प्रति,
श्री. योगेश जाधव
चेअरमन, पुढारी वृत्तसमूह
महोदय,
हे पत्र मी तुम्हाला कोणतीही राजकीय औपचारिकता म्हणून लिहीत नाही, तर तुमच्या वृत्तपत्राने पत्रकारितेचा जो उघड बाजार मांडला आहे, त्यावर थेट बोट ठेवण्यासाठी लिहीत आहे.
ज्या 'दैनिक पुढारी'ला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मोठा वारसा होता, त्याच पुढारीची वाटचाल आज अत्यंत लाजीरवाण्या 'पॅकेज संस्कृती'कडे वळाली आहे. तुम्ही वृत्तपत्राला विचारांचे माध्यम न ठेवता, त्याला पैशाच्या बाजाराचा अड्डा बनवले आहे. निवडणुका आल्या की तुमचे हस्तक कसे 'सुपारी बहाद्दर' म्हणून बाजारात उघडपणे फिरतात, हे एक समाजकारणी म्हणून आम्ही जवळून अनुभवत आहोत. हे सुपारी गोळा करणारे तुमचे दलाल समाजात उघड माथ्याने फिरून उमेदवारांचे खिसे कापतात, स्वतःची घरे भरतात आणि त्यासोबत तुमचेही खिसे गरमागरम करतात; हाच तुमचा धंदा उरला आहे का?
सध्या विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक समोर आहे आणि त्यात तुमची पत्नी 'जाधव पाटील' उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आपल्याच कुटुंबातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या अख्ख्या माध्यम समूहाची विश्वासार्हता पणाला लावली आहे. पैशाच्या ओझ्याखाली दबून, केवळ ठराविक आणि श्रीमंत उमेदवारांचे लाळघोटेपणा करण्याचे काम आज तुमचे माध्यम करत आहे. तुमच्या या बरबटलेल्या 'पेड न्यूज' (Paid News) संस्कृतीमुळे प्रामाणिक आणि सर्वसामान्य उमेदवारांचा आवाज तुम्ही जाणीवपूर्वक दाबत आहात. सामान्य उमेदवारांनी दिलेली रक्कम तुम्हाला कमी वाटते, म्हणून तुम्ही आणि तुमचा नीतिमत्ता धुळीस मिळवलेला 'वसुली बहाद्दर' पांड्या, दुसरीकडून मोठी सुपारी मिळाली की सामान्य व गरीब उमेदवारांचे पैसे घेऊनही त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करतो. हे तुम्हाला शोभते का? पेड न्यूजच्या नावाखाली कोटींच्या सुपाऱ्या घेणाऱ्या तुम्हाला पदवीधरांनी का मतदान करावे, याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
तुमचा हा लाडका हस्तक पांड्या कोणत्याही कर्जाशिवाय गुटखा व्यापाऱ्यांच्या पैशातून दोन कोटींचा फ्लॅट खरेदी करतो. त्याने वसुली करून आणलेले अडीच कोटी रुपये तुम्हाला त्याच्याकडून येणे असल्यामुळेच तुम्ही त्याचे हे सगळे चोचले पुरवत आहात, हे खरे आहे का? तुम्ही सुपाऱ्या घेऊन मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी आमच्याविरुद्ध खोट्या बातम्या छापणार आणि आम्ही ते गप्प पणे सहन करणार, असे कधीच होणार नाही.
योगेश जाधव, माझा तुम्हाला थेट आणि रोकडा सवाल आहे, सुशिक्षित आणि सजग मतदारांनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला का मतदान करावे? ज्या प्रकारे तुम्ही निवडणुकीत पैशाचा बाजार मांडून तुमच्या हस्तकांमार्फत बातम्यांच्या सुपाऱ्या घेतल्या, त्याच प्रकारे मतदानाच्या दिवशीही या मतदारसंघातील उच्चशिक्षित पदवीधरांची मते तुम्ही बाजारात खरेदी करणार आहात का? पदवीधर आणि बुद्धिजीवी मतदारांना तुम्ही इतके लाचार आणि विकले जाणारे समजता का?
जर तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेताना केवळ स्वतःच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक फायद्यासाठी मतदारांचा वापर करणार असाल, तर तुमची जागा विधान परिषदेत नाही तर व्यापारपेठेत आहे. पैशाच्या बळावर सुशिक्षित मतदारांची निष्ठा खरेदी करण्याचे तुमचे मनसुबे हाच पदवीधर मतदारसंघ धुळीस मिळवेल. पैशाचा माज, हस्तकांची सुपारीबाजी आणि माध्यमाचा गैरवापर करून सुशिक्षित मतदारांना गृहीत धरू नका; हा वर्ग तुम्हाला तुमची खरी जागा मतपेटीच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे नीट लक्षात ठेवा.
रवींद्र धंगेकर
(माजी आमदार, कसबा विधानसभा मतदारसंघ, पुणे)
#पुढारी #पुणेपदवीधर
गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे….!
पण…… आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरण्यासाठी सूत्रं हलवली जातायत.
पण लक्षात ठेवा, जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे.
घराबाहेरही पडू देणार नाहीत… नेत्यांनाही आणि पिलावळींनाही..!
@INCMaharashtra@satejp@ruturajdyp
#GokulElection2026 #गोकुळ
"हा पराभव स्थानिक नेत्यांचा नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा हाय"
एक कोल्हापूरकर
सगळ्यांना माहित आहे. हा पराभव देवा भाऊ च्या लय जिव्हारी लागलाय 😀
@satejp नाम तो सुना ही होगा 🔥
"वेळ प्रत्येकाची येते आणि जेव्हा ती येते तेव्हा ती प्रत्येकाला पद्धतशीरपणे घेते" आज अशीच काहीशी परिस्थिती आज पुढारी समूहाच्या जाधव कुटुंबाची झाली आहे.
पुढारी नावाचा वृत्तसमूह.. ज्याची सुरुवात पद्मश्री ग.गो.जाधव यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला बळ देण्यासाठी आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी या केली होती. परंतु काळाच्या ओघात पुढे या समूहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रतापराव जाधव आणि कंपनीने सर्व नीती मूल्ये बाजूला ठेवून या वृत्त समूहाला प्रोफेशनल "मनी मेकिंग मशीन" बनवले.
ज्या कार्यकर्त्याना तुम्ही आपल्या सुनेला निवडून आणावे म्हणून विनंती करत आहात त्याच कार्यकर्त्यांना लोकसभा- विधानसभा - नगरपालिका - जिल्हा परिषद अशा सर्व निवडणुकांमध्ये आपल्या वृत्त समूहाच्या विविध वसुली एजंटामार्फत करोडो रुपयांचे पॅकेज घ्यायला लावले आहे, तेव्हा कुठे तुम्ही त्यांच्या चांगल्या चार ओळी छापल्या आहेत.
पुणे शहरात तर तुमचा पांडू वसुलीवाला तुमच्याही पुढे जाऊन प्युअर दलालीचे काम करतो. लोकसभेला विधानसभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊन जो जास्त पैसे देईल त्याच्या चरणी याची निष्ठा असते. म्हणजे "दलाली तर दलाली वरून गद्दारी आणि नाव पुढारी" असा सगळा आपल्या वृत्त समूहाचा प्रवास सुरू असताना आपण एका कार्यकर्त्याकडून अशी कशी अपेक्षा करता की त्यांनी निस्वार्थ भावनेने माझ्या सुनेला निवडून द्यावे.
सत्तेच्या सारीपाठात एखाद्या क्रूर माणसाला जितकी जास्त ताकद मिळते,तो जास्त वर जातो तितका तो आणखी क्रूर होत जातो, असा हिटलर पासून इतिहास आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला जर यश मिळाले तर आपण पुढील काळात आपला हा पॅकेज बातमीचा धंदा थांबवणार की या सत्तेच्या बळावर आणखी जोरात आमचा गळा आवळणार..? असा प्रश्न माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे.
शेवटी आमच्या निवडणुकीच्या वेळेस आमचे केलेले हाल आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्या निवडणुकीचे सध्या तरी मला अवघडच दिसते.
All the best 👍
- आपला रवि धंगेकर.
I’ve just reached London
It’s time the world sees the reality of vote chor and murderer of democracy.
International danka bajane ka time aa gaya hai
Join the protest tomorrow in front of Mahatma Gandhi’s statue in parliament square at 12pm if you’re here
Jai Hind 🇮🇳
नेतृत्व पदाने नाही, तर दुसऱ्यांना दिलेल्या सन्मानातून सिद्ध होतं!
राहुल गांधी यांनी विद्यार्थी नेत्या नेहा बोरांना स्वतःहून बोलावून
मीडियाशी संवाद साधण्याची संधी दिली. हा छोटासा क्षण त्यांच्या
नेतृत्वाची मोठी झलक दाखवतो.
तरुणांना केवळ ऐकून घेणं नाही, तर त्यांना व्यासपीठ देणं, त्यांच्या
आवाजाचा सन्मान करणं आणि पुढच्या पिढीला पुढे आणणं… हेच
खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे! ❤️
सत्ता माणसाला मोठं बनवत नाही; दुसऱ्यांना मोठं होण्याची संधी देणारा माणूस खरा नेता असतो!
राहुल गांधींच्या या कृतीने मन जिंकलं! 🇮🇳✊
MPSC के अध्यक्ष को आखिर जाना पड़ा - अब भ्रष्टाचार की पूरी जांच होगी।
ये छात्रों की बड़ी जीत है,
ये युवाओं की बड़ी जीत है,
ये सत्याग्रह की बड़ी जीत है।
#Satyagraha
We appeal to everyone to march towards Jantar Mantar!
If Delhi Police tries to stop you, wherever they stop you will become your Jantar Mantar.
@AjinkyaCJP
मोदी मोदी पासून सुरू झालेला प्रवास आता
" चले जाव मोदी " इथे येऊन थांबला आहे ...
राजसाहेब यांचे व्यंगचित्र होते ...
परतीचा पाऊस ...
त्या दिशेने मोदी सत्तेची वाटचाल सुरू झाली आहे ...
MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून का हटवलं जात नाही? हा घ्या त्याचा जिवंत पुरावा!
पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात त्याची खोटी स्तुती करणारे, लाळघोटेपणा करणारे 'भाट' असायचे. आजच्या डिजिटल युगात भिमनवार हे फडणवीस साहेबांच्या दरबारातील आधुनिक भाट आहेत. हीच त्यांची 'विशेष पात्रता' असल्यामुळे, विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश असतानाही त्यांना पदावरून हटवलं जात नाही. ज्या शासनाला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यापेक्षा स्वतःची चापलुसी करणारे 'भाट' जास्त प्रिय वाटतात, त्या राज्याचं भविष्य अंधकारमय असतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, विद्यार्थ्यांना 'उत्तरदायी' अधिकारी पाहिजेत, लाचार चाटुकार नकोत.
लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आग लावून केवळ सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तुम्ही अजून किती दिवस पाठीशी घालणार?
हाकला या भ्रष्ट सरकारी जावयाला…!
शासकीय सेवेत असताना अशी पोस्ट इतर कुण्या अधिकाऱ्याने केली असती, तर त्याला लगेच साइड पोस्टिंगला फेकलं असतं; पण मुख्यमंत्र्यांनी सगळे निकष धाब्यावर बसवून आपल्या मित्राला IAS केलं आणि आता राज्यातील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरही बसवलं.
धन्य ते सरकार आणि अजब तो कारभार..!
'जब तक ज्ञानेश कुमार का
इस्तीफा नहीं, तब तक नहीं हटेंगे'
CJP Protest से पहले CJP प्रवक्ता Saurav Das ट्रेनें रद्द होने और मेट्रो बंद होने पर भड़के.
उन्होंने चेतावनी दी कि जब तक CEC Gyanesh Kumar का इस्तीफ़ा नहीं होगा, वे लोग सड़क से नहीं हटेंगे. सुनिए क्या कहा...