शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar