छठ पूजे निमित्त नांदेड ते पटणा दरम्यान तीन विशेष रेल्वे गाड्या.🤡
मुंबई,पुणे,नागपूर झालं आता यांना मराठवाडा नासवायचाय आणि महाराष्ट्रात बिमारू वसवण्याचं काम भारतीय रेल्वे अतिशय चोखपणे पार पाडतेय, @SCRailwayIndia नांदेडहून मुंबई,पुणे,नागपूर करिता किती विशेष गाड्या सोडल्यात तुम्ही?
खोट्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पोलीस भरतीतील अनेकांच्या बोगसगिरीचा पर्दाफाश करणारा वैभव चव्हाण या तरुणाचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. विशेष ���्हणजे आपल्याबाबत असा काही घातपात होऊ शकतो, अशी शं��ा त्याने व्यक्त केली होती आणि आज तो आपल्यात नाही. या घटनेची सखोल चौकशी होऊन त्याच्या घातपातामागे जे जे असतील त्यांच्या सरकारने मुसक्या आवळाव्यात. आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि त्याचा बोगसगिरीविरोधातील लढा पुढं घेऊन जाऊ.!
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मूर्तिजापूर (जि. अकोला) इथं #MPSC आणि #UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन सत्कार केला. त्यांच्या या सत्काराचा नम्र स्वीकार करुन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
विद्यार्थी एकजूटीचा आणखी एक महत्वपूर्ण विजय....!
राज्यभरातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुण्यात उभारलेल्या #MPSC_विद्यार्थी सत्याग्रह आंदोलनात �� जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या गट क परिक्षेमध्ये जवळपास १८ हजार पदांचा समावेश करावा, ही प्रमुख मागणी होती. सरकारच्यावतीने देखील जागा वाढीचा शब्द देण्यात आला होता, तसंच त्यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुख्य सचिवांची भेट घेऊन तत्काळ विविध विभागांकडून मागणीपत्र मागवण्याची विनंतीही केली होती.
त्यानुसार आता उच्चस्तरीय समितीने गट क परिक्षेत जवळपास ११ हजार पदांची वाढ करून एकूण १६ हजार पदे भरण्याची शिफारस केली आहे. परिणामी आत्ता MPSC आयोगाकडून लवकरच याबाबत शुद्धीपत्रक काढलं जाईल. याचा फायदा राज्यभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. न्याय्य मागण्यांसाठी ठाम राहीलं की विजय हा होतोच हे यातून पुन्हा अधोरेखित झालं. दिलेला शब्द पाळला त्याबद्ल मुख्यमंत्री साहेबांचे आभार आणि इतर मागण्या देखील दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण होतील, ही अपेक्षा..!
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो!
#MPSC
अन्न व औषध निरिक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी MPSC तील काही अधिकारी आणि काही उमेदवारांना अटक करण्यात आली असली तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनीही आणि आम्हीही काही पुरावे पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचे सचिव मा. तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं सादर केले आणि या पुराव्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याची तस��च गुन्हे शाखेने चौकशीचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली.
याशिवाय MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांसाठी असलेल्या OMR शिटमधील पाचवा पर्याय रद्द केल्यामुळं राज्यात एमपीएससी परिक्षेत गैरप्रकार करणारी टोळी सक्रीय झाली. त्यामुळं हा पर्याय का आणि कुणाच्या दबावामुळं रद्द केला याची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली.
पोलिस उपनिरिक्षक (PSI) विभागीय मर्यादित परिक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असून यामध्ये ‘मास क��पी’, आर्थिक देवाणघेवाण, ब्लॅकलिस्टमधील नावे बेकायदा पद्धतीने वगळणे, शारिरीक चाचणीतील गैरव्यवहार, नियमबाह्य पद्धतीने ताकीद देऊन गैरप्रकार करणाऱ्यांना पात्र ठरवणं, निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोशल मिडियावर लीक होणं असे प्रकार घडले आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही न्यायिक चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं केली आणि याबाबतचं पत्रंही त्य���ंना दिलं.
याशिवाय ४ जानेवारी २०२६ रोजी MPSC मार्फत घेतलेल्या गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परिक्षेत गंभीर गैरप्रकार झाला असून यासंदर्भातील पुरावेही त्यांच्याकडं सुपूर्द केले आणि या अनुषंगानेही सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
परिवहन मंत्री महोदय, झोपले आहात का? की झोपेचे सोंग घेत आहात?
वर्षभर मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये घाम गाळायचा, कष्ट करायचे आणि दिवाळीला आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे दोन क्षण घालवण्यासाठी गावी जायचे म्हटले, तर तिकिटाचे दर ७०० रुपयांवरून थेट ४,००० रुपयांपर्यंत पोहोचतात कसे?
🚨 विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे!
#लेंडवे यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची सखोल चौकशी झालीच पाहिजे! केवळ एका परीक्षेपुरती चौकशी मर्यादित न ठेवता, संशयाच्या भोवऱ्यातील सर्व परीक्षा तपासण्याचे अधिकार समितीला द्यावेत. 🔥
चौकशी सर्वंकष झाली पाहिजे, सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे! ✅
@RRPSpeaks@Tukaram_IndIAS@Dev_Fadnavis@MahaDGIPR@mpsc_office@LoksattaLive
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी,
थोडीतरी लाज बाळगा!
२०२६ मध्ये महाराष्ट्रात मोठी मेगा सरकारी नोकरभरती होणार, अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्या मेगा भरतीचं पुढे काय झालं?
महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुण आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. MPSC, तलाठी, आरोग्य विभाग, पोलीस भरती आणि इतर सरकारी विभागांतील रिक्त पदांबाबत तरुणांना वारंवार आश्वासनं दिली जातात. मात्र प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार, याचं ठोस उत्तर मिळत नाही. निवडणुकीच्या वेळी रोजगाराची स्वप्नं दाखवायची आणि सत्तेत आल्यानंतर तरुणांना पुन्हा प्रतीक्षेत ठेवायचं, हा प्रकार किती दिवस ���ालणार?
किती फसवणार तरुणांना? थोडीतरी लाज बाळगा!
७० हजार पदांच्या घोषणेपासून प्रत्यक्ष नियुक्तीपर्यंतचा संपूर्ण हिशेब महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडा. किती पदांची जाहिरात निघाली, किती परीक्षा झाल्या, किती निकाल जाहीर झाले आणि किती तरुणांना नियुक्ती मिळाली, याची अधिकृत आकडेवारी जाहीर करा.!
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
न्यायिक समितीने राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीचे काम सुरू केले, त्याबद्दल आभार!
परंतु, न्यायिक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात केवळ ९ परीक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक, पेपरफुटीची व्याप्ती केवळ या ९ परीक्षांपुरती मर्��ादित नसून, विद्यार्थ्यांच्या मनात इतरही अनेक परीक्षांबाबत संशय आहे.
जसे की, विभागीय PSI परीक्षा, सिव्हिल २०२३ यांसंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत मी मुख्य सचिवांची भेट घेतली होती. तसेच, २०२१ पासून आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सर्व संशयास्पद परीक्षांचा समावेश शासन निर्णयात करण्यात यावा, अशी विनंतीदेखील केली होती.
तरी, या विषयाचे गांभीर्य ��क्षात घेता विद्यार्थ्यांच्या मनात संशय असलेल्या सर्व परीक्षांचा, तसेच FDA पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांशी संबंधित सर्व परीक्षांचा न्यायिक आयोगाच्या चौकशीमध्ये समावेश करावा आणि विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सखोल व योग्य तपास करावा, ही विनंती.
#MPSC #पेपरफुटी #MPSCStudents #PaperLeak #न्यायिक_आयोग #ExamScam #MPSCविद्यार्थी
आयोगाच्या परीक्षांचे ठीक आहे पण ज्या सरळसेवा परीक्षांमध्ये घोळ झाला आहे त्याच काय @Dev_Fadnavis साहेब. @TCS ने घेतलेली एकही परीक्षा पारदर्शक झाली नाही. त्यामुळे याही परीक्षांची चौकशी झाली पाहिजे. @RRPSpeaks@Dhananjay4INC@MahebubShaikh20 यासाठी आपणही पाठपुरावा करावा ही विनंती.
जेवढे पुरावे ऋषी गांगुर्डे ने एक विद्यार्थी म्हणून काढले ते बघता राज्य शासनाने त्यालाच पोलिस प्रशासनात नोकरी देऊन हा MPSC पेपरफुटी तपास अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली पाहिजे.
इतक्या दिवसांपासून नेमकं चाललं�� काय?
#MPSC_x
2021 पासून च्या सर्व परीक्षांची चौकशी करण���याची मागणी असूनही काही ठराविक परीक्षांचीच चौकशी का?
सर्वच परीक्षांची चौकशी करायला हरकत काय? @CMOMaharashtra
धन्यवाद…!
अखेर MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीसह आणि शिपाई ते अध्यक्ष यांची चौकशी करुन आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी Commissions Of Enquiry Act-1952 अंतर्गत न्यायिक आयोग स्थापन झाला. आयोगाकडून औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसह Group B, Group C तसंच इतर संशयित परीक्षांचीही चौकशी होणार आहे. आयोगाला असलेले अधिकार बघता खालपासून वरपर्यंत संपूर्ण शुद्धीकरण होईल तसंच ३१७ च्या पुढील कारवाईसाठी शिफारस होईलच, ही अपेक्षा!
विद्यमान सदस्य अभय वाघ हे मोठे ‘खिलाडी’ असून त्यांना देखील भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे, अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना आहे. याबाबत सरकारने लक्ष घालावं, ही विनंती! Group B संदर्भात पुढच्या आठवड्या�� न्यायिक आयोगाला भेटणार असून शक्य असतील तेवढे सर्व पुरावे आपल्याला द्यायचे आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व पुरावे विद्यार्थी प्रतिनिधी किंवा आमच्याकडे जमा करावेत, एकही दोषी सुटणार नाही याची आपण काळजी घेऊ!
जब तक घर भेजेंगे नहीं... तब तक छोड़ेंगे नहीं...!
#MPSC #MPSCPaperLeak #MPSCStudents #न्यायिक_आयोग #पेपरफुटी #विद्यार्थी_एकजूट
#MPSC आयोगातील महाभागांनी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्नच करू नये! आंदोलन स्थगित झालं म्हणजे सर्व शांत झालं आणि आमचं लक्ष नाही, असं कुणीही समजू नये. पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी करणाऱ्या कुणालाच आम्ही सोडणार नाही.
चौकशी होऊद्या, पेपर फोडणारे सगळे घरी जातीलच..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCStudents #MPSCUpdates
MPSC आयोगाला नवीन सचिव (प्रभारी) लाभले... आता प्रतीक्षा नव्या अध्यक्षांची... दोन महिन्यांनी नवीन अध्यक्ष नक्कीच लाभतील, तेही विद्यार्थ्यांच्या मनातले...!
#MPSC#MPSCStudents
MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा ‘चक्रम’पणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि मा. तु��ाराम मुंडे साहेबांच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल. त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Tukaram_IndIAS
#MPSC #MPSC_आयोग