@Shinde_Revati21@Vritrahan_ "She is just 20" is not an excuse. He was also only 24! She has the courage to murder someone, but "she is just 20." At this age, we are just figuring out how to clear M1 and M3.
संपूर्ण वाचा आणि शेअर करा..!!
गावात पाणी शिरते त्याची गोष्ट....
गावातील ओढा बुजवून कुणी दोन एकर शेत तयार केले.... ओढा बुजवून कुणी त्यातून रस्ता काढला... ओढ्यात कुणी विहीर खोदली... त्याने ओढा अडला.. गाडला...हे सगळे होत असताना गाव बघत राहिले.
- कारण अतिक्रमण करणाऱ्यांना दुखवायचे कसे? गावातील ग्रामसभा गप्प. सरपंच गप्प. पोलीस पाटील गप्प. ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब देखील गप्प. तहसीलदार, गटविकास अधिकारी साहेब कधी ओढे, नाले, नद्या पहायलाच आले नाहीत. उलट ओढे, नाले, नद्या आपण वाळू तस्करांच्याही हवाली केल्या.
-मग व्हायचे ते झाले. ओढ्याने आपला मार्ग शोधायला सुरुवात केली. रस्त्यात अडथळा असेल ते सगळे उद्ध्वस्त केले.पाणी गावात घुसले.
- गावात पाणी का घुसले ? त्याची ही गोष्ट आहे. आज पूर आल्यानंतर धावाधाव सुरू आहे. मात्र ओढे नाले नद्या गिळंकृत होत असताना व त्यावर अतिक्रमणे होत असताना सर्व प्रशासन गप्प बसले होते. गावेही गप्प होती.
- दोष पावसाचा नाही. दोष माणसांचा आहे. हे काल आपल्या परिसरातील अनेक गावांमध्ये दिसल्याची पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने अनेक वृत्तापत्रांमध्ये बातमी येत आहेत.
- पूर आल्यानंतर आपण सरकारकडे मदतीची मागणी करतो. सरकारही कोट्यावधी रुपये मदत जाहीर करते. ती द्यायलाच हवी. कधी कधी निसर्ग देखील कोपतो. ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होते. पण प्रत्येक वेळी दोष केवळ पावसाचा नसतो. दोष आपलाही आहे. आपण ओढ्या, नाले, नद्या गिळंकृत करायला लागलो. त्यामुळे बिचारा पाऊस तरी काय करणार ? सरकारने अजूनही जागे व्हायला हवे. सर्व राज्यात मोहीम हाती घ्यायला हवी. ओढे, नाले, नद्या अतिक्रमणमुक्त करा आणि जे कोणी अतिक्रमण करतील त्यांच्यावर कारवाई करा. तरच ही परिस्थिती आपण दूर करू शकतो. अन्यथा वारंवार पूर येणे अपरिहार्य आहे.
आपण सध्या पुराचे अनेक फोटो पाहत आहोत त्यामध्ये रस्ता खचून अक्षरशः जमीन चिरत पाण्याने वाट काढली हे दिसते. कारण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने ओढा वाहतो. तो नळ्या टाकून अडवला होता. तसेच रस्त्यावरील पूल देखील प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने बांधला. त्यामुळे पाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने करंजी (जिल्हा अहिल्यानगर)गावात शिरले. यात ज्या व्यक्तींची चूक नाही अशाही व्यक्तींच्या घरांमध्ये, शेतामध्ये पाणी घुसले. अतिक्रमण शासनाने आणि काही लोकांनी केले. त्याचा फटका मात्र सगळ्या गावाला सहन करावा लागला.