इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब; दारणाच्या फुगवटा भागात जलमय परिस्थिती
इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील भावली व भाम धरणे शंभर टक्के भरली असून, दारणा धरण ८६ टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे.
दरम्यान, दारणा धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज वर्तविल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, धरण परिसर आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इगतपुरी (नाशिक ) : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व पर्यटकांनी विनाकारण प्रवास टाळावा. कृपया ज्या ठिकाणी आहात तेथेच सुरक्षित थांबा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. नदी, धबधबे व डोंगराळ भागात जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.जागोजागी रस्तेबंद झाले आहेत
राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. छत्रपती शिवरायांच्या गडांचे जतन ही केवळ जबाबदारी नाही, तर आपली ऐतिहासिक बांधिलकी आहे. सरांनी याही वयात गड कोट सर केला, युवकांनो ह्या लढाईत सहभागी व्हावे लागेल आपल्याला कारण अनेक गडकोट दुर्लक्षित आहेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@maha_tourism #तिकोना_गड #FortConservation #SaveForts #Maharashtra #MonsoonTrek
सत्ता टिकवण्यासाठी नैतिकतेचा बळी देण्याची परंपरा सुरू झाली आहे का?
एकेकाळी मंत्रिपदाची नैतिक जबाबदारी ही लोकशाहीची ओळख होती. आज ती फक्त स्मृतिसभांच्या भाषणांत ऐकायला मिळते.
प्रश्न एका व्यक्तीचा नाही; प्रश्न लोकशाहीच्या मूल्यांचा आहे.
#नैतिकजबाबदारी #लोकशाही #राजकारण #Accountability
आनंदाची बातमी!
#नाशिक जिल्ह्यातील पहिले भावली धरण ओव्हरफुल झाले!
शेतकरी, नागरिक आणि निसर्गप्रेमींसाठी ही दिलासादायक बातमी. यंदाच्या पावसाने जलसाठ्यात भर घातली असून पाणीटंचाईच्या चिंतेत मोठा दिलासा मिळाला. @InfoDivNashik@iasomkarr#BhavaliDam#Nashik#Monsoon#WaterStorage #Maharashtra
राजकीय गणित चुकलं तर सरकार पडतं. शैक्षणिक गणित चुकलं तर पिढी मागे पडते.
म्हणून निर्णय घेताना प्रश्न एवढाच असावा,
सत्तेची सोय महत्त्वाची की विद्यार्थ्यांचं भविष्य?
ज्या व्यवस्थेला याचं उत्तर सापडत नाही, तिला लोकशाही म्हणता येईल; पण न्यायी लोकशाही म्हणता येणार नाही. #StudentsFirst #Education #Democracy
पुष्पगुच्छ म्हणजे सहभाग नव्हे!
तरुणांना मंचावर बोलावणं, फोटो काढणं आणि "देशाचं भविष्य" म्हणणं सोपं आहे.
पण निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये, धोरण ठरवणाऱ्या बैठकीत आणि सत्तेच्या टेबलावर त्यांच्यासाठी जागा आहे का?
सन्मान नव्हे, सहभाग द्या.
घोषणा नव्हे, अधिकार द्या.
प्रतीक नव्हे, प्रतिनिधित्व द्या.
तरुणांना भविष्य म्हणून गौरवू नका...
भविष्य घडवण्याचा अधिकार द्या.
#YouthParticipation #Leadership #Democracy
इगतपुरी शहरातील जागरूक नागरिक व विद्यार्थ्यांच्या वतीने मा. तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यावरील कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
#Igatpuri #SonamWangchuk #Education #Democracy #Maharashtra
वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकृत X (Twitter) हँडल्स टॅग करण्यासाठी:
@PMOIndia@narendramodi@EduMinOfIndia@dpradhanbjp@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@CollectorNSK
@InfoDeptMH
"लोकशाहीत कायद्याचे राज्य हेच सर्वोच्च असते. संसद आणि विधानमंडळांनी केलेल्या कायद्याच्या चौकटीबाहेर कोणतीही सक्ती किंवा दडपशाही लोकशाहीच्या तत्त्वांना बाधा पोहोचवते. या विषयावर श्री महेश झगडे सरांनी अत्यंत मोलाचे आणि विचार करायला लावणारे सत्य मांडले आहे. त्यांच्या स्पष्ट व संवैधानिक भूमिकेचे स्वागत."
गुटखा बंदीला आज चौदा वर्षे पूर्ण झाली. त्या काळात प्रचंड विरोध, न्यायालयीन आव्हाने आणि विविध दबाव झुगारून महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला व सुगंधी सुपारीवरील बंदी लागू करून ती न्यायालयात टिकवून दाखवणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे.
श्री. महेश झगडे सरांनी केलेली न्यायालयीन लढाई, बंदीची प्रभावी अंमलबजावणी आणि जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी घेतलेली ठाम भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत घेतलेले असे धाडसी निर्णय समाजहिताचे ठरतात.
गुटखामुक्त महाराष्ट्रासाठी केलेल्या या योगदानाला मनःपूर्वक सलाम. अशाच प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे तरुण पिढीचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल. इतर अधिकाऱ्यांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी देश हितार्थ ठरेल!
दिव्यांगाच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड!
इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यांग काशिनाथ आगीवले यांच्या वाहनाच्या काचा अज्ञात इसमाने फोडून नुकसान केले. या प्रकरणी एनसीआर क्रमांक ०९०३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दिव्यांग नागरिकांवर होणारे असे प्रकार अत्यंत गंभीर असून, संबंधित आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, ही मागणी नागरिकांनी केली आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaPolice@DGPMaharashtra@SPNashikRural
@CPRNashik
@CollectorNashik
#JusticeForDivyang #Igatpuri #Nashik #MaharashtraPolice #DisabledRights #LawAndOrder #SaveDivyang
नाकाबंदी दरम्यान गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोठी कारवाई. गुजरातमधून महाराष्ट्रात आणली जात असलेली विदेशी दारूची तस्करी उधळून २४ लाख ४७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची धडक कारवाई. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष नागरे करीत आहेत.
@DGPMaharashtra@MahaPolice@SPNashikRural
#MaharashtraPolice #Prohibition #PoliceAction
इगतपुरी तालुक्यावर कायम भूसंपादनाची टांगती तलवार!
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी वर्षानुवर्षे विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी गमावत आले आहेत. धरणे, महामार्ग, रेल्वे, संरक्षण प्रकल्प अशा अनेक योजनांसाठी हजारो एकर सुपीक जमीन आधीच संपादित झाली. आता पुन्हा १५ गावांतील शेतजमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "This Sector is Notified for Field Firing and Artillery Practice" अशी नोंद करण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ग्रामसभा, शेतकऱ्यांची संमती आणि सार्वजनिक सुनावणी न घेता असा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ग्रामसभेची परवानगी अनिवार्य असताना तिची उपेक्षा होणे हे लोकशाही मूल्यांनाच आव्हान आहे.
७/१२ वर अशी नोंद झाल्यास जमीन व्यवहार, बँक कर्ज, वारसा, गुंतवणूक आणि शेतीचे भवितव्य धोक्यात येईल. आधीच प्रकल्पग्रस्त असलेल्या इगतपुरीच्या शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय होऊ नये.
शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही; पण त्यांच्या हक्कांवर गदा आणणारा विकास कधीच मान्य होणार नाही. सरकारने हा आदेश तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. अन्यथा इगतपुरीतील जनतेचा संघर्ष अधिक तीव्र होईल.
याबाबत जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री @girishdmahajan व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री @ChhaganCBhujbal निवेदन देण्यात आले.
@MaheshZagade07 अन्न व औषध सुरक्षिततेसाठी केवळ छापेमारी, प्रसिद्धी आणि तात्पुरत्या कारवाया पुरेशा नाहीत. दोषींवर कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई, पारदर्शक तपासणी आणि जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता प्रभावी अंमलबजावणी हीच खरी अपेक्षा आहे." सर धन्यवाद 🙏
देशात लोकप्रतिनिधी एकमेकांचे उणेधुणे काढण्यात व्यस्त आहेत; तर जगातील अनेक देश भविष्य घडवण्यात गुंतले आहेत.
दक्षिण कोरिया शिक्षण आणि तंत्रज्ञानात, सिंगापूर सुशासनात, जपान शिस्त आणि नवोन्मेषात, तर व्हिएतनाम उत्पादन क्षेत्रात झेप घेत आहे.
आपण मात्र अजूनही आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात अडकलो आहोत. निवडणुका जिंकण्यापेक्षा देश जिंकण्याची स्पर्धा कधी सुरू होणार?
#राजकारण #विकास #भारत_ऐसेबनेगा_सोने_की_चिड़िया #विधानसभा
@Narhari_Zirwal अन्न व औषध प्रशासन सक्षमपणे काम करत आहे. लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करू दिले, तर भेसळखोरांवर प्रभावी लगाम बसेल आणि नागरिकांना सुरक्षित अन्न व औषधे मिळतील. #FoodSafety#भेसळमुक्तभारत
महेश झगडे सरांचे अनुभवकथन विचार करायला भाग पाडते. वारी आणि कुंभमेळा यांतील सांस्कृतिक व प्रशासकीय भेद त्यांनी अत्यंत संयम राखत मांडले आहेत. शेवटी श्रद्धेची खरी ओळख सत्ता, वैभव किंवा प्रोटोकॉल नव्हे; तर नम्रता, समर्पण आणि करुणा यातच आहे, हा संदेश मनाला भिडतो. #वारी #पंढरपूर #MaheshZagade
नाशिक जिल्ह्यात शेतजमिनींच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची अनेक प्रकरणे उघडकीस आली.
ठाणे–मिरा-भाईंदर परिसरात आदिवासी जमिनींच्या व्यवहारांतील अनियमिततांवर जिल्हाधिकारी अहवालानंतर कारवाईची मागणी झाली.
जळगाव–मुक्ताईनगर भागात जमीन अभिलेख व मोजणीसंदर्भातील कथित गैरप्रकारांबाबतही तक्रारी समोर आल्या.
मात्र नाशिक मधील अंमलबजावणी नंतर सरकार जागे झाले होते.