लोहगड घटनेवरून काही म्हणतात की आताच्या इंस्टाग्राम फेसबुक युग मुळे लोक बिघडले.
असल्या गोष्टी आधीही होयच्या.
तेव्हा सीसीटीव्ही नसायचे..
मोबाईल नसायचे...लोकेशन कळायचे नाही..
कॉल डिटेल्स रेकॉर्ड नसायचे..
असले कित्येक गुन्हे लोकांनी पचवले आहेत तेव्हा...
तुकाराम मुंडेंनी जेव्हा पासून अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे कमिशनर म्हणून पदभार स्वीकारला आहे तेव्हापासुन दुग्धजन्य भेसळयुक्त पदार्थ, मेडिकल फील्ड, गुटखा बंदी, हॉटेल लाइन, किचन, भेसळयुक्त पेढे यावर थोडा तरी वचप बसला आहे. ते FDA चे कमिशनर आहेत हे लोकांना माहिती तरी आहे पण आधीच्या FDA कमिशनरची नावे सुद्धा माहिती नव्हती लोकांना, FDA काय काम करतं हे सुद्धा माहिती नव्हतं ग्रामीण लोकांना पण लोक आता हुशार झालीत. तुकाराम मुंडेंच एक वैशिष्ट्य आहे ते ज्या विभागाचा पदभार स्विकारतात ते विभाग लोकांच्या कायम लक्षात राहतं कारण त्यांची काम करण्याची पद्धत सगळ्या अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी आहे. अशे अधिकारी अजून वाढले पाहिजेत.
पावसाळा आलाय, तुमची प्ले लिस्ट आत्ताच अपडेट करून घ्या-
१) ओल्या सांजवेली
२) निशाण तुला दिसलाना
३) चिंभ भिजलेले
४) मन उधाण वाऱ्याचे
५) रोज मला विसरून मी
६) वाटेवरी मोगरा
७) जरा जरा टिपूर चांदणे
८) रेशमी रेशमी
९) भिजून गेला वारा
१०) कधी तू
११) सर सुखाची श्रावणी
१२) तुला पाहता आज ही
१३) मन तळ्यात, मळ्यात
पूर्वीच्या चित्रपटांमध्ये नायका इतकीच खलनायकाची भूमिका महत्वपूर्ण असायची.
जीवन, प्राण, अजित, अमजद खान, अमरीश पुरी, शक्ती कपूर, गुलशन ग्रोवर यासारख्या खलनायकांने आपल्या दमदार भूमिकेने चित्रपटसृष्टी गाजवली.
काही सिनेमांमध्ये तर नायकांपेक्षा खलनायकच जास्त भाव खाऊन जायचा. बरेच सिनेमे हे खलनायकाचा भूमिकेमुळेच गाजलेले आढळतात. अशाच आशयाचा एक चित्रपट १९९९ साली येऊन गेला की ज्यात खलनायकाची भूमिका वरचढ ठरते तो चित्रपट म्हणजे 'संघर्ष'.
मला सर्वाधिक आवडलेला खलनायक म्हणजे या चित्रपटातील आशुतोष राणा या कसलेल्या अभिनेत्याने साकारलेली खलनायकाची भूमिका.
तसं बघितले तर तिकीट बारीवर हा चित्रपट तितकासा यशस्वी ठरला नाही परंतु आजही बरेच लोक निव्वळ आशुतोष राणाची दमदार अभिनयासाठी हा चित्रपट बघतात. मी पण त्यांच्यापैकी एक असून जेव्हा जेव्हा हा चित्रपट TV वर लागतो तेव्हा आवर्जून बघतो.
या चित्रपटात आशुतोष राणाने साकारलेली निर्दयी खलनायकाचे भयानक रूप बघून अंगावर शहारे येतात. त्यांच्या डोळ्यातील भेदकता व चेहऱ्यावरील आक्रमक व रागीट भाव बघून असे वाटते की आशुतोष राणा शिवाय दुसरे कोणीही या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकले नसते. हा चित्रपट जेव्हा पहिल्यांदा बघितला तेव्हापासून मी या अभिनेत्याचा चाहताच बनलोय . अजूनही हा चित्रपट TV वर लागलयास मी आवर्जून बघतो तो फक्त आणि फक्त म्हणजे आशुतोष राणाचा दमदार अभिनयासाठी…
आशुतोष राणाच्या दमदार अभिनयासाठी हा चित्रपट एकदा तरी जरूर बघावा.
@ranaashutosh10