करून संपूर्ण एपिसोड play करून ऐकू शकता.
Subscribe करायला विसरू नका..
काम, क्रोध, लोभ हे तीन माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. समाजात यांच्या मुळेच व्यभिचार, हिंसाचार व भ्रष्टाचार माजला आहे. सर्व दुःखाचे मूळ हे तीन दोष आहेत.
https://t.co/G2pelN1zvB